दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत एकवाक्यता राखण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांचे आदेश

दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत एकवाक्यता राखण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांचे आदेश.


औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार त्यांनी औरंगाबाद विभागातील शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना शैक्षणिक वर्ष 2022 23 मधील दिवाळी सुट्ट्यांबाबत औरंगाबाद विभागात एक वाक्यता राहण्यासाठी जालना बीड परभणी हिंगोली व औरंगाबाद या जिल्ह्यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 ते दिनांक 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत म्हणजेच एकूण 19 दिवस दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत.


त्यामुळे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2022 23 साठी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 ते 9 नोव्हेंबर 2022 या 21 दिवसाच्या कालावधीसाठी दिवाळी सुट्ट्या जाहीर करणे बाबत शिक्षण अधिकारी स्तरावरील स्वतंत्र परिपत्रकानुसार सर्व व्यवस्थापनांना कळविण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक यांनी दिले आहेत.




वरील प्रमाणे सुट्ट्या विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 19 दिवसाच्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत.


परंतु विदर्भामध्ये आतापर्यंत फक्त अकोला जिल्हा व वाशिम जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 ते दिनांक सात नोव्हेंबर 2022 पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निर्गमित केलेल्या सुट्टी बाबत अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

परंतु वरील दोन जिल्हे वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या ह्या दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पासून तर दिनांक 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत एकूण 11 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत.


वरील प्रमाणे अमरावती व नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी जर औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे प्रमाणे परिपत्रक निर्गमित करून सर्व शिक्षणाधिकारी यांना विभागामध्ये सारख्या सुट्ट्या देणे बाबत निर्देश दिले तर इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिवाळीच्या सुट्ट्या वाढण्याची शक्यता आहे.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.