आर्थिक वर्ष 2022-23 (आयकर निर्धारण वर्ष 2023-24) इनकम टॅक्स मधे NPS व इतर वजावटी इन्कम टॅक्स विभागाचं सर्क्युलर

 इनकम टॅक्स मधे NPS व इतर वजावटी..

श्री विनायक चौथे, राज्य सोशल मीडिया प्रमुख, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना 


आर्थिक वर्ष 2022-23 (आयकर निर्धारण वर्ष 2023-24)


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


1) NPS कर्मचारी अंशदान वजावट.

कलम 80CCD1 अंतर्गत कलम 80C मध्ये उपलब्ध असलेल्या 1.5 लाख रु बचत मध्ये कर्मचाऱ्याची NPS मधील रक्कम (कर्मचारी स्व हिस्सा) वजावट /बचत करता येतो...  


म्हणजेच कलम- 80 C  अंतर्गत - 1.5 लाख  रु  मध्ये कर्मचारी NPS रक्कम दाखवता येते..

(पेज नं 56)


2)  कलम 80CCD1(B) अंतर्गत NPS मध्ये 50,000₹  पर्यंत अतिरिक्त बचत..

कलम 80CCD1(B) मध्ये (कलम 80 C व्यतिरिक्त) NPS मधील कर्मचारी हिश्याची रक्कम ही 50,000 रु पर्यंत बचत करता येते.. (पेज नं 57)

  उदा. जर कर्मचाऱ्याचा NPS  स्व हिस्सा हा 1.20 लाख रु असेल तर अश्यावेळी तो कर्मचारी त्याची NPS ची 50,000 रु रक्कम 80CCD1(B) मध्ये व उरलेली 70,000 रक्कम कलम 80 C मध्ये दाखवू शकतो...


3)NPS 14% शासन हिस्सा - कलम 80CCD(2) अंतर्गत वजावट..  ( पेज नं 56...)


प्रश्न - आपल्याला मिळणारा शासन हिस्सा उत्पन्नात मिळवावा का.?


उत्तर- होय.. शासन हिस्सा टेक्निकली उत्पन्नाचा भाग असतो..

मग शासन हिस्सा  कशातुन किंवा कोणत्या कलमातून वजावट करावा.?

  उत्तर-  आपल्याला मिळणारा NPS मधील शासन हिस्सा कलम 80CCD(2) मधून वजावट करण्यात येतो..


संपूर्ण शासन हिस्सा वजावट करता येतो का.?

उत्तर- होय... संपूर्ण 14% शासन हिस्सा वजावट मिळतो... 

   मागील वर्षी राज्य कर्मचाऱ्यांना NPS 14% शासन हिस्सा पूर्ण डिडक्शन बाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या माध्यमातून इनकम टॅक्स डिपार्टमेंट व केंद्र सरकार च्या वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्यात आलेला होता, त्यामुळे मागील वर्षीच्या बजेट मध्येच यावर केंद्र सरकारने 14% वजावट करण्याचा निर्णय घेतलेला  आहे आणि सन 2019-20 पासून तो बदल स्वीकारला आहे व राज्य कर्मचाऱ्यांना NPS शासन हिस्सा 10% वरून 14% वजावट करण्याचा निर्णय झालेला आहे... याबाबत इनकम टॅक्स च्या दि. 07/12/ 2022 च्या परिपत्रकात पान क्र 56 वर स्पष्ट सूचना नमूद केलेल्या आहेत...

इनकम टॅक्स शासन आदेश pdf लिंक👇🏻 

 Circular No. 24/2022 : Income-tax deduction from salaries during the Financial Year 2022-23 under section 192 of the Income-tax Act, 1961

7 December 2022


    https://incometaxindia.gov.in/Pages/communications/circulars.aspx


तथापि अनेक शिक्षक/ कर्मचारी तक्रार करत आहेत की काही टॅक्स कन्सल्टंट त्यांना शासन अंशदान वजावट पूर्ण दाखवू देत  नाहीय, , तर काही ठिकाणी NPS चे कर्मचारी अंशदान केवळ 1.5 लाख रु पर्यंतच स्वीकारत आहे..  NPS चा Additional 50,000 ₹ वजावट लाभ मिळणार नाही' असेही काहीजण सांगत आहेत... तर कृपया संबंधितांनी इनकम टॅक्स च्या नियमांचा आदेशांचा/ परिपत्रकाचा नीट अभ्यास करावा, आणि 3 गोष्टी लक्षात घ्याव्यात..


