शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान देखील पीएफएमएस प्रणालीद्वारे मिळणार - संचालकांचे परिपत्रक

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान देखील पीएफएमएस प्रणालीद्वारे मिळणार - संचालकांचे परिपत्रक.


शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र कक्षाने दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांच्या बँक व पी एफ एम एस प्रणालीवर नोंदणीकृत खात्याची माहिती सादर करणेबाबत पत्र निर्गमित केले आहे.


या अगोदरच आपल्याला माहित आहे की केंद्र शासनाकडून प्राप्त होणारा निधी ज्या योजनेसाठी प्राप्त होतो अशा सर्व योजना साठी पी एफ एम एस प्रणालीद्वारे निधी वितरित केला जातो.

शालेय पोषण आहार म्हणजेच मध्यान भोजन योजना ही देखील केंद्र शासनाची योजना आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत ज्या ज्या यंत्रणांना किंवा व्यक्तींना अनुदान प्राप्त होते अशा सर्व यंत्रणा व व्यक्ती यांना यानंतर प्राप्त होणारे अनुदान हे पी एफ एम एस प्रणालीद्वारे प्राप्त होणार आहे.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना गरम ताजा आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर देवकांची अदागयी 100% पीएफएमएस प्रणालीमार्फत करावयाची असल्याने सदर कामकाजाकरिता आपल्या जिल्ह्यातील योजनेस पात्र व पी एफ एम एस प्रणालीवर नोंदणीकृत सर्व शाळांची सोबत जोडण्यात आलेल्या नमुन्यात माहिती शिक्षण संचालनलायस उपलब्ध करून देण्यात यावी. सदर माहिती जिल्हा लॉगिन वर उपलब्ध आहे. सदर माहिती केवळ इंग्रजीमध्ये तसेच एम एस एक्सेल फॉरमॅटमध्ये पाठवण्यात यावी.

सर्व जिल्ह्यांना सूचना आहे की सदरची माहिती शाळांना द्यायचे विहित वेळेत अदा करणे करिता आवश्यक असल्याने याबाबत विलंब होणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी. ज्या जिल्ह्यांची माहिती प्राप्त होणार नाही अशा जिल्ह्यातील शाळांना अनुदान मिळण्यास विलंब झाल्यास त्यांची सर्व जबाबदारी संबंधितावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.



वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



 नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.