शालेय पोषण आहार योजनेसाठी शासन स्तरावरून केंद्र व राज्य दोन्ही हिस्स्यांचे अनुदान वितरित - शासन आदेश

शालेय पोषण आहार योजनेसाठी शासन स्तरावरून केंद्र व राज्य दोन्ही हिस्स्यांचे अनुदान वितरित - शासन आदेश.


आज दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांतर्गतच्या निधी वितरणाबाबत म्हणजेच शालेय पोषण आहार योजने अंतर्गत निधी वितरणाबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणजेच शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी च्या आदेशान्वये सन 2022 23 या आर्थिक वर्षातील पहिल्या हप्त्याचा 63975.99 लक्ष इतका निधी राज्य शासनास उपलब्ध करून दिला आहे. सदर निधीची विकतवारी सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना व अनुसूचित जमाती उपाययोजना या घटकांतर्गत केली आहे. प्रस्तुत योजने करता केंद्र व राज्य हिस्स्याचे प्रमाण 60:40 असे आहे. उपरोक्त निधी पैकी सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र हिस्सा चा 47866.84 लक्ष निधी व त्यास समरूप राज्य हिस्साचा रुपये 31,430.93 लक्ष असा एकूण 79,297.77 लक्ष निधीतील करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभाग मार्फत सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने प्रस्तुत निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. सबब सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र व राज्य शिष्याचा निधी वितरित करण्यात आला आहे त्या संदर्भातील शासन निर्णय पुढीलप्रमाणे.


या शासन निर्णयामुळे जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर अशा एकूण चार महिन्यांचे शालेय पोषण आहार देयकांची रक्कम संबंधित शाळा व इतर संबंधित यंत्रणांना वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments