जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली सुधारित धोरण 2023 साठी अंतिम करण्यात आलेल्या सूचना.

 1) शासन निर्णय क्र. जिपव-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.1.3.1.8. व 5.6 मध्ये "शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधी मध्ये वाढ झाल्यास विशेष संवर्ग र अंतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी सादर करावयाचे प्रमाणपत्र हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधी पर्यतच ग्राह्य धरण्यात येईल. असे वाचण्यात यावे. 2) जे शिक्षक पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांचा समावेश बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही. 3) शासन निर्णय क्र. जिपन-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.2.6 मध्ये "विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार नकार दर्शवल्यास, तसेच दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या पुढील संवर्गामध्ये पात्र होत असल्यास, संबंधितांना पात्र संवगांमध्ये बदलीची संधी देण्यात येईल. असे वाचण्यात यावे.


4) शासन निर्णय क्र. जिपव-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र. 1. 10 व 45 मध्ये "विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत पात्र शिक्षकाने बदलीतून सूट घेतल्यास संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदलीपात्र असल्यास, जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून बदली केली जाईल. असे वाचण्यात यावे. 5) शासन निर्णय क्र. जिपव-4820/प्र. क्र. 2900/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र. 4.2.8 नुसार:- मध्ये विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्राबाबत संबंधित प्रमाणपत्र ऑनलाईन युडीयो / त्री-सदस्यीय समितीची स्वाक्षरी असलेले ग्राह्य धरण्यात येईल. 6) शासन निर्णय क्र. जिपव-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.3.6मध्ये विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना विनंती बदलीसाठी ३ वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही असे वाचण्यात यावे.


7) शासन निर्णय क्र. जिपच-4820/प्र. क्र.290/आस्था-14. बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा

क्र.1.9 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-2:- विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत जोडीदार शिक्षणसेवक, तात्पुरत्या स्वरूपात निलंबित शिक्षक असल्यास संबंधितांना या संवगांचा लाभ देता येईल, पाकरिता प्रणालीमध्ये अशा शिक्षकाचे शालार्थ आय डी नमूद करण्याची सुविधा देण्यात येईल. 8) शासन निर्णय क्र. जिपव-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र. 4.3.5 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 मध्ये विशेष संवर्ग भाग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३० कि.मी. अंतराबाबत सादर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांचे द्वारा तालुका स्तरावर करण्यात यावी.


9) शासन निर्णय क्र. जिपव-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुदा क्र. 1.3 व 5.6 नुसार शासन निर्णयात नमूद कालावधीपेक्षा बदली प्रक्रिया अंमलबजावणी कालावधी मध्ये वाढ झाल्यास विशेष संवर्ग २ अंतर्गत संबंधित शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी अंतराबाबत सादर करावयाचे प्रमाणपत्र / दाखला हे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या कालावधी पर्यतचे ग्राह्य धरण्यात येईल. 10) शासन निर्णय क्र. जिपन-4820/प्र. क्र. 200/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र. 1.7 मध्ये "बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक"

तसेच ज्या शाळा 2019 मध्ये अवघड क्षेत्र म्हणून घोषित केले होते तेथील शिक्षकांना 2022 मध्ये बदली अधिकार प्राप्त असताना बदलो ची संधी मिळाली नाही म्हणून अशा शिक्षकांची सेवा ही 2019 च्या अवघड क्षेत्रानुसार पुढील बदली वर्षात ग्राह्य धरण्यात यावी. 11) राज्यघटनेतील १४व्या कलमातील तरतुदीनुसार कोणतही ठिकाण लिगभेदानुसार प्रतिकूल किंवा अनुकूल ठरविता येत नाही त्यानुसार शासन परिपत्रक दिनांक २० ऑगस्ट २०१९ मधील महिलांसाठी अनुकूल व प्रतिकूल याबाबतचे वरील परिपत्रक रद्द करण्यात येत आहे. 12) शासन निर्णय क्र. जिपच-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.4.5 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देता येईल याऐवजी संबंधित संवर्गातील शिक्षकांना निव्वळ रिक्त जागांवर व बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल" असे वाचण्यात यावे. 13) शासन निर्णय क्र. जिपव-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र. 1.10- बदलीस पात्र शिक्षक:- बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक, तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही, तसेच अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची सलग सेवा १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल व सध्याच्या शाळेतील सेवा ५ वर्ष किंवा अधिक झाली असेल अश्या शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षकांच्या संवर्गात करण्यात येईल.


