पुढील सत्रा पासून अशा असतील शाळांच्या वेळा शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण..

  राज्यात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळा सकाळी भरतात. यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केल्यानंतर हा विषय चर्चेला आला. आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत घोषणा केली.

पालकांसाठी चांगली बातमी, मुलांच्या शाळांची वेळ बदलली, आता या वेळेत भरणार शाळा.


महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहेत. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली. बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यापाल रमेश बैस यांनी केली होती. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.


समितीची स्थापना करणार

महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षांच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय 3 ते 10 वर्ष असते. त्यामुळे प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात, अशी सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून येत होत्या. याबाबत राज्यपाल रमेश बैस यांनीच सूचना केली. यामुळे आता दुसरीपर्यंतची प्राथमिक शाळा नऊ वाजता होणार आहे. परंतु इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. शाळांची वेळ बदलली असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळणार आहे.

मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञ असणार समितीत

बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते. आता याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. दीपक केसरकर म्हणाले की, राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.