PGI म्हणजे काय? कार्य प्रतवारी दर्शकांमध्ये (Performance Grading Index) सुधारणा घडवून आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

 दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी भारत सरकारने वयवर्षे 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 पासून लागू केला आहे, हे आपणास विदितच आहे. याच अनुषंगाने प्रत्येक मुलाच्या अध्ययन क्षमता, अध्ययन निष्पत्ती व फलश्रुतीचे मूल्यांकन करण्यासाठी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून कार्य प्रतवारी दर्शके (Performance Grading Index) निर्धारीत करण्यात आलेली आहेत. सन २०२१- २२ या वर्षासाठीचा PGI मधील गुणानुक्रम घोषित करण्यात आले असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा ३४ वा क्रमांक आहे. ही बाब खेदजनक आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता व दर्जावाढीसाठी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी या दर्शकांचे विस्तृत अध्ययन करून सर्व यंत्राणांनी एकत्रितरित्या आवश्यक त्या उपाय योजना करण्याची गरज आहे. PGI मध्ये जिल्हास्तरासाठी एकूण ८३ दर्शकांचा समावेश असून त्यांची विभागणी व अधिभार खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.


सदर निदर्शकांसाठी युडायस, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS), समग्र शिक्षा : वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक, माध्यान्ह भेजन योजना (MDM), शगुन, फीट इंडीया, स्वच्छ भारत, एक भारत श्रेष्ठ भारत व PFMS पोर्टलवर सादर करण्यात आलेली माहिती इत्यादी विविध स्त्रोतांचा वापर करण्यात येतो. सुलभ संदर्भासाठी ८३ दर्शकांची यादी स्वतंत्रपणे संलग्नित करण्यात येत आहे. यापुढे राज्याप्रमाणेच जिल्ह्यांची सुध्दा कार्य प्रतवारी आधारे मूल्यांकन प्रक्रीया करण्यात येणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या प्रगतीवरच राज्याची एकत्रित प्रगती साध्य होणार आहे. त्याअनुषंगाने बुलडाणा जिल्ह्याची कामगिरी ही उल्लेखनीय राहील यासाठी विविध स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करणे अपरिहार्य आहे. करीता खालीलप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही सर्व घटकांनी सामूहीकरित्या करणे आवश्यक आहे. उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे या मध्ये मुख्यतः सहा क्षेत्र असून त्यातील पाच क्षेत्र पूर्णतः शैक्षणिक बाबींशी व शालेय संबधित आहे. तर दुसरा भाग हा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनापासून जिल्हा प्रशासनाशी संबंधित प्रशासकीय बाबींचा आहे.

 1) क्षेत्र एक : फलनिष्पत्ती (Outcomes) यामध्ये खालील उपघटकांचा समावेश होतो.

अ) अध्ययन फलनिष्पत्ती व गुणवत्ता (Learning Outcomes)

आ) शैक्षणिक सुविधा (Access Outcomes)

शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती हा यातील सर्वाधिक महत्वाचा भाग असून यामध्ये एकूण २५ दर्शकांचा समावेश आहे. यापैकी १२ दर्शके राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणाच्या आधारे गणल्या जाणार असून ५ दर्शकांसाठी युडायस माहिती चा उपयोग होणार आहे. तर उर्वरीत ८ दर्शकांची गणना ही शाळास्तरावरून प्राप्त माहितीच्या आधारे होणार आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वृध्दींगत करणे व त्यासाठी विद्यार्थी केंद्रीत अध्यापन तंत्रांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. करीता विद्यार्थ्यांच्या त्या त्या इयत्तेकरीता विहित केलेल्या किमान अध्ययन क्षमता विकसति करण्याच्या दृष्टीने शालेय पातळीवर ज्ञान रचनावादी अध्यापन पध्दतीचा वापर अभिप्रेत आहे. राष्ट्रीय संपादणूक सव्हेक्षणामध्ये भाषा, गणित व विज्ञान या विषयांनूसार श्रेणी निश्चित केली जात असल्यामुळे या विषयांबाबत अधिक कृतियुक्त अध्यापन पध्दतीचा वापर केला जाणे आवश्यक आहे.


II) क्षेत्र दोन वर्गअध्यापन व शैक्षणिक आंतरक्रीया (Classroom Transactions) यामध्ये प्रामुख्याने वर्गातील शैक्षणिक अध्यापनाचे व्यवस्थापन, अध्ययनपूरक उपक्रम, स्वच्छ भारत आणि जलसुरक्षा, फीट इंडीया, एक भारत श्रेष्ठ भारत, नागरिक कर्तव्य पालन अभियान/ संविधान दिवस इत्यादी ठळक खालील उपघटकांचा समावेश होतो. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास प्रामिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. त्यानुसार प्रत्येक मुल शाळेत आले पाहिजे, टिकले पाहिजे आणि शिकले पाहिले. त्यासाठी आवश्यक मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, वाहतूक सुविधा इत्यादी शैक्षणिक सुविधा बालकांना उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र तरीही विद्याथ्यांचे पटनोंदणी गुणोत्तर, टिकवणूक दर, दर, विशेष गरजाधिष्ठीत मुलांचा नियमित शाळा प्रवेश, गळती थांबविणे याबाबत पूर्णतः यश आलेले नाही. त्यासाठी प्रभावी वर्ग अध्यापन व आनंददायी शैक्षणिक आंतरक्रीया घडून येणे आवश्यक आहे.


1. भाषा विषयाचे अध्यापना करतांना अक्षरे, शब्द चित्रे, वाचन कार्ड, संवाद, श्रुतलेखन अशा विविध आधारे अध्ययन अनुभूती देण्यात यावी. त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे गद्य व पद्य भाग लक्षात घेऊन अनुषंगिक ध्वनीफिती, चित्राफिर्तीचा वापर करण्यात यावा. करीता शालेय स्तरावर उपलब्ध असलेली दृकश्राव्य साधने सदैव सुस्थितीत व अध्यापना प्रक्रीयेत वापरात राहतील याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच सर्व शिक्षकांनी वर्ग अध्यापनात त्याचा वापर करण्याच्य दृष्टीने नियोजन करावे. अनेक शाळांमध्ये इंग्रजी भाषा विषयक साहित्य साधनांची पेटी उपलब्ध असून त्याचा देखील नियमित वापर करण्यात यावा.


2. गणित व विज्ञान या विषयांचे अध्यापन करतांना गणित व विज्ञान पेटी प्रभावीपणे अध्यापनासाठी वापरावी. तसेच इयत्तानुरूप अभ्यासक्रम लक्षात घेता विज्ञानातील सहज व साधे प्रयोग विद्यार्थ्यांसमोर करून त्यांना सुध्दा ते करण्याबाबतची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. शाळांमध्ये उपलब्ध असलेले विज्ञान प्रयोगशाळा साहित्याची निगा राखून त्यांचा यथोचित वापर विज्ञान शिक्षकांनी करावा. तसेच गणित अध्यापनासाठी सुध्दा उपलब्ध साहित्याचा प्रभावी वापर करण्यात यावा. तसेच शालेय परिसर व इमारतीचा अध्ययन साहित्य म्हणून वापर करून प्रत्यक्ष जीवनातील अनुभव द्यावेत.

3. शालेय अभ्यासक्रमातील कला, कार्यानुभव, शरीरिक शिक्षण व आरोग्य या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे छंद जोपासता यावे यासाठी रंगकाम, कागदकाम, मातीकाम, चित्रकला, नाट्य, गायन इत्यादी विविध उपक्रमांचे नियोजन करून अध्ययन-अध्यापन प्रक्रीया आनंददायी करण्यात यावी.

