जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टल चे उद्घाटन झाले.

माननीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाईन बदली पोर्टल चे उद्घाटन झाले! 

 बदली पोर्टल सर्वांसाठी खुले झाले! 


  शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट


http://ott.mahardd.com


यामध्ये मोबाईल नंबर ने log in करता येते.

प्रत्येक वेळा स्वतंत्र ओटीपी येतो.

संगणक व मोबाईल वर देखील सहज वापरता येते.

बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रिया संदर्भात व्हिडिओ बनवण्यात आली आहे ते पाहून आपण सहज वापरू शकतो.

याच्या मध्ये कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते त्यामुळे अधिक सुरक्षित असे पोर्टल आहे.

प्रत्येक सूचना वेळोवेळी ई-मेल व एसएमएस द्वारे मिळेल.

या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली की त्या संदर्भात पीडीएफ संबंधित ईमेलवर प्राप्त होते पीडीएफ पाहून आपण भरलेली माहिती आपण परत एकदा तपासून शकतो.

OTT.MAHARDD.COM

O =ONLINE

T= TEACHER

T = TRANSFER

MAHA = MAHARASHTRA

RDD = RURAL DEVELOPMENT DEPARTMENT






Phase 1 - Teacher Data Update - Schedule... 👆🏻

आपला मोबाईल टाकून लॉगिन करून पाहावे👇

महत्त्वाच्या सूचना
सर्व शिक्षकांनी वाचणे सक्तीचे आहे
कॄपया आपल्या प्रोफाइलमधील माहितीची पडताळणी करावी आणि सर्व फील्ड्समध्ये बरोबर माहिती दिलेली आहे हे तपासून घ्या.
शिक्षकाला त्याने/ तिने प्रोफाइलमध्ये दिलेल्या माहितीत केवळ एकदाच बदल करता येईल.
सर्व शिक्षकांनी आपल्या नोकरीबद्दलचे तपशील यातील सर्व फील्ड्समधील माहिती तपासून घेतली पाहिजे आणि तिची पडताळणी केली पाहिजे. शिक्षकाची बदली ही पूर्णपणे त्याने/तिने या संकेतस्थळामध्ये पुरवलेल्या माहितीवर अवलंबून आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.
शिक्षकाने पुरवलेली माहिती चुकीची असल्यास, चुकीची व अवैध माहिती दिल्याच्या परिणामी चुकीच्या ठिकाणी बदली होईल.
दिलेली माहिती १००% अचूक आणि पडताळणी केलेली असणे अपेक्षित आहे. दिलेल्या माहितीची गट शिक्षण अधिकारी मार्फत तपासणी होणार असली तरी अचूकता आणि स्वीकारण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे.
शिक्षक सर्व २ अर्जांची पडताळणी करतील आणि स्वीकारतील.
● वैयक्तिक तपशील
● नोकरीबद्दलचे तपशील
एकदा पडताळणी केल्यावर, शिक्षकांनी 'स्वीकार करा' (Accept) बटण दाबावे. त्यानंतर शिक्षकाची प्रोफाइल कायमची संग्रहित होईल व त्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
प्रोफाइल मधील माहिती भरत असताना या ३ गोष्टी आवश्यक आहेत -
1.उत्तम इंटरनेट कनेक्शन
2.ओटीपी एसएमेस मिळवण्यासाठी व वाचण्यासाठी नोंद केलेला मोबाइल नंबर असलेला मोबाइल फोन.
3.माहिती प्रमाणित करण्यासाठी शिक्षकाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची आणि/ किंवा सेवा पुस्तकाची प्रत.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.