बदली अपडेट!

 बदली अपडेट

 ➖➖➖➖➖

शिक्षक सर्वसाधारण बदल्या २०२२




https://ott.mahardd.in/


मित्रांनो नमस्कार! 🙏


जिल्हांतर्गत बदली प्रक्रिये शेवटचा संवर्ग म्हणजे संवर्ग ४ अर्थात सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे आणि सध्याच्या शाळेत ५ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक . हा माझ्यामते सर्वात मोठा संवर्ग आहे .

लवकरच संवर्ग ४ ची प्रक्रिया सुरू झाली आहे.


आज आपण या पोस्ट मध्ये दोन मुद्यावर चर्चा करणार आहोत .


ते खालीलप्रमाणे 


१} बदली प्रक्रियेमध्ये यानंतरचा टप्पा काय असेल.


२} संवर्ग ४ अर्थात बदली पात्र शिक्षक यांच्याबाबतीत महत्वाचे मुद्दे


💠 चालू बदली प्रक्रियेमध्ये यानंतरचा टप्पा काय असेल ? 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या बाबत दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा एकदा ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून बदल्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले होते ते पुढील प्रमाणे.


 बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक २१ जानेवारी २०२३ ते २४ जानेवारी २०२३ दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध झाले आहे.


सदर वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पार पडली असता दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध करून देऊ शकतात. (अपवाद -: ग्रामपंचायत , जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता )

किंवा ऑर्डर जनरेट करून चालू शैक्षणिक वर्षांनंतर कार्यमुक्त करण्याचा ही पर्याय निर्माण होऊ शकतो .


✡️ बदलीपात्र शिक्षकांच्या बाबतीत महत्वाचे मुद्दे.


बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या जिल्ह्यातील एकूण सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील.


ज्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर सर्वसाधारण क्षेत्रात सलग पाच वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतील तर अशा सर्व शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षाकांमध्ये करण्यात येतो.


बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक २१ जानेवारी २०२३ ते २४ जानेवारी २०२३ दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकता.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.


बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त जागा व रिक्त जागा पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास दिसणार आहेत. 


बदली पात्र शिक्षकांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम न भरल्यास जिल्ह्यातील उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांना बदलीने नियुक्ती दिली जाईल


बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम देतांना पोर्टलवर ३० शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास ३० शाळांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा शक्यतोवर आपला फार्म सबमिट होणार नाही


 परंतु ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळेवर सलग पाच वर्ष व अवघड क्षेत्रातच दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल तरीसुद्धा अशा शिक्षकांना बदली पात्र टप्प्यामध्ये पसंतीक्रम देता येणार नाही कारण अवघड क्षेत्रातील शिक्षक हे शासन निर्णय ७एप्रिल २०२१ नुसार बदली पात्र ठरवता येत नाही , संदर्भासाठी सदर जी.आर अभ्यासावा .


बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास कोणत्याही यादीमध्ये शाळांची शोधाशोध करण्याची गरज नाही.बदली पात्र शिक्षकांच्या पोर्टलवर दिसणाऱ्या सर्व शाळा ह्या बदली पात्र शिक्षकांकरिता उपलब्ध केलेल्या आहेत बदली पात्र यादी किंवा रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणातंर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे.


बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिलेल्या आहेत त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये.


या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेतांना आपणास पोर्टलवर सर्वसाधारण क्षेत्रातील आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देतांना निर्णय घ्यावा कारण बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त शाळा व जिल्ह्यातील रिक्त शाळाच प्राधान्यक्रमात द्यावयाचा आहे अशावेळी संभाव्य रिक्त शाळा या सर्वसाधारण क्षेत्राबरोबरच अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात.


बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र टप्प्यामध्ये बदली न मिळाल्यास त्यांना विस्थापित व्हावे लागेल व पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये प्राधान्यक्रम भरावा लागेल अशा वेळी बदली पात्र टप्प्यामधील शाळांपेक्षा निश्चितच विस्थापित टप्प्यामधील शाळा ह्या आपल्या गैरसोईच्या असतील.


सर्वसाधारण क्षेत्रातील विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक ज्यांनी सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष पूर्ण केलेली आहे व कार्यरत शाळेमध्ये पाच वर्षे झालेले आहेत त्यांनी बदलीस होकार दिला असेल तर त्यांच्या पसंतीक्रमाने त्यांना संवर्ग एकच्या टप्प्यात बदली मिळाली असेलच परंतु त्यांच्या पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास पुन्हा त्यांना बदली पात्र बदली टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्यास संधी मिळेल.


पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर ३० किलोमीटर पेक्षा जास्त असेल त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व कदाचित त्या शिक्षकाला पती-पत्नी अंतर्गत बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्याची संधी मिळेल व त्यांची बदली होईल.


पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर ३० किलोमीटरच्या आत असेल तर असे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षक बदली टप्प्यामध्ये एक युनिटचा लाभ घेऊ शकतात त्यापैकी एका बदली पात्र शिक्षकाने बदली पात्र टप्प्यांमध्ये पसंती क्रम देत असताना जर आपल्याला आपल्या जोडीदाराला सुद्धा सोबत बदलीने घ्यायचे असल्यास आपल्या जोडीदार शिक्षकाला शाळेवर तीन वर्ष झालेले असेल तर त्यांना सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊन दोघांनाही बदली पात्र टप्प्यामध्ये पसंती क्रम भरून एक युनिट चा लाभ घेऊ शकतात अशी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


पती-पत्नी दोघांनाही एक युनिट म्हणून बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्येच लाभ घेऊ शकता परंतु या टप्प्यामध्ये जर दोघांनाही ३० किलोमीटरच्या परिसरात शाळा मिळाल्या नाही तर ते शिक्षक विस्थापित होऊन रँडम राऊंड मध्ये गेल्यानंतर त्यांना एक युनिटचा लाभ घेता येणार नाही अशा शिक्षकांना बदली देताना ३० किलोमीटरच्या परिसरात शाळा देणे बंधनकारक राहणार नाही त्यामुळे एक युनिटचा लाभ घेताना वरील बाबीचा विचार करावा.


बदली पात्र बदली टप्प्यामध्ये एक युनिट म्हणून दोन समान लिंग असणाऱ्या व्यक्ती एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाही.


प्राधान्यक्रम भरताना बदली पात्र शिक्षकांनी खालील लिंकला क्लिक करावे.


https://ott.mahardd.in/


वरील लिंकला क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.