वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत अटी व नियम निश्चित करणारा शासन निर्णय.

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 20 जुलै 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शासन निर्णय :-


संदर्भाधिन क्र. १ मधील शासन निर्णयातील परिच्छेद ९ मधील १ (क) आणि २(ब) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे..


१ (क) त्याने / तिने विहित केलेले किमान तीन आठवड्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी' ५० तासाचे (Online) सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे. 


२ (ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे. अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.


२. उपरोक्त दहा दिवसांच्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत करण्यात येईल..


३. प्रशिक्षणाचे शुल्क शासन मान्यतेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे निर्धारित करेल.


४. वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण शासन स्तरावरून आयोजित न केल्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत सदर दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र दिनांकापासून लाभ देय राहील.


५. दि. ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणा-या अथवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र असणा-या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटींमधून सवलत देण्यात येत आहे..


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०७२०१६१६१९८६२१ असा आहे. डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. हा आदेश

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


RAJENDRA SHANKARRAO PAWAR


(राजेंद्र पवार)


सह सचिव, महाराष्ट्र शासन


या शासन निर्णयान्वये संदर्भाधिन शासन निर्णय दि. २६/८/२०१९ अधिक्रमित करण्यात येत आहेवरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


 Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.