Raju & the Forty thieves RBI guidelines (राजू आणि ते चाळीस चोर) pdf Download

Raju & the Forty thieves  RBI guidelines 

(राजू आणि ते चाळीस चोर) 


मित्रहो ऑनलाइन व्यवहार हे अपरिहार्य झाले आहे. तसेच मोबाईल मध्ये इंटरनेटचा वापर हा देखील अपरिहार्य आहे. परंतु ह्या दोन्हींचा मोबाईल मधील वापरामुळे आपल्या बँकेच्या खात्यातून गैरव्यवहार होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आपल्या बँकेच्या खात्यातून पैसे जे ऑनलाईन काढून घेण्यासाठी काही ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपणास वेगवेगळे आमिषे दाखवून किंवा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला फसवतात किंवा फसवण्याचा प्रयत्न करतात. 

भारतीय रिझर्व बँकेने म्हणजेच आरबीआय ने अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी एक गोष्टीरूप पुस्तक प्रकाशित केले आहे आहे हे पुस्तक इंग्रजी भाषेतून आहे यामध्ये ते आपली फसवणूक एकूण चाळीस पद्धतीने होऊ शकते असे सांगितले आहे आहे आणि ह्या चाळीस फसवणुकीपासून आपण कसे वाचू शकतो यासाठी या पुस्तकात 40 गोष्टी दिलेल्या आहेत. 

हे सर्व बँक खाती असलेल्या सुज्ञ नागरिकांसाठी भारतीय रिझर्व बँकेने तयार केलेले आहे परंतु आपण म्हणावे हे सर्व आपल्या शैक्षणिक गोष्टीशी कसे संबंधित आहे? किंवा शैक्षणिक गोष्टीशी हे सर्व संबंधित आहे का? 

हो ही शैक्षणिक गोष्टीची देखील संबंधित आहे कारण कोरोना काळापासून विद्यार्थी मोबाईल लॅपटॉप पीसी यासारखी साधने इंटरनेट सह ऑनलाइन क्लास साठी अभ्यासासाठी किंवा मनोरंजनासाठी देखील वापरत आहे त्यामुळे त्यांचा संबंध इंटरनेट आणि मोबाईल यांच्याशी यायला सुरुवात झाली आणि यांना मोबाईल किंवा इंटरनेटवर काय करावे व काय करू नये यांची समज असणे देखील गरजेचे होऊन गेले आहे शिवाय विद्यार्थी व पालकांचा मोबाईल नंबर पालकांचा ई-मेल आयडी त्यांच्या शैक्षणिक बाबीसाठी वापरतात अर्थात जेव्हा ते गेम खेळतात किंवा मनोरंजन करतात त्या वेळी देखील पालकाचा ई-मेल आयडी तालुका चा मोबाईल नंबर वापरतात परंतु असे केल्यामुळे बऱ्याच वेळा त्यांची फसवणूक होऊन पालकाचे खाते रिकामे होते यासाठी जे विद्यार्थी मोबाईल वापरतात किंवा जे पालक विद्यार्थ्यांना मोबाईल पीसी लॅपटॉप इत्यादि साधने इंटरनेट सह वापरायला देतात त्यांनीदेखील घ्या राजू आणि त्या चाळीस चोरांच्या कथा वाचायला हव्या. 


वरील संपूर्ण पुस्तक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी व वाचण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


वरील पुस्तक कथेच्या स्वरूपात दिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन देखील होईल व त्यांना सोप्या शब्दात मोबाईल इंटरनेटवर काय करावे व काय करू नये याचे नकळत ज्ञान देखील होईल तसेच वरील सर्व गोष्टी इंग्रजीत दिले असल्यामुळे त्यांना इंग्रजी वाचनाची सवय व इंग्रजी समजायला लागेल विद्यार्थ्यांना गोष्टी न समजल्यास त्या पालकांनी 1 - 1 रोज वाचून दाखवल्या तर त्यांना त्या समजतील व आपण ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू देखील शकाल. 

आजचे विद्यार्थी हे भावी नागरिक आहेत आणि भावी नागरिकांना सगळ्या गोष्टी ज्ञात असणे आवश्यक आहे. वरील गोष्टी वाचल्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा याविषयी थोडी पूर्वकल्पना देखील येईल. 



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.