अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी द्यावयाचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रे दस्तऐवज या संदर्भातील सर्व शासन निर्णय सर्वसमावेशक सुधारित धोरण 17/07/2025

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. 


परिपत्रक:-

अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण दि.१७ जुलै, २०२५ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले असून संदर्भाधीन क्र.२ येथील परिपत्रकान्वये अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने उपस्थित होणारे प्रश्न व त्यांची उत्तरे (FAQ) निर्गमित करण्यात आली आहेत.

सुधारित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार कार्यवाही करताना उद्भवणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत विविध नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी विनंती केली आहे. नियुक्ती प्राधिकाऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत उपस्थित केलेल्या मुद्ये व त्यावरील स्पष्टीकरण याबाबतचे परिशिष्ट-अ सोबत जोडण्यात आले आहे.

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०८२२१८१५३००००७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


SUCHITA MOHAN MAHADIK

(सुचिता महाडिक)

 सह सचिव, महाराष्ट्र शासन


प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीस्तव :-

१) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव यांना

विनंती करण्यात येते की, त्यांच्या विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयामधील गट-क व गट-ड च्या सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सदर परिपत्रक अवगत करावे.

२) सर्व विभागीय आयुक्त

३) सर्व जिल्हाधिकारी

परिशिष्टांसह संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


 महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 17 जुलै 2025 रोजी अनुकंपा नियुक्ती चे सर्व साधारण सुधारित धोरण शासन निर्णय निर्गमित करून निर्धारित केले आहे.

प्रस्तावना:-

अनुकंपा नियुक्ती योजना १९७६ पासून लागू करण्यात आली आहे. सन १९९४ मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करुन नवीन सुधारीत योजना निर्गमित करण्यात आली. त्यानंतर सन १९९४ च्या योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात येते.

सदर अनुकंपा धोरणात खालील प्रयोजनास्तव सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.

१) न्यायालयीन अडचणी प्रामुख्याने खालील न्यायालयीन प्रकरणे उद्भवली आहेत.

कुटुंबास अर्ज सादर करण्यास झालेला विलंब क्षमापित करणे.

प्रतिक्षासूचीवरील उमेदवार बदलणे,

प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्याने वगळल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तीचे नाव समाविष्ट करणे,

या विविध न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या Larger Bench ने रिट याचिका क्र.३७०१/२०२२ (श्रीम. कल्पना विलास तारम व इतर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) व इतर संलग्न रिट याचिकांमध्ये दि.२८.०५.२०२४ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती योजना सुधारित करणे आवश्यक आहे.

२) अनुकंपा नियुक्तीच्या कार्यवाहीतील विलंब अनुकंपा नियुक्तीस विलंब होत असल्याने प्रतिक्षासूचीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे. तरी कार्यवाहीतील विलंब टाळण्यासाठी काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची गरज निदर्शनास आली.

३) योजनेचे सुलभीकरण आवश्यक सन १९९४ पासून आजपर्यंत वेळोवेळी या विषयाबाबत एकूण ४५ आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना हे विविध आदेश विचारात घ्यावे लागतात. तरी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरुपात मिळावेत यास्तव सर्व आदेशांचे एकत्रिकरण करणे,

उपरोक्त कारणमीमांसा विचारात घेवून, प्रचलित अनुकंपा योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

उपरोक्त प्रस्तावना विचारात घेवून, संदर्भाधीन सर्व शासन आदेश अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात येत आहे.

1) अनुकंपा नियुक्ती धोरणातील मुलभूत तरतूदी -

१ योजनेचे उद्दिष्ट

शासकीय सेवेत कार्यरत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्यास, त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबियांना सावरण्यासाठी, कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देणे.

२ योजना कोणास लागू आहे.

गट-अ ते गट-ड मधील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस ही योजना लागू आहे.

परंतु असे की, दिवंगत कर्मचाऱ्याचा पती पत्नी शासकीय सेवेत कार्यरत असतील तर त्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही.

परंतु आणखी असे की, दिनांक ३१ डिसेंबर, २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही.

शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. तसेच बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा

३ अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुज्ञेय आहे.

नियुक्ती अनुज्ञेय आहे.

४ कोणत्या पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.

गट-क व गट ड मधील ज्या ज्या संवर्गात सरळसेवा नियुक्तीचा मार्ग विहित केला आहेत्या सर्व संवर्गाच्या सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.

५ अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य कुटुंबातील सदस्य हे खालील प्राधान्यक्रमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. त्यामुळे कुटुंबातील ज्या सदस्यास नियुक्ती द्यावयाची त्याने खालीलप्रमाणे ना-हरकत प्रमाणपत्र परिशिष्ट-ड मधील नमुन्यामध्ये देणे आवश्यक आहे.


प्राधान्यक्रम

कायदेशीर पत्नी/पती

2

मुलगा/मुलगी (अविवाहित/विवाहित ),

3

मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला

मुलगा/मुलगी (अविवाहित/विवाहित),

4

घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता

मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण

5

दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा हयात

नसेल तर त्याची सून

6

केवळ दिवंगत अविवाहित शासकीय

कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवंलबून असणारा भाऊ किंवा बहीण

इतर सदस्य


६ अनुकंपा नियुक्तीसाठीची पात्रता

किमान वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण

अ वयोमर्यादा

कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत

ब सेवाप्रवेश नियमात

संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहीत केलेली शैक्षणिक केलेली अर्हता, तांत्रिक अर्हता तसेच अन्य अर्हता उमेदवाराने धारण करणे आवश्यक राहील.


संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

एखादा कर्मचारी जर सेवेत असताना काही कारणाने त्याचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या वारसा ला अनुकंपा तत्त्वावर त्या शासकीय निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये नोकरी मिळते.


यासाठी विशिष्ट नमुन्यामध्ये प्रस्ताव सादर करावा लागतो त्यासोबत काही कागदपत्रे देखील आवश्यक असतात ते पुढील प्रमाणे.

अनुकंपा प्रकरणाकरीता आवश्यक दस्तऐवज (प्रपञ-अ)

१. मयत कर्मचाऱ्याचे कार्यालया मार्फत परिशिष्ट 'ब' व सेवाविषयक माहिती.

२. वारसदार कोणतीही नौकरी करण्यास तयार असल्याबाबतचे मुळ स्वयंघोषना पञ.

३. कोर्टाचे वारस प्रमाणपत्र. (असल्यास)

४. मयत कर्मचाऱ्याची पत्नी/पती यांचे कोणास अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यावयाची आहे याबाबतचे नामांकन.

 ५. अर्जदारास नोकरी देण्यास हरकत नसल्याबाबत ईतर भावंडाचे नाहरकत मुळ स्वयंघोषना प्रमाणपत्र.

६. कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय/निमशासकीय/जि.प. सेवेत कार्यरत काय? वा सेवानिवृत्त आहेत काय? असल्यास कोठे व कोणत्या पदावर? याबाबत स्वयंघोषना प्रतिज्ञापत्र (स्वतःचे)

७. कुटुंबातील कोण्या व्यक्तीस यापुर्वी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली काय? असल्यास कोठे व कोणत्या पदावर? नसल्यास स्वयंघोषना प्रतिज्ञापत्र (स्वतःचे)

८. कुटुंबातील अन्य सदस्यांचा सांभाळ करण्याबाबतचे मुळ स्वयंघोषना प्रमाणपत्र.

९. शैक्षणीक पाञतेच्या सत्यप्रतिलीपी /संगणक/MS-CIT/टंकलेखक-मराठी-३०, इंग्रजी-४० व इतर.

१०. शाळा सोडल्याचा दाखला.

११. जन्माचा दाखला

१२. जातीचा दाखला / जात वैधता प्रमाणपत्र

१३. लहान कुटुंबाचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र.


अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


अनुकंपा तत्त्वावर नोकरी संदर्भात काही शासन निर्णय पुढीलप्रमाणे.. 

विवाहित मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र ठरवणारा शासन आदेश दिनांक 26 फेब्रुवारी 2013.

Download


अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी प्रतीक्षा यादी संकेतस्थळ वेबसाईटवर प्रसिद्ध करणे बाबत शासन निर्णय दिनांक 15 मे 2010.

Download


अनुकंपा तत्वावर नियुक्त जलदगतीने होण्याससहाय्यभूत म्हणून अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपद्धती शासन निर्णय.

Download


उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुकंपा तत्वावर नोकरी बाबत शासन निर्णय  14 सप्टेंबर 2022

Download


अनुकंपा तत्वावर 20 टक्के पदे भरण्याच्या मयादेस

दद.31.12.2024 पयंत मुदतवाढ देणेबाबत 22 डिसेंबर 2021

Download


अनुकंपा तत्त्वावर नोकरी संदर्भातील इतर महत्त्वपूर्ण सर्व शासन निर्णय.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.