चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत Tenses - Past Continues/Progressive Tense (अपूर्ण/चालू भूतकाळ)

 चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत  

Past Continues/Progressive Tense 

(अपूर्ण/चालू भूतकाळ)


भूतकाळात क्रिया घडत होती किंवा अपूर्ण होती हे दर्शविण्यासाठी वाक्यात अपूर्ण/चालू भुतकाळ वापरला जातो.

क्रिया भूतकाळात आहे हे दर्शविण्यासाठी भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापदे Was व were ही वापरली जातात.

एकवचनी कर्त्यासमोर  was हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते तर अनेकवचनी कर्त्यासमोर were हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते.

क्रिया अपूर्ण आहे, चालू आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लावण्यात येतो.

For example...


जर आपण past progressive tense चे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढील प्रमाणे होइल


S + was/ware + mv+ing + o + c + .


उदा.


१)मी दूध पित होता.


1)I was drinking water.


२)प्रमोद बस ने कार्यालयात जात होते.


2)Pramod was going to office by bus.


३)सर्व विद्यार्थी गाणे गात होते.


3)All students were singing song.


काही विद्यार्थी अभ्यास करत नव्हते.


Some students were not studying.
वरील पहिल्या वाक्यात I समोर was हे सहाय्यकारी क्रियापद वापरले आहे व drink ला ing प्रत्यय लागला आहे.


दुसऱ्या वाक्यात Pramod या एकवचनी कर्त्यासमोर was हे सहाय्यकारी क्रियापद वापरले आहे.


तिसऱ्या वाक्यात All students या अनेकवचनी कर्त्यासामोर were हे सहाय्यकारी क्रियापद वापरले आहे.


वरील सर्व वाक्य हे विधानात्मक वाक्य आहे...१)मी दूध पित होतो का?


1) Was I drinking water?२)प्रमोद बस ने कार्यालयात जात होते का?


2) Was Pramod going to office by bus?३)सर्व विद्यार्थी गाणे गात होते का?


3) Were all students singing song?वरील वाक्य ही प्रश्नार्थक वाक्य आहेत.. महत्वाचे... 


क्रियापदाला ing प्रत्यय लावतांना जर क्रियापदाचा शेवट व्यांजनाने झाला तर त्यानंतर लगेच लागून ing प्रत्यय लागतो.


उदा. Drink - drinking, sing - singing


क्रियापदाचा शेवट e ने झाला तर e वगळून त्या क्रियापदाला ing प्रत्यय लागतो.


उदा. Make - making, take - taking, bake - baking etc.


विद्यार्थ्यांसाठी सूचना..


वरीलप्रमाणे अपूर्ण भूतकाळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.


सर्व tenses सविस्तर शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..


किंवा Google search करा pradipjadhao.comधन्यवाद!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.