ईद च्या सुट्टीत बदल! आता ईद ची सुट्टी दिनांक 28 सप्टेंबर ऐवजी दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाची अधिसूचना

आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार ईद-ए-मिलाद च्या सुट्टीत पुढील प्रमाणे बदल करण्याची निर्देश दिले आहेत.


अधिसूचना


क्रमांक GAD-49011/2/2023/GAD/DESK 29- शासनाने सन २०२३ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्टया परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ करिता अधिसूचना क्र.सार्वसु ११२२/ प्र.क्र.११७/कार्या- २९, दि.०२ डिसेंबर, २०२२ अन्वये अधिसूचित केल्या आहेत.


२. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि यावर्षी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी हिंदु धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते व नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदु बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ ऐवजी शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर करण्यात येत आहे.

ईद-ए-मिलाद

इंग्रजी तारीख 

२९ सप्टेंबर, २०२३

भारतीय सौर दिनांक

वार

७ अश्विन, शके १९४५

शुक्रवार 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(रो. दि. कदम-पाटील) उप सचिव, महाराष्ट्र शासन


सन २०२३ करीता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी गुरुवार, दि.२८.०९.२०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. सदर दि.२८.०९.२०२३ रोजीची सुट्टी रद्द करुन शुक्रवार, दि. २९.०९.२०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सदर सार्वजनिक सुट्टीबाबतची अधिसूचना सोबत जोडली आहे.


२. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उप-विभाग मध्ये पृष्ठांकनासहीत प्रसिध्द करुन त्याच्या ५० प्रती या कार्यालयास उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंती आहे.


सहपत्र :- वरीलप्रमाणे.


(रो.दि.कदम-पाटील)


उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग

 

पूर्ण शासन आदेश व अधिसूचना एकत्रित पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.