केंद्रप्रमुख भरती अपडेट - केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित परीक्षा शिक्षण संचालक प्राथमिक परिपत्रक १०/०९/२०२५

केंद्रप्रमुखांबाबतचा शासन निर्णय दि.२९-८-२०२५ नुसार केंद्रप्रमुखांची रिक्त पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 



संदर्भः-१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१ टिएनटी-१/दि.१/१२/२०२२

२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग २०२२/प्र.क्र.८३/१६-अ/दि.२०/७/२०२३

३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग २०२२/प्र.क्र.८३/१६-अ/दि.२९/७/२०२४

४. शासन अधिसूचना, ग्रामविकास विभाग क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.२२१/आस्था-१४/दि.१८/७/२०२५

५. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. केंप्राशा-

२०२३/प्र.क्र.५६०/टीएनटी-१/दि. २१-८-२०२५

६. शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्रमांक संकीर्ण २०२५प्र. क८०२४८/आस्था-१४/दि.२८/८/२०२५

७. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टीएनटी-१/दि. २९-८-२०२५

उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भ क्र.७/दि.२९-८-२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्च्ये

केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या संवर्गातील पदांसाठी ग्राम विकास विभागाची अधिसूचना दि. १८/७/२०२५ मध्ये अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा या मार्गांनी ५०:५० या प्रमाणात भरावयाची आहेत. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय दि.२८/८/२०२५ अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत. शासन निर्णय दि.२९-८-२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील ३ (ब) (vi) नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना तात्काळ कळविणेबाबतचे निर्देश नमूद करण्यात आलेले आहेत. सदरची माहिती संकलित करून महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांना सादर करावयाची असल्याने खालील विवरणपत्रात केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांबाबतची माहिती प्रमाणित करून दोन दिवसात संचालनालयास सादर करण्यात यावी.

केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल दर्शविणारे विवरणपत्र


Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi

शरद गौसावी

शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे


केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित परीक्षेचा मार्ग मोकळा! 

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे! 


प्रस्तावना :

संदर्भ क्र. ७ येथील शासन निर्णयान्वये केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्र प्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. केंद्र प्रमुख या पदास आता समुह साधन केंद्र समन्वयक असे संबोधण्यात येते. सदर शासन निर्णयात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, केवळ पदनामात बदल झाला असल्याने केंद्र प्रमुख पदासाठी निश्चित करण्यात आलेली अर्हता व नेमणूकीची कार्यपध्दती समूह साधन केंद्र समन्वयक या पदास जशास तशी लागू राहील. संदर्भ क्र. ६ येथील अधिसूचनेन्वये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदासाठीची अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. संदर्भ क्र. ८ येथील शासन निर्णयान्वये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून या संवर्गातील ४८६० पदे मंजूर आहेत. या संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या संवर्गातील पदे संदर्भ क्र. ६ येथील अधिसूचनेनुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा या मार्गानी ५०: ५० या प्रमाणात भरावयाची आहेत. या अनुषंगाने सदर पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

२. पदभरतीचे प्रमाण: समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) हे पद त्या त्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पद आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी ५० टक्के पदे पदोन्नतीसाठी व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेसाठी उपलब्ध होतील. एखादया जिल्हा परिषदेत मंजूर पद संख्या विषम असल्यास अधिकचे एक पद पदोन्नतीच्या कोटयात उपलब्ध होईल.

३.पदभरतीचे मार्ग :-

अ) पदोन्नती :-

1. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत

i. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर ६ वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा अशी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदावर नियुक्ती करावयाची आहे.

iii. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून सेवाज्येष्ठता ग्राहय धरली जाईल.

iv. काही प्रकरणात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर ६ वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावर पदोन्नती झाली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणात दोन्ही पदांवर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी.

V. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर उमेदवाराची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील ६ वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राहय धरण्यात यावा.

vi. सद्यस्थितीत पदोन्नतीत सामाजिक आरक्षण लागू नाही. तथापि, संदर्भ क्र. ४ व ५ येथील तरतूदीनुसार दिव्यांगासाठीचे समांतर आरक्षण लागू आहे. हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील ५० टक्के पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी.

vii. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी ४ टक्के पदे दिव्यांगासाठी आरक्षित करण्यात यावीत. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्र. ८ अन्वये दिव्यांगाचे विशिष्ट प्रवर्ग सुनिश्चित करण्यात आले आहेत, ही बाब विचारात घेऊन आरक्षण निश्चिती करण्यात यावी.

viii. दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात संदर्भ क्र. ४ व ५ येथील शासन निर्णयातील तरतूदींची कोटेकोर अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेण्यात यावी.

ix. दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्राबाबत संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी.

X. पदोन्नतीबाबतच्या ज्या सर्वसाधारण तरतूदी संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयात नमूद आहेत, त्या सद्यस्थितीत लागू राहतील. 

ब) मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा :

1. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षीत पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत. तथापि, प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदांवरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता धारण केली असली पाहीजे.

॥. उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या त्या पदावर किमान ६ वर्षे कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राहय धरण्यात यावी. पदभरती वर्षाच्या १ जानेवारी रोजी ६ वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होणे आवश्यक राहील.

iii. मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने यास सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. तथापि, दिव्यांगाचे समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी. हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेच्या कोटयातील ५० टक्के पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी.

Iv. संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेला अभ्यासक्रम सदर परिक्षेसाठी लागू राहील.

सन २०२३ मध्ये केंद्र प्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, काही कारणास्तव ही परिक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्या परिक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल, त्यांना आता आगामी परिक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या उमेदवारांसाठी वय, अर्हता इत्यादी बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारीत करण्यासाठीची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल.

vi. सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेच्या कोटयातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ८ दिवसात कळवावी. प्राप्त झालेली जिल्हानिहाय माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी त्यानंतर ४ दिवसात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडे सोपवावी. या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा/अधिसूचना महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करावी. त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परिक्षेचे आयोजन करावे, परिक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबतचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने घ्यावा.

vii. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पदांसाठी राज्य स्तरावर एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा घेण्यात येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे, त्याच जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदासाठी दावा करु शकेल. त्या उमेदवारास स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदेच नियुक्तीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे जिल्हानिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाईल.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा सांकेताक २०२५०८२९१६१६३९३९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.

TUSHAR VASANT MAHAJAN

(तुषार महाजन)

 उप सचिव, महाराष्ट्र शासन.

संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा! 

Download

 केंद्रप्रमुख भरती अपडेट - केंद्रप्रमुखांची पदे 50% पदोन्नती व 50 टक्के विभागीय परीक्षे द्वारे भरणे बाबत दिनांक एक डिसेंबर 2022 रोजी चा शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा भागाने दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची पदे 50% पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा द्वारे भरण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

केंद्रप्रमुख भरती बाबत यापूर्वी पारित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी 2018 अतिक्रमित करण्यात येऊन प्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहे.

केंद्रप्रमुखांची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती राजीनामा बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदांवर ती पदे जसजशी रिक्त होतील तसतशी 50% पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादित भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांच्या संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखांची पदे निश्चित करावीत.

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादित परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल.

विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा द्वारे केंद्र मुखांच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत चे आयोजन शासन निश्चित करेल अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येतील सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील या चाचणी परीक्षेचे आयोजन स्वरूप पुढीलप्रमाणे.

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.

ऑनलाइन परीक्षा घेताना समान काठीण्य पातळीच्या पातळीच्या किमान दहा प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवील परीक्षार्थींना समान कठीण्य पातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.





वरील आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा अर्ज करण्याची तारीख काय आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अजून सुरू व्हायची आहे

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.