बदली अपडेट - आज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी चे जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हाअंतर्गत बदलाबाबत ग्राम विकास विभागाचे पत्र

बदली अपडेट - आज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी चे जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हाअंतर्गत बदलाबाबत ग्राम विकास विभागाचे पत्र.

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतून शिक्षक संवर्ग सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाने सुधारित धोरण विहित करण्यात आल्यास सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत म्हणजेच बदलीस पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एक मधील विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची यादी निव्वळ रिक्त पदांची यादी संभाव्य रिक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इत्यादी गोष्टी वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले आहे.

 दिनांक 21 ऑक्टोबर 2022 च्या पत्रांवर जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदलांची कार्यवाही सुरू आहे.

तथापि काही जिल्हा परिषदेमध्ये एकाच यु-डायस क्रमांक असलेल्या काही शाळा विविध माध्यमांच्या असून अशा शाळांमधील शिक्षकांचा रिक्त पदांचा तपशील भरण्यास अडचण येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदांची माहिती माध्यम निहाय भरण्याबाबतची सुविधा ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून अशा शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदांची माहिती ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीमध्ये माध्यमनिहाय अद्यावत करावी. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी या अगोदरच विलंब झालेला असल्याचे अशाप्रकारे कार्यवाही करण्यास विलंब कटाक्षाने टाळावा.

वरील प्रमाणे निर्देश सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.


वरील जिल्हा अंतर्गत बदली बाबत ग्रामविकास विभागाचा शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.