महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दिनांक पाच जानेवारी 2024 रोजी आयबीपीएस या परीक्षा घेणाऱ्या कंपनीला निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद गट सरळ सेवा पद भरती 2023 बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती-२०२३ च्या अनुषंगाने ३० संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते. त्यानुसार दि.२६.१२.२०२३ अखेर एकूण २५ संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत. परीक्षा झालेल्या एकूण २५ संवर्गापैकी "पशुधन पर्यवेक्षक" हा संवर्ग मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर २४ संवर्गाचे निकाल तयार करुन घोषित करणेची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी.
(पो.दे. देशमुख)
उप सचिव (जिल्हा परिषद आस्थापना)
महाराष्ट्र शासन
वरील परिपत्रकानुसार जिल्हा परिषद गट सरळ सेवा पद भरती 2023 मधील 30 संवर्गांपैकी 25 संवर्गांच्या परीक्षा झाल्या आहे त्यापैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग बघून इतर 24 संवर्गाच्या परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments