या दिवशी होणार राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण SEAS - PARAKH 2023..! SCERT चे परिपत्रक...

  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे चे संचालक यांनी दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यशिक्षण संपादन सर्वेक्षण 2019 अंमलबजावणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) २०२३ - PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.


इयत्ता इयत्ता ३री

माध्यम

बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, तमिळ, तेलगु, उर्दू (एकूण ९) 


इयत्ता ६ वी

माध्यम 

इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, उर्दू (एकूण ६ माध्यम )


इयत्ता ९ वी

इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, तमिळ, तेलगु, उर्दू (एकूण ८) 


करिता त्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ व ३ अन्वये राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सदर उपक्रमाचे वेळापत्रक या कार्यालयास पाठविले होते. त्यानुसार संदर्भ क्र. ५ अन्वये जिल्ह्यांना नियोजन कळविण्यात आले आहे. परंतु संदर्भ क्र. ६ नुसार NCERT नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त पत्राद्वारे सदर सर्वेक्षणाबाबत काही बदल करण्यात आलेले होते ते जिल्ह्यांना कळविण्यात आलेले आहेत.


सदर सर्वेक्षणाच्या अंमलबजावणी बाबत दिनांक ५ व ६ ऑक्टोबर २०२३ रोजी NCERT, नवी दिल्ली यांचेमार्फत राज्य समन्वयकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांचे प्रशिक्षण दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळ सत्रात १२.०० ते २.०० या वेळेत ऑनलाईन आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांचेकरिता तयार करणेत आलेल्या Whatsapp group वर सदर प्रशिक्षणाची लिंक यथावकाश पाठविण्यात येईल. राज्यस्तर प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांनी जिल्हास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांचे प्रशिक्षण दिनांक १९ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे.


तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेकडून निवडक शाळांची यादी (ज्या शाळांमध्ये सर्वेक्षण घेण्यात येणार आहे) या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. त्या यादीतील शाळांची खालील निकषांच्या आधारे पडताळणी करावी. निकष :-

निवडलेल्या शाळेत इयत्ता ३ री, ६ वी, व ९ वी मध्ये (सर्वेक्षणासाठी निवडलेल्या इयत्तेत) ५ किंवा ५ पेक्षा कमी विद्यार्थी असू नयेत. सर्वेक्षणासाठी प्रतिवर्ग विद्यार्थी नमुना ( संख्या ३० ) असणे अपेक्षित आहे. परंतु ३० पेक्षा कमी किंवा ०५ . पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तरी त्या शाळेत सर्वेक्षणासाठी योग्य समजण्यात याव्यात. • उपरोक्त निकषांना अनुसरून जिल्हा समन्वयक यांनी NCERT, नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त यादीतील शाळांची पडताळणीबाबत दिनांक १८/१०/२०२३ अखेर कार्यवाही खालीलप्रमाणे करावी.

१. जर नमुना शाळा निकषास पात्र नसेल तर evaluationdept@maa.ac.in या इमेलवर लिखित स्वरुपात मागणी करावी. 

२. शाळा बदलताना कोणत्याही परिस्थितीत हे बदल १५% पेक्षा जास्त नसावे.

३. जर एखाद्या शाळेत सर्वेक्षणाच्या दिवशी क्षेत्रीय अन्वेषकस शून्य उपस्थिती आढळल्यास त्याने फिल्ड नोट मध्ये माहिती नोंदवावी व ती जिल्हा समन्वयकाकडे सादर करावी.

४. सर्वेक्षणाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

सदर निवडलेल्या शाळांची यादी ही फक्त पडताळणीसाठी असल्याने तिची गोपनीयता बाळगण्यात यावी. सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने वेळोवेळी करण्यात येणा-या कार्यवाहीचे अपडेट्स ( प्रशिक्षणाची क्षणचित्रे, व्हिडीओ) समाजमाध्यमांद्वारे अपलोड करावेत. अपलोड करीत असताना 

#Maharashtra SEAS २०२३ आणि #PARAKH या हॅशटॅगचा वापर करावा.

@indranibhaduri,

सर्वेक्षणाची यशस्वी अंमलबजावणी होणेकरिता उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांना आलेल्या अडचणी व समस्या या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर SEAS नियंत्रण कक्ष स्थापन करणेत आलेला आहे. या अंतर्गत सोबत जोडलेल्या यादीतील संबधित अधिका-यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करू शकता.

तसेच जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांना सर्वेक्षणाच्या अनुषंगाने येणा-या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा SEAS नियंत्रण कक्ष स्थापन करावा व त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणपूर्व, सर्वेषण कालावधीत व सर्वेक्षणा नंतर येणा-या समस्यांचे निराकरण करावे.


सोबत :- १. जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यादी

२. सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांची यादी.

३. SEAS राज्यस्तर नियंत्रण कक्ष यादी


( अमोल येडगे भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.