4. वर्ग अध्यापनात विद्यार्थी शिक्षक आंतरक्रीया घडून यावी यासाठी आनंददायी पध्दतीचा वापर अपेक्षित आहे. त्यासाठी उपलब्ध शैक्षणिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याबाबत शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने प्रयत्न करावेत. आवश्यक वाटल्यास तंत्रस्नेही शिक्षकांचे सहकार्य घेण्यात यावे, वेळप्रसंगी जिल्हा कार्यालयाकडे गरजाधिष्ठीत प्रशिक्षणाची मागणी करावी, 

5. अध्ययन क्षमता संपादणूकीत अपेक्षित प्रगती ची गती कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक अध्यापन करण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या अध्ध्यनाचा स्तर लक्षात यावा यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यामापन पध्दतीमध्ये विहित केलेल्या विविध साधनांचा व तंत्रांचा वापर करण्यात यावा,

6. प्रादेशिक प्राधिकरणाच्या माध्यमातून तसेच जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणान्या नैदानिक व संकलित चाचण्यांचा वापर करून प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयक मूल्यमापन नियमित करावे.

7. दर तीन वर्षानंतर राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणाची प्रक्रीया भारत सरकारकडून केल्या जाते. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याच्या अध्ययन निष्पत्ती व शैक्षणिक गुणवत्तावाढीमध्ये विशेष बदल झाल्याचे निदर्शनास येणे अभिप्रेत असून त्यासाठी संयुक्तरित्या समन्वय साधून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

या भागात एकूण २४ दर्शकांचासमावेश आहे. त्यापैकी 7 दर्शके ही दरवर्षी संकलित केल्या जाणाऱ्या युडायस माहितीवरून गणल्या जाणार असून उर्वरीत १७ दर्शके ही आपल्या स्तरावरून विविध उपक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे गणले जाणारे आहे. करीता या दर्शकांच्या अनुषंगाने शाळा स्तरावर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


1. शैक्षणिक पंजिका (VER) अद्यावत ठेवून 100 टक्के पटनोंदणीचे उद्दीष्ट्य पूर्ण होईल व एक ही मूल शाळाबाह्य राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

2. शाळेत सतत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांबाबत शाळा व्यवस्थापन समितीला माहिती देऊन पालकांशी संपर्क साधावा व मुलांना नियमित शाळेत पाठविण्याबाबत सांगावे.

3. जे पालक उदरनिर्वाहासाठी स्थलांतरीत होऊन जात असतील अशा पालकांना त्यांची मुले शाळेत रहावी यासाठी समुपदेशन करावे.

10


काही पालकांना मुले तिथे ठेवण्यास शक्य नसल्यास अशा मुलांची माहिती संकलित करून


4. स्थलांतरीत पालकांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वसतीगृह सुरू करण्याबाबतची शक्यता


पाडताळण्यात यावी,


5. जी मुले शाळा नसलेल्या वस्ती वाड्यातून येत असतील अशा मुलांना निकषांची पूर्तता करीत असल्यास परिवहन/वाहतूक सुविधा देणे शक्य आहे का याबाबत खात्री करावी.


6. विशेष गरजाधिष्ठीत मुलांच्य बाबतीत अनुपस्थितीच्या कारणांचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. अशावेळी त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना नियमित शालेय प्रवाहातील सहभागाचे महत्व


पटवून सांगण्यात यावे. त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी गट साधन केंद्रांतर्गत कार्यरत फिरते विशेष शिक्षकांची मदत घ्यावी.


7. शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना नियमित शालेय प्रवाहात दाखल करून घेण्यासाठी तसेच टिकवून ठेवण्यासाठी बालरक्षक चळवळीचा भाग होऊन अशा विद्यार्थ्यांचा सातत्याने


शोध घ्यावा व त्यांना दाखल करून घ्यावे.


III) क्षेत्र तीन : भौतिक सुविधा व विद्यार्थी निश्चिती (Infrastructure Facilities, Student Entitlement)


विद्यार्थी हे दररोज 6 ते 7 तास शालेय परिसरात वावरत असतात, त्यांच्यामध्ये शाळेबद्दलची गोडी वृध्दींगत होणे हे त्या शाळेचा स्वच्छ, सुरक्षित व रमणीय परिसर, मुलभूत भौतिक सुविधांची उपलब्धता, अध्ययन पूरक साहित्य साधने, क्रीडा साहित्य, दृकश्राव्य साधने, पूरक वाचनासाठी पुस्तके इत्यादी अनेक बाबींवर अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या बाबींमध्ये प्रत्येक शाळा दक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे भोतिक सुविधांना अनन्यसाधारण महत्व असून यामध्ये एकूण 1२ दर्शकांचा समावेश आहे. यापैकी सहा दशंके ही युडायस मधील माहितीच्या आधारे गणल्या जाणार असून अन्य ६ दर्शके आपल्याकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे गणले जाणारे आहे. त्यासाठी शालेय स्तरावर खालील बार्बीकडे प्राधान्याने लक्ष दिल्या जावे. 1. शालेय परिसर हा स्वच्छ व आल्हाददायक राहील याबाबत दक्षता घेण्यात यावी.

2. शालेय इमारत, वर्गखोल्या, मुला-मुलींची स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रॅप, क्रीडांगण, यांची नियमित देखभाल व दुरूस्ती करण्यात यावी.

3. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून घेण्यात यावे, तसेच स्वच्छता गृहांची नियमित सफाई करण्यात यावी.

4. माध्यान्ह भोजनापूर्वी व नंतर विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याची व्यवस्था असावी.

5. शालेय स्वयंपाक गृहातील स्वच्छता दुर्लक्षित करण्यात येऊ नये, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ धुतलेली व नेटकेपणाने ठेवलेली असावीत.

6. पोषण आहारासाठी उपलब्ध होणारे साहित्याची साठवणूक योग्य प्रकारे असावी, त्यामध्ये वापरण्यात येणारा भाजीपाला हा स्वच्छ करूनच उपयोगात आणल्या जावा.

7. विद्यार्थ्यांना चवदार भोजन मिळेल यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे प्रमाण पुरेसे प्रमाणबध्द ठेवण्यात यावे. दररोज च्या भोजनात बदल करून विहित केलेल्या वैविध्यपूर्ण मेनूप्रमाणे भोजन असावे. पूरक पोषण आहार देतांना ऋतूमानाप्रमाणे उपलब्ध फळांचा व पोषक खाद्यपदार्थांचेच वितरण व्हावे, यामुळे विद्यार्थी आवडीने माध्यान्ह भोजन योजनेचा नियमित लाभ घेतील.

8. विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा यांची नियमित देखभाल दुरूस्ती करून ते विद्यार्थ्यांना अध्यापन करतांना वापरात आणवे, तसेच विद्यार्थ्यांना हाताळण्याची संधी सुध्दा देण्यात यावी.

9. वाचन कक्ष तयार करून विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद व गोडी निर्माण व्हावी यासाठी पूरक वाचनाची पुस्तके वयानुसरूप उपलब्ध करून देण्यात यावी. शाळेतील बालवाचनालयातील ग्रंथसंपदा वैविध्यपूर्ण व ज्ञानसंपन्नता देणारी राहिल अशा पध्दतीने विकसित करावी. 10. विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणारी क्रमिक पाठ्यपुस्तके व गणवेश विहित वेळेत उपलब्ध करून द्यावेत. त्यामधून कोणताही लाभार्थी विद्यार्थी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

11. तसेच दरवर्षी शालेय स्तरावरून सादर करण्यात येणाऱ्या युडायस च्या माहिती संकलन प्रपत्रातील भाग दोन मध्ये भौतिक सुविधांबाबत विचारण्यात आलेली माहिती नॉदिवतांना वस्तुनिष्ठ व अचूकरित्या नोंदविण्यात यावी.


IV) क्षेत्र चार : शाळा सुरक्षा व बाल संरक्षण (School Safety & Child Protection) - 

शाळेमध्ये समाजातील सर्व घटकांतील विद्यार्थी दाखल असतात. या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास हेच अध्ययन अध्यापन प्रक्रीयेचे अंतिम उद्दीष्ट्य असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययनातील गती ही कमी अधिक असू शकते. विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती, सभोवतालचे वातावरण इत्यादी बाबी सुध्दा विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रीयेवर अप्रत्यक्ष परिणामकारक ठरत असतात. मात्र शालेय वातावरण हे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सकारात्मक ठरते. करीता प्रत्येक विद्यार्थ्यांस अध्ययनाच्या समतापूर्ण समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विशेषतः बंचित, दुर्बल व विशेष गरजाधिष्ठीत बालकांच्या दृष्टीने ही एक महत्वपूर्ण बाब आहे. याअनुषंगाने एकूण ०७ कार्य प्रतवारी दर्शकांचा समावेश आहे. ही सर्व दशंके सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच त्यांची सुरक्षा व संरक्षण या महत्वपूर्ण बाबीशी संबंधित आहेत. 7 कार्य प्रतवारी दर्शक ही आपल्यास्तरावरून प्राप्त माहितीच्या आधारे गणले जाणारे आहेत. या दर्शकांच्या अनुषंगाने शालेय पातळीवर खालील बाबीकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

1. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण उपलब्ध करून देतांना सर्व विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या समान संधी उपलब्ध् करून देणे आवश्यक आहे. वंचित, दुर्बल व विशेष गरजाधिष्ठीत विद्याथ्यांची अध्ययन गती लक्षात घेता इतर सर्व साधारण विद्याथ्यांबरोबर आणण्यासाठी त्यांच्या गतीप्रमाणे अध्यापन प्रक्रीया सुलभ व सहज राहील याकडे शिक्षकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. या परिपत्रकातील भाग अ मध्ये उद्धृत केल्याप्रमाणे अध्ययन फलनिष्पत्ती व गुणवत्तेच्या बाबतीत वंचित, दुर्बल व विशेष गरजाधिष्ठीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणताही भेदभाव होणार नाही तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती ही सर्व विद्यार्थ्यांप्रमाणेच राहोल याकडे लक्ष देण्यात यावे, अशा गटातील विद्यार्थी किमान क्षमता संपादनात मागे पडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना सोईस्कर ठरतील अशा अध्यापना पद्धतीचा वापर करावा. तसेच उपचारात्मक अध्यापनावर भर देण्यात यावा, त्यासाठी आवश्यकता वाटल्यास पालकांच्या भेटी घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात यावे. या विद्यार्थ्यांच्या भाषा, विज्ञान व गणित या विषयातील प्रगतीकडे सुध्दा विशेषत्वाने लक्ष देण्यात यावे.

2. विशेष गरजाधिष्ठीत मुलांच्याबाबतीत संवेदनाशीलता महत्वपूर्ण असून अशा विद्यार्थ्यांना नियमित शालेय प्रवाहात टिकवून ठेवणे हे एक आव्हान असते. या मुलांच्या विशेष गरजा ह्या अनुषंगिक साहित्य साधने, उपचार व विशेष अध्यापन पध्दतीच्या अनुषंगाने असू शकतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत तंत्रशुध्द मार्गाने विचार करणे आवश्यक असते. असा प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असू शकतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची केस स्टडी करून त्याच्या अध्ययन प्रक्रीयेत असणाऱ्या अडथळ्यांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यासाठी शिक्षकांनी फिरते विशेष शिक्षक अथवा गट साधन केंद्रात कार्यरत विशेष साधन व्यक्ती यांच्या सहकार्याने शैक्षणिक प्रक्रीयोतील अडथळे दूर करावेत.

3. या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या साहित्य-सुविधा व संदर्भिय सेवांबाबतच भितीमुक्त शालेय वातवारण, सुरक्षा व संरक्षण यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्या उपलब्ध करून घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्राणांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात यावा. तसेच त्यासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.

