डीसीपीएस योजनेअंतर्गत संचित निधी (NDSL) एनडीएसएलला वर्ग करताना येणाऱ्या अडचणी समस्या बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे मार्गदर्शन परिपत्रक

डीसीपीएस योजनेअंतर्गत संचित निधी (NDSL) एनडीएसएलला वर्ग करताना येणाऱ्या अडचणी समस्या बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांचे मार्गदर्शन परिपत्रक.


प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार डीसीपीएस योजनेअंतर्गत संचित निधी एन डी एस एल ला वर्ग करताना येणाऱ्या अडचणी समस्या बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत संजीत निधी एन डी एस एल ला वर्ग करणे संदर्भात दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक यांची ऑनलाइन झूम मीटिंग द्वारे व्हीसी आयोजित केली होती. सदर व्ही सी मध्ये परिभाषित अंशदायी निवृत्ती वतन योजनेअंतर्गत संचित निधी एन डी एस एल ला वर्ग करताना येणाऱ्या अडचणी समस्यांबाबत मार्गदर्शन मागितले आहे त्यानुसार खालील प्रमाणे समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.


समस्या 1) एन पी एस ची प्राण खाते उघडल्यानंतर जे कर्मचारी सेवानिवृत्त मृत्यू निलंबित टीईटी अनुत्तीर्ण इतर काही कारणाने सदर कर्मचाऱ्यांचे नाव शालार्थ प्रणाली मध्ये संचित निधी वर्ग यादीत दिसत नसल्यास त्याचा संचित निधी कसा वर्ग करावा? 

मार्गदर्शन - सेवार्थ प्रणाली मधील एमपीएस धारकाचा निधी ज्याप्रमाणे एन डी एस एल कडे वर्ग करतात त्याचप्रमाणे सदरील कर्मचाऱ्यांचा निधी एन डी एस एल कडे वर्ग करावा याबाबतीत काही अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील कोषागार कार्यालयास व एन डी एस एल कडे संपर्क साधावा.


समस्या 2) एनपीएस चे प्राण खाते न उघडता जे कर्मचारी सेवानिवृत्त मृत्यू किंवा कोणत्याही कारणाने सेवा समाप्त झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांचा संचित निधी कसा वर्ग करावा? 

मार्गदर्शन - अशा कर्मचाऱ्यांचा परताव्याचा प्रस्ताव मुख्याध्यापक यांचेकडून मागवून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करावा.


समस्या 3) आंतरजिल्हा बदलीने व्यवस्थापन बदलीने माध्यमिक मधून प्राथमिक विभागात बदलीने आलेल्या व गेलेल्या कर्मचाऱ्यांचा संचित निधी कसा वर्ग करावा? 

मार्गदर्शन - अशा कर्मचाऱ्यांचा संचित निधी शासन निर्णय दिनांक 29 नोव्हेंबर 2010 च्या मुद्दा क्रमांक 21 प्रमाणे व शासन पत्र दिनांक 4 ऑक्टोबर 2022 अन्वय वर्ग करावा.


समस्या 4) डीसीपीएस खाते उघडलेल्या कर्मचाऱ्यांचे कोणत्याही कारणास्तव जीपीएफ जुनी पेन्शन योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत कार्यवाही कशी करावी? 

मार्गदर्शन - अशा कर्मचाऱ्यांची शासन निर्णय दिनांक 20 डिसेंबर 2017 अन्वये त्यांच्या परताव्याचा प्रस्ताव मुख्याध्यापक यांचे कडून मागवून विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कडे मंजुरीसाठी पाठवून जमा रकमेचे शोधन करावे.


समस्या 5) टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची सेवा समाप्ती झालेली आहे पण माननीय न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे या संदर्भात काय करावे? 

मार्गदर्शन - अशा कर्मचाऱ्यांची एनपीएस चे प्राण खाते उघडावे व क्रमांक एक प्रमाणे कार्यवाही करावी.


समस्या 6) खाजगी व्यवस्थापनामधून मनपा नफा व्यवस्थापनामध्ये बदलीने समायोजनाने केलेली कर्मचारी यांचे संदर्भात काय करावे? 

मार्गदर्शन - महानगरपालिका नगरपालिका व्यवस्थापनांना डीसीपीएस योजना लागू नसल्याने सदरील कर्मचाऱ्यांना हिशोब पूर्ण करून त्यांना परतावा द्यावा.


समस्या 7) जुन्या पेन्शन योजनेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यास व अशा कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस व एमपीएस खाते नसल्यास काय करावे? 

मार्गदर्शन - न्यायालयीन अंतरीम आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी.


समस्या 8) डीसीपीएस खाते उघडलेला कर्मचाऱ्यांची कोणत्याही कारणास्तव एमपीएस खाते उघडलेले नाही अशा कर्मचाऱ्यांबाबत कार्यवाही कशी करावी? 

मार्गदर्शन - अशा कर्मचाऱ्यांची डीसीपीएस रकमेचा हिशोब पूर्ण करून त्यांची यादी संचालनालयास सादर करावी.


समस्या 9) सहाव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम डीसीपीएस च्या स्तर दोन खात्यात जमा आहे.. काय करावे? 

मार्गदर्शन - अशा कर्मचाऱ्यांची डीसीपीएस स्तर दोन रकमेचा हिशोब पूर्ण करून त्यांची यादी संचालनालयास सादर करावी.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.