मोफत गणवेश 2023-24 अपडेट - लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत राज्य प्रकल्प संचालक यांचे निर्देश

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या प्रकल्प संचालकांनी दिनांक 29 मे 2013 रोजी समग्र शिक्षा अंतर्गत सन 2023 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शालेय गणवेश उपलब्ध करून देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


समन्न शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदापत्रक सन २०२३- २४ भारत सरकार यांचे प्रकल्प मान्यता मंडळाच्या (PAB) बैठकीत दि. २४ एप्रिल २०१३ रोजी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजना अंदाजपत्रक एकूण ३७,३८,१३१ लाभार्थ्यांकरिता रु.२२४,२८,६९,०००/- लक्ष चा प्रस्तावास भारत सरकारकडून मंजूरी मिळाली आहे.


संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेमधून कायम स्वरुपी वगळण्यात आला आहे. याकरिता सदर शासन निर्णयानुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी, याकरिता प्रति लाभार्थी दोन गणवेश संचाकरिता मंजूर तरतूद रु.६००/- याप्रमाणे तरतूद मंजूर आहे. तथापि, शासनाने संदर्भ क्र. १ नुसार निर्गमित केलेल्या सूचना नुसार एक गणवेश याकरिता प्रति विद्यार्थी रु.३००/- प्रमाणे निधी या आदेशाद्वारे निर्गमित करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना एक गणवेश संच उपलब्ध करून देण्यात यावा. जिल्हा परिषद महानगरपालिकानिहाय भौतिक लक्ष व आर्थिक तरतूद कळविण्यात येत आहे. सदर तरतूदीच्या अधिन राहून कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य कार्यालयास सादर करण्यात यावा. उर्वरित एका गणवेशाचा लाभ शासन निश्चित करेल त्याप्रमाणे या शैक्षणिक वर्षामध्ये देण्यात येणार आहे. याबाबत सर्व संबंधितांना शासनाच्या पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कळविण्यात येईल,


सोबत :१) मार्गदर्शक सूचना (२) भौतिक लक्ष व आर्थिक तरतूद


राज्य प्रकल्प संचालक


म.प्रा.शि.प., मुंबई.


प्रत : माहितीस्तव सादर:-


१. मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई


प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव:-


२. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई ३. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

१. शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. विभागीय शिक्षण उसंचालक, सर्व विभाग 

३. शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद, सर्व

४. शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद, सर्व 

५. शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी शिक्षण प्रमुख, महानगरपालिका, सर्व.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

 Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.