V) क्षेत्र पाच : डिजिटल लर्निंग (Digital Learning)-

आजचे युग हे माहिती तंत्राज्ञानाचे युग समजल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या अनेक संकल्पनांचे अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर करून सहज व सोप्या पध्दतीने करणे शक्य आहे, त्यासाठी संगणक प्रयोगशाळा, डिजिटल क्लास रूम व इ लर्निंग प्रध्दतीचा अवलंब करणे अपेक्षित आहे. करीता प्रत्येक शाळा हो डिजिटल स्कुल होईल यासाठी सामाजिक सहभाग मिळवून शाळा डिजिटल करण्याबाबत पुढाकार घेण्यात यावा, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक चित्राफितीचे व आज्ञावलींचे संकलन सुध्दा करण्यात यावे.


VI) क्षेत्र : शासन-व्यवस्थापन (Governence & Management)

शासन पध्दती :- हा भाग सुव्यवस्थापनाच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनापासून तर जिल्हा प्रशासनाशो संबंधित प्रशासकीय बाबींचा आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन, समूह साधन केंद्र, गट साधन केंद्र, जिल्हा साधन गट व शिक्षण विभाग या सर्व घटकांची यामध्ये संयुक्त भुमिका आहे. यामध्ये एकूण १० कार्य प्रतवारी दर्शकांचा समावेश असून त्यापैकी सर्वाधिक ९ दर्शके ही शालेय प्रशासनाकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे गणले जाणार आहेत. तर 7 दर्शके ही युडायस माहितीच्या आधारे गणल्या जाणार असून । दर्शक हे युडायस प्रणालीच्या माध्यमातून गणल्या जाणार आहे. त्या अनुषंगाने शालेय स्तरापासून ते गटस्तरापर्यंत खालील बाबींसंदर्भात कार्यवाही आवश्यक आहे.

1. विद्यार्थ्यांची 100 टक्के आधार नोंदणी आवश्यक असून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकणा-या Online Child Tracking System साठी ते उपयुक्त ठरणार आहे. म्हणून सर्व शाळांनी आपल्या शाळेतील 100 टक्के विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी झाली आहे कींवा कसे याबाबत खात्री करावी. नसल्यास अशा विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून घेण्यात यावी. त्यासाठी गट साधन केंद्रावर उपलब्ध करून दिल्या जाणा-या आधार कीट चा वापर करण्यात यावा.

2. विदयार्थ्यांच्या सातत्यापूर्ण शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांची शाळेतील उपस्थिती हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या शालेय उपस्थितीचे संनियंत्रण होणे गरजेचे आहे. करीता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यात यावी. त्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी समाज सहभागातून बायोमेट्रीक / इलेक्टॉनीक्स उपकरणांचो उपलब्धता करून घेण्याचा प्रयत्न शालेय व्यवस्थापनाने करावा.

3. प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी शालेय वेळेमध्ये आपले ओळखपत्र वापरावे.

4. प्रगत व अप्रगत शाळांमध्ये परस्पर आंतरक्रीया व अनुभव कथन घडून येण्याच्या दृष्टीने प्रगत शाळेसोबत जोडी करून (Twinning Schools) शालेय परस्पर सहकार्य व शैक्षणिक अध्यापन देवाण घेवाण सुलभ व सहजपध्दतीने घडून येईल यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण-शहरी भगातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, निवासी अनिवासी अशा विविध माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये भागिदारी करण्यात यावे, यासाठीचे नियोजन विषय साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा करून अंतिम करून द्यावे. तसेच त्यानंतर दिसून येणा-या परिणामांबाबत आढावा घेऊन अहवाल व शिफारशी वरीष्ठ कार्यालयाकडे कराव्यात.

