शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणी बाबत समाज कल्याण आयुक्तांनी दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची अर्ज स्वीकृती व पडताळणी ऑनलाईन करण्यात येत आहे.
१.इ.९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत) २. साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
(केंद्रपुरस्कृत)
३.इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
४. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
५. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क
६. सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता वर नमूद सहा योजनांसाठीची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने अर्ज स्वीकृती आणि नुतनीकरणाची ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे. याबावत आपणास अलाहिदा कळविण्यात येईल. तसेच याबाबतची सूचना ऑनलाईन पोर्टलवरही प्रसिध्द करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अर्ज स्वीकृती व पडताळणीकरिता ऑनलाईन प्रणाली सुरु झाल्यानंतर पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
१) वर नमूद क्रं.१ व २ या योजना केंद्रपुरस्कृत आहेत. यात शिष्यवृत्तीचा राज्य हिस्सा ४० टक्के वितरीत झाल्यानंतरच केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा वितरीत होतो. या दोन्ही योजनांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे राज्य व केंद्र हिस्सा असे २ टप्पे आहेत. तसेच या योजनांच्या शिष्यवृत्ती वित्तरणाबाबत केंद्र शासनाकडून वारंवार विचारणा होत असते. त्यामुळे या दोन्ही योजनांचे कामकाज प्रथम प्राधान्याने करण्यात यावे.
२) सन २०२३-२४ पासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्जाची स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे. त्याकरीता सर्वप्रथम शाळेची पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अद्याप पर्यंत ज्या शाळांची नोंदणी केलेली नाही अशा शाळांकरीता तात्काळ कॅम्पचे आयोजन करून शाळांची नोंदणी प्राधान्याने १०० टक्के करण्यात यावी.
३) ऑनलाईन नोंदणी झालेल्या शाळांतील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्वीकृती ऑनलाईन पोर्टलवरच करण्यात यावी. सन २०२५-२६ करीता शासनाच्या युडायस प्लस प्रणालीवर उपलब्ध असणारी माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर माहिती अद्ययावत असल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करणे आवश्यक आहे. सदर माहितीशिवाय विद्यार्थ्यांची आवश्यक ती उर्वरित माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये भरावी, तसेच सन २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे सन २०२५-२६ करीता अर्ज नुतनीकरणाची कार्यवाही संबंधित मुख्याध्यापकांनी पूर्ण करावी. याबाबत जिल्हयातील मुख्याध्यापकांना आपले स्तरावरुन सूचित करावे.
४) सन २०२५-२६ पासून ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे बैंक खात्याचा तपशील भरणेकरीता मुख्याध्यापक स्तरावर प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर बैंक खात्याच्या तपशीलाकरीता विद्यार्थ्यांचे बैंक खाते हे आधार संलग्न व कार्यरत (Active) असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बैंक खाते उपलब्ध अथवा सुरु नसेल अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या आई वडिलांसोबतच्या संयुक्त बैंक खात्याचा तपशील पोर्टलवर भरण्यात यावा, पण संयुक्त बैंक खात्याच्या वाचत्तीत प्रथम खातेदाराचे नाव म्हणून संबंधित विद्यार्थ्याचेच नाव असणे आवश्यक आहे आणि सह खातेदार म्हणून संबंधित विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे नाव असावे. कोणत्याही परिस्थितीत केवळ पालकांच्या बैंक खात्याचा तपशील सदर पोर्टलवर भरु नये यावाचत मुख्याध्यापकांना सक्त सूचना देण्यात याव्यात. कारण केवळ पालकांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही.
५) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना पडताळणीकरीता ऑनलाईन पाठविण्यात यावेत. संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी प्राप्त अर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूरीकरीता संबंधित जिल्हयाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांना ऑनलाईन पाठवावेत. अपूर्ण व त्रुटी असणारे अर्ज त्रुटीपूर्ततेकरीता संबंधित मुख्याध्यापकांना ऑनलाईन परत पाठविण्यात यावेत. अशा ऑनलाईन कार्यप्रणालीबाबत संबंधित कार्यालयांना आपले स्तरावरुन अवगत करण्यात यावे.
६) सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेकरीताचे अर्ज संबंधित सैनिकी शाळेकडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील Desk १ लॉगीनवर ऑनलाईन पाठविण्यात यावेत. उचित कार्यवाहीनंतर Desk १ कडून परिपूर्ण व पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना ऑनलाईन पाठविण्यात येतील,
७) संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अथवा Desk १ यांचेकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाची जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी ऑनलाईन प्रणालीवर पडताळणी करावी.
८) पडताळणीअंती पात्र विद्यार्थ्यांची यादी पीडीएफ व एक्सेल फॉरमॅटमध्ये ऑनलाईन प्रणालीवरच उपलब्ध होईल. याबाबतची सुविधा सन २०२५-२६ पासून ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर यादीमध्ये शिष्यवृत्तीचे देयक कोषागार कार्यालयास अथवा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करण्यासाठी आवश्यक संपूर्ण तपशील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदर यादीचीच प्रिंट काढून प्रचलित पध्दतीने शिष्यवृत्तीची देयके सहाय्यक आयुक्त/ जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे स्तरावर तयार करावीत.
९) शिष्यवृत्तीचे देयक पारित झालेनंतर ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध झालेल्या यादीचीच प्रिंट काढून शिष्यवृत्ती संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणेसाठी बँकेला पाठविण्यात यावी.
वर नमूद सुचनांचे काटेकोर पालन करून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजुरी व वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.
(प्रमोद जाधव)
सहआयुक्त (शिक्षण),
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या दिनांक २५ ऑक्टोबर 2024 रोजीच्या आदेशानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन शिष्यवृत्तीबाबत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचेमार्फत प्राप्त सुचना दिनांक २५/१०/२०२४ व पत्र क्र. ३४१९ दिनांक २३/१०/२०२४
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने सविनय सादर करण्यात येते की, आपल्यामार्फत यापुर्वीच आपले अधिनस्त सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना शाळेचे महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. व सदरचे पोर्टलवर शाळांच्या नोंदणीचे काम सुध्दा झालेले आहे.
त्याअनुषंगाने संदर्भिय अन्वये शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहेत व सर्व शाळांमार्फत भरण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या अर्जावर ऑनलाईन कार्यवाही करणेसाठी मा. आयुक्तस्तरावरून सर्व तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांना User Name आणि Password देण्यात आलेले आहेत. सदर पासवर्ड यासोबत देण्यात येतआहेत.
तरी आपण याबाबत तात्काळ कार्यवाही करून आपले User Name आणि Password तयार करून घ्यावे यासाठी पुढिल वेवलींकवर जावून आपणास User Name आणि Password तयार करून घ्यावयाचे आहेत. व पोर्टलवर भरण्यात येणारे ऑनलाईन अर्ज Srutiny Portal वर ऑनलाईन छाननी करून पुढे पाठवावयाचे आहेत. संपूर्ण माहितीसाठी यासोबतच्या पत्रात तपशिलवार सुचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
कृपया सदरचे कामास प्राधान्य देण्यात येवून तात्काळ कार्यवाही करावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा,
वेबलिंक -
https:#prematricdbtworkflow.mahait.org
जिल्हा समाज कल्याण अधिकारी
करिता जिल्हा परिषद बुलडाणा
प्रतिलिपी :-
१. मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, म. रा. पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर. २. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना माहिमीस्तव सविनय सादर.
३. मा. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती यांना माहितीस्तव सविनय सादर.
४. शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक/ योजना यांना माहिती तथा उचित कार्यवाहीस्तव रवाना.
वरील संपूर्ण आदेश संदर्भात आदेशासह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, शिक्षण फी परिक्षा फी, इयत्ता ९ वी व १० वी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती, तसेच अस्वच्छ व्यवसायात काम करणान्या पालकांचे पाल्यांना शिष्यवृत्ती या योजना सन २०२३-२४ पासुन राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. व याबाबत आपणास यापूर्वीच सूचित केलेले आहे. व पंचायत समिती स्तरावर वेळोवेळी कळविलेले आहे.
तरी आपण आपले अधिनस्त सर्व केंद्रप्रमुख तसेच संबंधित शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना विषयांकीत प्रकरणो अवगत करून दयावे तसेच शिष्यवृत्तीच्या लाभासाठी पात्र असलेले इ. ९ व १० वी मध्ये शिकणा-या अनु जाती विद्याच्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती या योजनांची अर्ज नोंदणी प्रामुख्याने करून सन २०२३-२४ मधील सर्व विद्यार्थ्यांची महाडिबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून घेणेसाठी सुचित करावे. याबाबत संदर्भ क्र. ३, ४ व ५ अन्वये आपणास यापुर्वीच सुचित करण्यात आलेले आहे. तरी उक्तबाबत कृपया तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. ही विनंती.
वेब लॉक पुढिलप्रमाणे
सोबत - युजर मॅन्युअल
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद
समाज कल्याण विभागामार्फत इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणा-या अनुसूचित जातीच्या त्याअनुषंगाने सन 2023-24 मध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्याथ्यांचे प्रस्ताव महाडिबीटीवर ऑनलाईन करावयाचे आहे.
याकरीता पुढिलप्रमाणे योजनांचे अर्ज ऑनलाईन नोंदणी करावयाचे आहे.
1. इ. 9 व 10 व मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना भरत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती 2. इ. 1 ली ते 10 मध्ये शिकणा-या अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती.
3 . इ. 5 वी ते 7 व इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
. इ. 5 वी ते 10 मध्ये शिसकणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती. 4
5. इ. 10 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना महर्षि विठठल रामजी शिंदे शिक्षण फी परिक्षा फी उपरोक्तप्रमाणे योजना सर्वप्रथम पोर्टलवर शाळेची नावनोंदणी करून महाडिबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन करावयाचे आहेत.
वेब लिंक -
https://prematric.mahait.org/login
पोर्टलवर काम करतांना येणा-या अडचणीसाठी दिलेल्या ई मेल वर संदेश पाठवायचे आहे.
1. Jitendra.Pal@mhait.org
2. Mayuri.arvenla@mahait.org
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments