आता चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा देखिल होणार ऑनलाइन? कला संचालक महाराष्ट्र राज्य यांचे महत्वाचे परिपत्रक

 आता चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा देखिल होणार ऑनलाइन? 

कला संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी काढलेल्या पत्रानुसार, चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा ऑनलाइन होण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2021 परीक्षेबाबत माहिती व वेळापत्रक 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल असे या अगोदर एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते, त्यानुसार शासकीय रेखाकला परीक्षा 2021 संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्याबाबत संचालनालय स्तरावर कार्यवाही सुरू असून दिनांक 12 व 13 फेब्रुवारी 2000 22 रोजी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा तसेच 14 व 15 फेब्रुवारी 2000 22 रोजी एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षांच्या संभाव्य तारखा देखील या पत्रानुसार घोषित करण्यात आलेल्या आहेत. जर या तारखांमध्ये अपवादात्मक परिस्थितीत बदल झाल्यास स्वतंत्रपणे पत्र काढून कार्यालय विद्यार्थी व विद्यालय यांना कळवणार असे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणी ची तारीख व मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे कळविण्यात येतील असे कला संचालक श्री राजू मिश्रा कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या पत्रात विद्यार्थ्यांना सुचित करण्यात आलेले आहे.
अशीच अशीच महत्त्वाची शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च करा www.pradipjadhao.com ला.. व्हिडिओ स्वरुपात शैक्षणिक माहिती पाहण्यासाठी भेट द्या आमच्या YouTube चॅनल ला

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.