महिला कर्मचारी मेडिकल बिल अपडेट - महिला कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय

महिला कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती लाभ घेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता निवड केली आहे. असे अर्जा द्वारे त्या कार्यरत असलेल्या कार्यलयास लेखी कळवणे बंधनकारक आहे. 


अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित कार्यालयाने त्या महिला कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात अर्जा बाबत दिनांका सह नोंद घेणे बंधनकारक आहे. 


विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिने आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाची निवड वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती लाभ घेण्यासाठी ती करीत आहे.  असे ज्या दिनांकास कळविले आहे त्या दिनांक पासून केवळ पुढील कालावधीसाठी संबंधित आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एक यांना घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिकृती शासनाकडून करण्यात येईल. म्हणजेच ज्या कालावधीत उपचार खर्चाच्या प्रतिकृतीची मागणी विहित शासकीय महिला कर्मचारी करीत आहे त्या कालावधीत संबंधितांच्या सेवा पुस्तकात सदर व्यक्तीची आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एक यांची नोंद असणे आवश्यक आहे. 


विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी वरील प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर सेवा कालावधीत त्याच्यात कसलाही बदल करता येणार नाही. 

सदर आदेश वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे. 

हा शासन निर्णय प्रलंबित प्रकरणांना देखील लागू करण्यात यावा मात्र यापूर्वीची निर्णय घेतलेली प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येऊ नये. 



वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.