राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय.

 राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय.


प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा पाया आहे. लहान वयात मुले अनेक भाषा आत्मसात करण्यासाठी तयार असतात. मुलांचे भावविश्व समोर ठेवून त्यांना प्राथमिक शाळेपासून इंग्रजी शब्दांची ओळख व्हावी त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी व्हावे. यासाठी शासनामार्फत शालेय स्तरावरील अध्ययन प्रक्रियेसाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची योजना प्रस्तावित होती.


मातृभाषेतून अध्यान अध्यापनाची प्रक्रिया पार पडताना विद्यार्थ्यांना पुस्तकातील समस्त आशयाचा खूप उपयोग होतो. भाषा व भाषा इतर विषयांमधील प्रत्येक विषयाची कौशल्य ही वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत. गणित आणि विज्ञान हे विषय शिकविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहारात नेहमी अनेक इंग्रजी शब्दांचा वापर होत असल्याचे दिसून येते. जसे इतरांशी बोलताना संवाद साधताना आपण अनेकदा मराठी शब्दांऐवजी इंग्रजी शब्द वापरतो. प्राथमिक स्तरावर अभ्यासली जाणारे गणित आणि विज्ञान हे विषय पुढील शैक्षणिक स्तरावर म्हणजेच उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजीमध्ये अभ्यासले जातात. या विषयांमधील अभ्यास अहवाल संशोधने आणि संदर्भ इंग्रजी भाषेत मांडलेले असतात. उच्च शिक्षणाचा विचार करताना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ही विषय इंग्रजीमध्ये अभ्यासावे लागतात. प्राथमिक स्तरावर प्रमुख्याने मराठीत माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयातील विविध संकल्पना संबोध हे मराठीतुन शिकावे लागतात. त्यामुळे त्यांचे अध्ययन होत असतांना जर विद्यार्थ्यांना गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पना चे अर्थ जर इमेजिंग कळाले आणि त्याविषयी शिक्षकांनी अध्यापन करताना थोडे स्पष्टीकरण केले तर विद्यार्थ्यांचे अध्ययन सहज सोपे होईल. या विचार प्रवाहातून प्राथमिक स्तरावरील पाठ्यपुस्तकांचे द्विभाषी करण करण्याचा निर्णय शासन स्तरावर प्रस्तावित होता. यादृष्टीने राज्यातील सर्व शाळांमधून इयत्ता पहिली पासून टप्प्याटप्प्याने एकात्मिक व द्विभाषी शिक्षण देण्याचे शासनाने ठरविले आहे सन दोन हजार वीस एकवीस मध्ये इयत्ता पहिली साठी राज्यातील आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याबाबत यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्या संदर्भात आज शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.


राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील मराठी आणि उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन 2022 23 पासून टप्प्याटप्प्याने एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांना मराठी व उर्दू माध्यमातून एकात्मिक व विभाजित तसेच सेमी इंग्रजी पाठ्यपुस्तकांना मान्यता देण्यात येत आहे. याबाबतची अंमलबजावणी पुढील प्रमाणे करण्यात यावी.

सन 2022 23 मध्ये राज्यातील सर्व मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांत करता पहिलीचे पुस्तक उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सन दोन हजार तेवीस-चोवीस मध्ये पहिली व दुसरी चे, 

सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पहिली दुसरी व तिसरी ची, 

सन दोन हजार पंचवीस-सव्वीस मध्ये पहिली दुसरी तिसरी व चौथी चे, 

सन दोन हजार 26 27 मध्ये इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी व पाचवी चे एकात्मिक व विभागाची पुस्तके मराठी व उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांसाठी उपलब्ध करून दिले जातील.


राज्यातील फक्त मराठी माध्यमाच्या आदर्श शाळांमध्ये सदरची पुस्तके एक वर्ष अगोदर उपलब्ध होती कारण या शाळांमध्ये हे एक वर्ष अगोदर पासून हा पथदर्शी प्रकल्प सुरू आहे.


वेळोवेळी सादर करून आढावा घेण्यात येऊन याबाबत पुढील टप्पे ठरविण्यात येतील. तसेच इतर माध्यमातून एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची मागणी झाल्यास त्या त्या माध्यमातून सदर पाठ्यपुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे बालभारती कडून उपलब्ध करून देण्यात येतील.


विषय तज्ज्ञांशी सल्लामसलत करून एकात्मिक व द्विभाषी पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य व त्यावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे बालभारती यांची राहील सदर पुस्तके समग्र शिक्षा अंतर्गत सर्व पात्र शाळांना वितरित होतील. तसेच समग्र शिक्षा योजने अंतर्गत समाविष्ट नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत बाजारात खुल्या विक्री करता उपलब्ध करून देण्यात येतील.

वरील महत्वपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.