1) NPS कर्मचारी हिस्सा हा कलम 80 C मध्ये 1.5 लाख रु पर्यंत saving करता येतो.. तसेच


2) NPS कर्मचारी हिस्सा 80CCD1(B) मध्ये ही 50,000 ₹ पर्यंत saving करता येतो.

कर्मचारी त्याची स्वतः ची NPS रक्कम या दोन्ही कलमात कशीही ही विभागू शकतो...


3) 14% NPS शासन हिस्सा हा आता पुर्णपणे वजावट मिळतो.. 


काहीजण असा ही प्रश्न विचारतात की त्यांची स्वतः च्या NPS हीश्याची 2 लाख रु लिमिट संपली आहे, तर शिल्लक स्व NPS हिस्सा शासन वजावट मध्ये टाकता येईल का.? 

नाही... कारण NPS शासन वजावट या हेड मध्ये केवळ शासनाचीच 14% NPS रक्कम वजावट म्हणून टाकता येईल...  


इनकम टॅक्स मधील इतर वजावटी-

1) आरोग्य विमा (कलम 80 D)

यात 25,000 रु पर्यंत वजावट मिळते.. (पेज नं 58)


2) अपंग कर्मचारी सूट (80 U)

अपंग कर्मचाऱ्यांस 75000 रु सूट/वजावट मिळते...

अपंगत्व 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 1,25,000,₹ वजावट मिळते..( पेज नं 61)


3) अपंग पाल्य सूट (कलम 80 DD)

कर्मचाऱ्यांस त्याच्या अपंग मुलाच्या/ पाल्यासाठी इनकम टॅक्स मध्ये 75000 रु ची वजावट/सूट मिळते..

पाल्याचे अपंगत्व जर 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कलम 80DD अंतर्गत इनकम मध्ये 1,25,000,₹ ची वजावट मिळते..(पेज नं 59)


4) वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मिळाले असल्यास त्याची वजावट- कलम 17(2) 

 

परिवारातील कोणत्याही सदस्यांच्या आजारावर कर्मचाऱ्यांने खर्च केलेली रक्कम ज्यावेळी वैद्यकीय प्रतिपूर्ती च्या स्वरूपात (मेडिकल बिल ) नियोक्त्या कडून कर्मचाऱ्यांस मंजूर होते/प्रत्यक्ष खात्यावर जमा होते तेव्हा ती रक्कम उत्पन्नात मोजली जाते व त्याला कलम 17(2) अंतर्गत संपूर्ण वजावट ही मिळते... मग ते बिल कितीही रूपये असो...  (पेज नं- 40)


5) देणगी / डोनेशन - 80 G 

कलम 80G अंतर्गत एखाद्या नोंदणीकृत समाजसेवी संस्थेस/मंदिर/ट्रस्ट/ इत्यादी ना देणगी स्वरूपात दिलेली रक्कमेस 50000 रु पर्यंत इनकम मधून वजावट मिळते... 

(T&C Apply)


6) वाढीव घरभाडे वजावट (कलम 80 GG) 


उदा- पगारात मिळणारा मासिक घरभाडे HRA भत्ता 5000 रु असेल व कर्मचारी भाड्याने राहत असेल ,व त्यास मिळणाऱ्या घरभाडे भत्त्या पेक्षा तो जास्त रक्कम घरभाड्यावर खर्च करत असेल (उदा. 6000 रु मासिक,) तर त्याचे वाढीव खर्च घरभाडे 1000 रु × 12 महिने = 12,000 रु हे कलम 80GG अंतर्गत इनकम मधून टॅक्स सूट/ वजावट होतील...  मात्र यासाठी घरभाडे भरल्याच्या पावत्या/ रेंट करारनामा इत्यादी आवश्यक राहील..


उपरोक्त माहिती इनकम टॅक्स च्या वेळोवेळी निर्गमित झालेल्या आदेश/ परिपत्रकानुसार विश्लेषण करून मांडण्यात आलेली आहे, याबाबतच्या पुरावे वर उल्लेखित इनकम टॅक्स च्या वेबसाईटवरील लिंक/pdf मध्ये नमूद आहेत, अधिक माहितीसाठी त्याचा उपयोग करावा..  धन्यवाद..!

   

आपलाच

विनायक चौथे,राज्य सोशल मीडिया प्रमुख,

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना

Mob-9028156057


टीप- सविस्तर माहिती वर पोस्ट मध्ये पेज नंबर सहित दिलेली आहे,pdf लिंक पण दिली आहे, त्यामुळे कृपया अतिआवश्यक असेल तरच कॉल करावा ही विनंती..


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.