विभागीय शिक्षण संचालक पुणे यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद अहमदनगर पुणे सोलापूर च्या शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना विद्यार्थी आधार अपडेट करणे बाबत पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
आपल्या जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाची नोंद सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करणेबाबत आपणांस मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, पुणे व या कार्यालयामार्फत आयोजित बैठक तसेच व्ही.सी. व्दारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि आपल्या जिल्हयातील अद्यापही आधार अपडेशन पूर्ण झालेले नाही. तरी सदरचे कामकाज तात्काळ पूर्ण करणेबाबत मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण, यांनी दि. १५/९/२०२३ रोजीच्या आढावा बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत.
तरी सदर पत्रान्वये आपणांस सूचित करण्यात येते की, आपल्या जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार अपडेशनचे कामकाज दि.३०/९/२०२३ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणोवर राहील याची नोंद घ्यावी.
(राजेंद्र अहिरे)
शिक्षण उपसंचालक पुणे विभाग, पुणे
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments