मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंमलबजावणी बाबत शिक्षण आयुक्त यांचे नवीन निर्देश/सूचना/आदेश.

 महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंमलबजावणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.



राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यासाठी दि.३०,११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

२/- या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने प्रत्येक टप्प्यावरील उपक्रम हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी व करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदर्भीय पत्रान्वये विविध जबाबदा-या निश्चित करुन व सूचना तसेच व्हीसीव्दारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहेत, करुन देऊन माहिती भरण्यात येत आहे.

३/- त्याअनुषंगाने वरील अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलव्दारे टॅब उपलब्ध

१. शाळांकडून माहिती भरत असताना काही तांत्रिक अडचणी असल्यास जसे की, वेबसाईट सुरु नाही अथवा इतर तांत्रिक बाबीसाठी शिक्षणाधिकारी यांनी १. डॉ. श्रीराम पानझाडे, शिक्षण उपसंचालक (प्रशासन) मो.क्र.९४२१४७१७९९ व श्री.मुकुंद साईनकर, से.नि.एन आपसी समन्वयक मो. क्र. ७०३८९९१८३३ यांचेशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात.

२. तसेच शाळांना माहिती कशी भरावी याची माहिती होण्यासाठी युजर मॅन्युअल तयार करुन देण्यात आलेले आहे. ते सोबत जोडले असून ते वेबसाइटवर देखील उपलब्ध केलेले आहे.

३. अभियान कालावधीत प्रत्येक केंद्र स्तरावर आवश्यकतेनुसार त्या त्या केंद्रातील शाळांसाठी एक मदत कक्ष स्थापन करावा. व शाळांना माहिती भरताना व इतर येणा-या अडचणीची सोडवणूक करावी.

४. तसेच तालुका/जिल्हा / विभाग स्तरावर मदत कक्ष स्थापन करुन शासन निर्णय, दि.३०.११.२०२३ व संदर्भ क्र.४ वरील पत्रान्वये दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक स्तरावरील (तालुका, जिल्हा, मनपा, विभाग स्तर) नियुक्त सदस्य सचिव यांचा संपर्क क्रमांक व कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक याची माहिती शाळांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रसिध्द करुन ती सर्वाना कळवावी. शासन निर्णय, दिनांक ३०.११.२०२३ अन्वये गठित समिती अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली सदर नियुक्त सदस्य सचिव हे काम पाहतील.


तरी, येणा-या सर्व अडचणींची सोडवणूक करुन अभियानाची अंमलबजवणी विहित कालावधीत केली जाईल, यांची सर्वांनी दक्षता घ्यावी.


आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.


वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.