14) बदली अधिकार प्राप्त या संवर्गातील शिक्षकांना बदली पात्र संवर्गाप्रमाणे पती-पत्नी एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात यावा. 15) बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना एकूण सेवा जेष्ठतेऐवजी अवघड क्षेत्रातील सलग वास्तव सेवा जेष्ठता विचारात घेऊन प्राधान्य देण्यात येईल. 16) 1.10- बदलीस पात्र शिक्षक बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित चरावयाची सलग सेवा १० वर्ष पूर्ण झालेलो आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक, तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष पुर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. मध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा जेष्ठता विचारात घेऊन सर्व साधारण क्षेत्रात १० वर्ष पूर्ण सेवा केलेल्या व सध्याच्या शाळेत ५ वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शिक्षकांना वास्तव सेवा जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदलीने पदस्थापना देण्यात येतील. अ) असे पात्र शिक्षक विशेष संवर्ग भाग १ मध्ये पात्र असल्यास त्यांनी संबंधित संवर्गामधून बदलीस होकार नकार देणे अनिवार्य राहील.

ब) टप्पा क्र. ६ अंतर्गत विशेष संवर्ग भाग २ मधील कोणत्याही तरतुदी लागू राहणार नाहीत.

भ) टप्पा क्र. ६ अंतर्गत बदलीपात्र या संवर्गाप्रमाणे पती-पत्नी एक यूनिट या तरतुदीचा लाभ घेता येईल. 17) बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाइल पडताळणी व दुरुस्ती हि सुविधा संबंधित बदली प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी अंतिम कली जाईल. बदली प्रक्रिया सुरु झाल्यानतर कोणत्याही प्रकारची प्रोफाइल दुरुस्ती अनुज्ञेय राहणार नाही.18) संपूर्ण जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याने २०२४-२५ पासून २६ जानेवारी रोजी प्रक्रिया सुरु करण्यात येईल व माहे मे अखेरीस संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असेल या नुसार बदली वर्षातील शिक्षकांची कार्यमुक्ती माहे जून अखेरीस पूर्ण करण्यात येईल. 19) बदली वर्षात आंतर जिल्हा प्रक्रियेमध्ये भाग घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना त्याच वर्षीच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.

20) जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष संवर्ग भाग १ ची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी बदली पात्र शिक्षकांची यादी तसेच टप्पा क्र. ६ साठी पात्र असण्यार्याची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.. 21) शासन निर्णय क्र. जिपव-4820/प्र. क्र.290/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि.07/04/2021 मधील मुद्दा क्र.4.5.4 मध्ये या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणान्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल. ऐवजी बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्य क्रम न दिल्यास, सेवाजेष्ठता विचारात न घेता अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल." असे वाचण्यात यावे.

(22) अनुसूचित क्षेत्रातील( पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरत असताना सदर जागांचा प्राधान्यक्रम हा स्थानिक अनुसूचित जमातीच्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर शिक्षकांनी भरू नये.

23) बदली प्रक्रिया सुरु असताना निलंबित. मयत, सेवेतून कार्यमुक्त केलेले व बडतर्फ केलेले शिक्षक बदली
प्रक्रियेतून त्या टप्प्यावर वगळण्यात येतील.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिये बाबत

वाचा.

) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र. आंजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021

1) शासन निर्णय क्र. आजिव-4820 / प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई. दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 8.1 मध्ये ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक, ऐवजी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र हा संवर्ग रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार या पूर्वी ज्या शिक्षकांनी संबंधित जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असेल असे कोणतेही प्रमाणपत्र पात्रता निश्चित करण्यासाठी ग्राह्य धरले 
जाणार नाही." असे वाचण्यात यावे. 2) शासन निर्णय क्र. आजिव-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई, दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र.8.3 मध्ये सदर प्रक्रियेअंतर्गत पती-पत्नी एक युनिट म्हणून एखाद्या जिल्ह्यात दोन जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील."

3) शासन निर्णय क्र. ऑजिब-4820/प्र.क्र.291/आस्था-14, बांधकाम भवन, मुंबई दि. 07/04/2021 मधील मुद्दा क्र. 15 मध्ये आंतर जिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यातील रुजू होणेबाबत कार्यवाहीसाठी कालावधी निश्चित करून त्यानुसार आवश्यक अंमलबजावणी संबंधित सर्व जिल्ह्यांनी करणे अनिवार्य आहे. सदर कालावधी हा १५ दिवसांचा निश्चित असावा."

वरील संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

4 Comments

 1. याचा gr ahe ki कसं sir?

  ReplyDelete
  Replies
  1. 15 मे 2023 पर्यंत येणे अपेक्षित आहे

   Delete
 2. सर, सन २०२३ ची बदली प्रक्रिया कधी पासून सुरू होणार...

  ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.