बदली प्रक्रिया 2022 तक्रार अपडेट - या दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना बोर्डाकडे न पाठवण्याबाबत आयुक्तांचे आदेश.

 अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातून निर्गमित दिनांक 29 मे 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार यु डी आय डी कार्ड असलेल्या दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी यवतमाळ बोर्डाकडे न पाठवण्याबाबत अमरावती विभागीय आयुक्तांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


श्री. राजेंद्र एम. दिक्षित, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई ३२ यांनी दिलेल्या निवेदनानुसार बदलीमधे लाभ घेतलेल्या विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याबाबत कळविले आहे. परंतु ब-याच दिव्यांग कर्मचा-याकडे भारत सरकारचे यु. डी. आय. डी. कार्ड आहेत. करीता ज्या दिव्यांग शिक्षक कर्मचा-यांकडे दिव्यांग यु.डी. आ.डी. कार्ड आहेत. अशा सर्व दिव्यांग शिक्षक कर्मचा-यांना यवतमाळ बोर्ड तपासणीतून वगळण्यात यावे व याबाबत शंका निर्माण झाली असल्यास त्याबाबतची वेगळी समिती गठीत करून यु.डी. आय. डी. कार्ड तपासणी करण्यात यावी असे नमुद असलेले श्री. राजेंद्र एम. दिक्षित, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई ३२. यांनी संदर्भिय निवेदन या कार्यालयास सादर केलेला आहे.


करीता विषयांकित प्रकरणी सदर अर्जामध्ये नमुद केल्या प्रमाणे ज्या दिव्यांग शिक्षक कर्मचा-यांकडे भारत सरकारचे दिव्यांग यु. डी. आय. डी. कार्ड आहेत. अशा सर्व दिव्यांग शिक्षक कर्मचा-यांना यवतमाळ बोर्ड तपासणीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात यावी.


सहपत्र वरील प्रमाणे


(डॉ. निधि पाण्डेय) विभागीय आयुक्त. अमरावती



वडील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.