महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 31 मे 2014 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणी दरांना धार्मिक यात्रेचा खर्च भागवण्यासाठी भविष्य निर्वाह निधी मधून रक्कम न परतावा काढण्याची मंजुरी देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शासन निर्णय -
महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ च्या नियम १६ अन्वये, वर्गणीदारास निधीमधून रक्कम काढून घेण्यासाठी मंजूरी द्यावयाची तरतूद आहे. सदर नियमामध्ये भविष्य निर्वाह निधीच्या खात्यामधून रक्कम काढून घेण्यासाठी (ना-परतावा) मंजूरी देता येईल अशी विविध प्रयोजने विहित करण्यात आली आहेत. सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांना धार्मिक यात्रेचा खर्च भागविणे या प्रयोजनाखाली भविष्य निर्वाह निधीमधून (ना-परतावा) रक्कम काढण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
२. याबाबत शासन आता असे आदेश देत आहे की, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम क्रमांक १६ नुसार वर्गणीदाराची दहा वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर (मध्ये खंड झाला असल्यास, खंडीत सेवेचा समावेश करुन) अथवा नियत सेवानिवृत्तीपूर्वी दहा वर्षे यापैकी जे आधी घडेल त्यावेळी, वर्गणीदाराच्या खाती जमा असलेल्या निधीच्या रकमेतून, स्वतःच्या अथवा महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ च्या नियम २ (३) मधील कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट असलेल्या वर्गणीदाराच्या कुटुंबातील व्यक्तींच्या धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी रक्कम काढण्यास पुढील अर्टीच्या अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे:-
१) सदर धार्मिक यात्रेचा प्रत्यक्ष खर्च किंवा, खात्यावर जमा निधीच्या अर्धी रक्कम किंवा, वर्गणीदाराचे सहा महिन्यांचे वेतन यापैकी कमी असलेली रक्कम मंजूर करण्यात यावी.
२) सदर धार्मिक यात्रेच्या खर्चाची रक्कम शासन सेवेतील संपूर्ण कालावधीत फक्त एकदाच अनुज्ञेय असेल.
३. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमामध्ये याप्रमाणे सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
४. हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. असंक ६१/सेवा-६, दि. १३/०२/२०१४ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१४०५३११३१९०७२६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(पां. जो. जाधव)
उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments