भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील वापराबाबतचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबाबत.

 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 644 शाळांमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरची उभारणी पूर्ण करण्यात आलेली आहे. निविदा प्रपत्रातील अट क्र.9.11 (II) (d) मधील, तसेच संदर्भाधीन पुरवठा आदेशातील अटी व शर्तीनुसार भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरची ज्या शाळेमध्ये उभारणी केली आहे, त्या शाळेतील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना सदर सेंटरमधील साहित्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील वापरासंदर्भात संबंधित शाळेतील शिक्षकांना पुरवठादारामार्फत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या 644 शाळांमध्ये भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे, त्या शाळेतील गणित व विज्ञान विषयातील शिक्षकांना भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील वापरासंदर्भात प्रशिक्षण देण्याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.


वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आपल्या जिल्हा महानगरपालिकांतर्गत ज्या शाळांमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे, त्या शाळेतील गणित व विज्ञान विषयक शिक्षकांना सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याकरिता कार्यमुक्त करण्याबाबत आपल्या स्तरावर संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना निर्देशित करण्यात यावे. शाळेत गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्यास इतर विषयांचे शिक्षक पाठवावेत, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या एका अधिकान्याने या प्रशिक्षणासाठी पूर्ण वेळ उपस्थित रहावे.


सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना नास्ता, चहा-पाणी, भोजन इ. पुरवठादारामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विहित नियमानुसार TA DA या कार्यालयामार्फत अदा करण्यात येईल. त्यासाठी प्रशिक्षणार्थी शिक्षक यांनी TA/DA बाबतचा विहित नमुन्यातील फॉर्म भरून त्यांच्या बँक खात्याची छायांकित प्रत व पॅन कार्डची छायांकित प्रत प्रशिक्षणाच्या दिवशी सादर करण्यात यावे.


सदर प्रशिक्षणाकरिता काही अडचण असल्यास भ्रमणध्वनी क्र. 86526 39528 यावर संपर्क साधावा.


(समीर सावंत)

राज्य प्रकल्प समन्वयक तथा

सह संचालक (प्रशासन),

म.प्रा.शि.प., मुंबई.





वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.