5. शालेय विद्याथ्यांच्या अध्ययन अध्यापनातील अडचणी, अनुषंगिक सुविधा, शालेय वातावरण, शैक्षणिक साधनांची उपलब्धता, इत्यादी सर्व बाबीसंदर्भात शिक्षकांमध्ये शालेय संवाद घडवून आणण्यासाठी मुख्याध्यापकांनी नियमित बैठक घेऊन आढावा घ्यावा. तसेच शिक्षकांमधून सुचविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबतचे नियोजन करावे.

6. शाळेस प्राप्त होणारा विविध उपक्रमांचा निधी व झालेला खर्च याबाबतचा तपशिल दर्शविणारा फलक सामाजिक अंकेक्षणाचा भग म्हणून शाळेने सर्व पालकांच्या माहितीसाठी प्रदर्शित करावा.

7. शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणाऱ्या शिक्षकांची निश्चिती करण्यात यावी, तसेच त्यांच्या प्रशिक्षणानंतर शाळेतील इतर शिक्षकांना सुध्दा त्याबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने शालेय स्तरावर चर्चासत्र आयोजित करावे. समूह साधन केंद्र स्तरावर सुध्दा केंद्रप्रमुख यांनी अशा स्वरूपातील नियोजन करावे. तसेच केंद्रांतर्गत नियमित भेटी देतांना शिक्षकांशी संवाद साधून त्यांना येणान्या अडी अडचणीबाबत माहिती घ्यावी.

8. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यापूर्वीच शासनाने निर्देशित केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी.

9. 25 टक्के प्रवेश प्रक्रीया बंधनकारक असलेल्या विना अनुदानीत शाळांनी निर्धारीत केलेल शुल्क शाळेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावे.

10. विविध योजनांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्रासह अंतिम हिशेब व अखर्चित रकमेचा परतावा करण्यात यावा.

11. विषय साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी नियमितपणे शाळा भेटी करून शालेय निरीक्षण तथा तपासणी करावी. तसेच उपरोक्त प्रमाणे सर्व विषयांचा आढावा घेऊन शेरा नोंद पुस्तिकेत सुधारणंच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या व करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्टस्वरूपात मार्गदर्शक सुचना द्याव्यात. या भेटीना विशेष महत्व असून त्यांची नोंद दर्शकांची गणना करतांना युडायस या प्रणालीमधून होणार आहे. वरील सर्व पर्यवेक्षकीय अधिका-यांच्या भेटींची स्वतंत्र गणना केल्या जाणार आहे.

12. भारत सरकारने उल्लेखनीय शैक्षणिक उपक्रम, यशोगाथा, केस स्टडीज, टेस्टी मोनिअल्स संकलित करून त्यांची आदान प्रदान घडून येण्यासाठी शगुन हे पोर्टल सुरू केलेले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील उपरोक्त प्रकारची सर्व माहिती अधिकाधिक देता येईल यासाठी विशेष उल्लेखनीय उपक्रमांच्या चित्राफिती, वृत्तकथा, वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेले लेख, इत्यादी बाबी इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून तयार करण्यात येऊन सादर कराव्यात. शाळा स्तरावर हे करणे शक्य नसल्यास केंद्रप्रमुख व गअशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने अशा उपक्रमांचे चित्रण करून गटशिक्षणाधिकारी यांनी दरमहा आपल्या तालुक्याची एक यशोगाथा सादर करावी. त्यासाठी विशेष साधन व्यक्तींची मदत घेण्यात यावी. तसेच अतिशय प्रभावी व लोकप्रिय उपक्रम असल्यास जिल्हास्तरावरून विशेष मदत घेण्यात यावी.

या शैक्षणिक सत्रात सर्व शाळांच्या गुणवत्ता व दर्जावाढीसाठी एकत्रित व संघटीत प्रयत्नांची आवश्यकता असून जिल्ह्याचा कार्य प्रतवारी दर्शकांक पहिल्या श्रेणीत राहील यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात यावे.

वरील प्रकारचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.