चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Active voice and Passive voice (Change the voice)

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत

 Active voice and Passive voice

 (Change the voice)


आतापर्यंत tense (काळ) शिकतांना आपण पाहिलेली वाक्य ही कर्त्या पासून सुरू होणारी वाक्य होतो अशा वाक्यांना Active voice मधील वाक्य असे म्हणतो या मध्ये कर्ता हा सक्रिय म्हणजेच active असतो म्हणून त्यांना आपण कर्तरी वाक्य असे देखील म्हणतो...

परिक्षेत आपणास एक वाक्य देऊन त्यासमोर (Change the Voice) अशी सूचना दिलेली असते. अशा वेळी वाक्य एक तर Active voice मध्ये असते ते Passive Voice मध्ये convert रूपांतरित करायचे असते.

Active Voice म्हणजे काय?

ज्या वेळी कर्ता हा वाक्यात सर्वप्रथम आलेला असतो आणि तो स्वतः वाक्यातील कार्य करतो असे वाक्यरचने वरुन आपल्याला कळते अशा वाक्यांना Active voice मधील वाक्य असे म्हणतात. या वाक्यात कर्त्याला महत्व दिलेले असते.


Passive Voice म्हणजे काय?

ज्या वेळी कर्म हे वाक्यात सर्वप्रथम आलेले असते आणि कर्ता स्वतः वाक्यातील कार्य करत नसून त्यांचेकडून कार्य करवून घेतले जाते असे वाक्यरचने वरुन आपल्याला कळते अशा वाक्यांना Passive voice मधील वाक्य असे म्हणतात. या वाक्यात कर्माला महत्व दिलेले असते.


आपणास आतापर्यंत फक्त change the voice या पेपर मधील एका/दोन गुणांसाठी Active Voice चे Passive Voice कसे करायचे हे शिकवले गेले असेल परंतु Passive Voice हे वाक्यरचना करताना देखील Active Voice एवढेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे. 

Tense शिकतांना आपण फक्त active voice चाच vichar केला परंतु आपण आता Active Voice चे Passive Voice व Passive Voice चे Active Voice कसे करावे हे तर पाहणार आहोततच परंतु डायरेक्ट Passive Voice मधे वाक्यरचना कशी करावी Passive Voice मध्ये प्रत्येक काळात वाक्यरचनेची सूत्र कसे होते हे देखील पाहणार आहोत.


Passive Voice आणि Simple Present Tense



साध्या वर्तमान काळात Active Voice ची वाक्यरचना आपण पाहिली आहे. ती अशी...

I write a letter to his friend.

S + v+s/es/ies + o + c + .

Passive voice मध्ये हेच वाक्य..

A letter is written to his friend by me.

O + am/is/are + mv3 + c + by + S2 + .


The cricket is played on the ground by the players. (Change the voice)

Ans - The players play the cricket on the ground.

वरील वाक्यात अगोदर Passive Voice मध्ये असलेले वाक्य आपण Active Voice मध्ये केले.

आम्हाला आमच्या पालकांकडून गोष्टी सांगितल्या जातात.

We are told the stories by our parents.

या वाक्याचे active voice केले असता.

आमचे पालक आम्हाला गोष्टी सांगतात.

Our parents tell us the stories.

असे होईल. याचा अर्थ तेच वाक्य Active Voice व Passive Voice मध्ये केले असता त्यांचा मुळ भाव बदलतो अर्थ बदलतो. मग ज्या अर्थाने आपल्याला वापरायचे असेल त्याच voice मधील वाक्य बोलतांना किंवा लिहिताना वापरावे लागेल म्हणजेच आपल्याला फक्त Active Voice मधील वाक्य शिकूया चालणार नाही तर Passive Voice ची वाक्यरचना देखील समजून आणि शिकूया घ्यावी लागेल. आज आपण Simple Present Tense ची वाक्यरचना समजून घेतली तसेच रोज एका काळाची अशी क्रमशः समजून घेऊया...


त्यासाठी नियमीत भेट दया pradipjadhao.com या ब्लॉग ला..

धन्यवाद!


https://youtube.com/c/pradipjadhao



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.