महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिनांक 3 ऑक्टोबर 2003 रोजी आंतर्णीला बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाव वेतन वाढ देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे सदर शासन आदेशाची अंमलबजावणी अजूनही सुरू आहे का याबाबत माहिती अधिकार अंतर्गत ग्राम विकास विभागाला माहिती मागविण्यात आल्यानंतर ग्रामविकास विभागाने "ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दि. ०३.१०.२००३ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्याप पर्यंत सुरु आहे. यासंबंधी ०३.१०.२००३ च्या निर्णयानंतर दुसरा कोणताही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही." अशी स्पष्ट माहिती अर्जदारास बांधलेली आहे.
संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिनांक 3 ऑक्टोबर 2003
३. प्राप्त परिस्थितीत, आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचा-यांचा त्याच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढीसाठी विचार करावयाचा झाल्यास, या विभागाच्या दिनांक ३१/१०/१९८९ च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधीत कर्मचा-याची एकाच पदावरील किमान सलग तीन वर्षे सेवा झालेली असावी. तसेच संबंधित कर्मचा-यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी दिनांक ३१-१०-१९८९ च्या शासन आदेशानुसार असावी.
४. हे आदेश पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २४८ नुसार प्रदान केलेल्या शक्तीनुसार लागू करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
(रा. का. पवार)
सह सचिव, महाराष्ट्र शासन.
संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments