राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे/प्रस्ताव/माहिती पीडीएफ डाउनलोड

 शिक्षण संचालक योजना यांनी दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत अंतर्गत प्रस्तावित नमुन्यात सादर करणे व अनुदानाची मागणी विहित नमुन्यात सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या होत्या



राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासनाने शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर २०१३ अन्वये सदर योजना सन २०१२-१३ पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. सदर शासन निर्णयान्वये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाया मुला-मुलीसाठी सदर योजना सन २०१३-१४ पासून नियमित राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक २१ जून, २०२२ नुसार सुधारीत शासन निर्णय काढून सदर योजना राबविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सुधारीत योजनेअंर्तत प्रस्ताव निकाल काढण्यासाठी प्रत्येक जिल्हयात खालीलप्रमाणे समिती गठीत करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.


१. जिल्हाधिकारी -अध्यक्ष

२. मुख्यकार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) / महापालिका उपआयुक्त -सदस्य

३. पोलिस अधीक्षक/पोलीस उपायुक्त (प्रशासन) -सदस्य

४. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) /प्रशासन अधिकारी (शिक्षण) / शिक्षण निरीक्षक -सदस्य

 ५. जिल्हा आरोग्य अधिकारी/सिव्हिल सर्जन/सक्षम वैद्यकीय अधिकारी -सदस्य

६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/शिक्षण निरीक्षक) /प्रशासन अधिकारी (शिक्षण)- सदस्य सचिव

शासन निर्णय दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१३ नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-

विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू :- ७५००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा) :-५००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव/१ डोळा) कायम निकामी : ३००००/- अपंगत्वाच्या कारणाबाबतचे सिव्हिल सर्जन यांचे कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र

शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२२ नुसार लाभार्थी निवडीचे निकष :-

विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू :- १५००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव/२ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा) :-१०००००/-

अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव/१ डोळ्त्र कायम निकामी):- ७५०००/- 

विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यासः प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १,००,०००/- विद्यार्थी आजारी पडून, सर्प दंशाने किंवा पोहताना मृत्यु झाल्यास :-१५००००/-


विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास (क्रिडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेता धक्का, विज पडून): प्रत्यक्ष हॉस्पीटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १,००,०००/- शस्त्रक्रिये बाबतचे हॉस्पिटलचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह.

उपरोक्त नमूद केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीसह लाभार्थ्यांची यादी व सभेचे इतिवृत्तासह अनुदान मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे मूळ प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्याची गरज नाही. असे असतांनाही राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेबाबतची अनुदानाची मागणी करतांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) यांचे कडून जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीसह लाभार्थ्यांची यादी व सभेचे इतिवृत्तासह अनुदान मंजूरीसाठी प्रस्ताव सादर केले जात नाही. तसेच अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर करतांना प्रत्येक जिल्हयाकडून वेगवेगळया नमुन्यामध्ये माहिती सादर केली जात आहे. सदरची माहिती ही सॉप्ट कॉपी मध्ये सादर केली जात नाही. व ईमेल वर सुध्दा सुस्पष्ट कॉपी मेल केली जात नाही. त्यामुळे जिल्हयाकडून प्राप्त माहितीची तपासणी करुन एकत्रिकरण करण्यास अडचण निर्माण होत आहे.

सबब राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माहिती सादर करण्याच्या पध्दतीमध्ये एकसूत्रता आणण्याचे दृष्टीने या पत्रासोबत राजीव गांधी विद्याथी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत लाभ मिळणेसाठी जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करावयाच्या परिपूर्ण विहित नमूना आपणास उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर नमून्यावर उपरोक्त नमूद जिल्हास्तरीय समितीच्या स्वाक्षरी व शिफारशीसह लाभार्थ्यांची यादी व सभेचे इतिवृत्त जिल्हास्तरीय समितीच्या स्वाक्षरीसह सादर करावे, तसेच वर्ष निहाय अनुदान मंजूरीसाठीचे प्रस्ताव आपले स्वाक्षरीने (DV-TTSurekh) या फॉन्ट मध्येच हार्ड कॉपी व सॉप्ट मध्ये सादर करणे आवश्यक राहिल. या नमून्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नमून्यातील व इतर कोणत्याही फॉन्ट मधील माहिती ही स्विकारली जाणार नाही. आपण चुकीच्या नमून्यात माहिती सादर केल्यामुळे आपल्या जिल्हयातील लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोद घ्यावी. अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करतांना खालील नमूद बाबींचे काटेकोरपणे पालन करावे.

शासन निर्णय दिनांक ०१.१०.२०१३ व शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२२ नुसार लाभार्थ्यांसाठी अनुदानाची १) मागणी करण्यात यावी. २) जिल्हास्तरीय समितीच्या स्वाक्षरी व शिफारशीसह लाभार्थ्यांची यादी सोबत जोडलेल्या विहित नमून्यातच सादर करावी व जिल्हास्तरीय समितीच्या स्वाक्षरीसहसभेचे इतिवृत्त सादर करावे.

३) शिक्षणाधिकारी (योजना) यांनी वर्ष निहाय अनुदान मंजुरीची यादी आपले स्वाक्षरीने (DV-TTSurekh) या फॉन्ट मध्येच हार्ड कॉपी व सॉप्ट कॉपी मध्ये इतिवृत्तासह सादर करावेत.

४) आपले कार्यालयाकडे अनुदानाची रक्कम शिल्लक राहत असल्यास ती शिक्षण संचालनालय (योजना) यांचे खात्यावर समर्पित करावी.

५) जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना शिक्षण संचालनालय (योजना) व शासनाची मंजूरी असल्याशिवाय परस्पर आपले स्तरावरुन लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करुन वितरीत करण्यात येऊ नये.

६) २०२०-२१,२०२१-२२, व २०२२-२३ या वर्षातील लाभार्थ्यांची यादी सादर करणेपूर्वी सदर लाभार्थ्यांना यापूर्वी अनुदान मंजूर करुन वितरीत करण्यात आलेले आहे अथवा नाही याबाबतची खातरजमा करुन मगच अनुदानाची मागणी करावी,

७) यापुढे सदर योजनेबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करतांना उपयोगिता प्रमाणपत्रासोबत अनुदान मिळालेबाबत लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीसह यादी सादर करावी.

८) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे कार्यालयाकडून प्रलंबित प्रस्ताव आपले कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावास शासनाची मंजूरी घेणे आवश्यक आहे. अशा प्रस्तावांना शासनाची मंजूरी न घेता आपले स्तरावरुन परस्पर अनुदान वितरीत करण्यात येऊ नये.

९) संचालनालयाकडून अनुदान वितरण आदेशा सोबत देण्यात आलेल्या व अनदान मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या लाभाच्यांच्या व्यतिरीक्त इतर कोणत्याही लाभार्थ्यांस परस्पर अनुदान वितरण करण्ण्यात येऊ नये. १०) शासनाचे मंजुरी नसतांना आपण लाभार्थ्यास परस्पर अनुदान वितरण केल्यास सदरची बाब ही वित्तीय अनियमिता समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सोबतः-विहित नमूना व तपासणी सूची जोडली आहे. (हार्ड कॉपी व सॉप्ट कॉपी)


(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक

संचालनालय, (योजना)

महाराष्ट्र राज्य पुणे-१


संपूर्ण परिपत्रक माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.