चला शिकूया इंग्रजी भाषा - Part Of Speech - Verb

 3) Verb - क्रियापद

वाक्यातील क्रियादर्शक शब्दाला किंवा शब्द समूहाला क्रियापद असे म्हणतात. अर्थात एखादी गोष्ट घडते, क्रीया घडते हे दर्शविणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.

The word/group of words in the sentence that shows action is called verb.

For example. Do, bring, happen etc.


I)Action verbs - कृतिदर्शक क्रियापदे

जे क्रियापदे कृती दर्शवतात त्यांना कृतीदर्शक क्रियापद Action verb असे म्हणतात. उदा. Walk, swim, run, write etc.


II) Stative verbs - स्थिती दर्शक क्रियापदे

जी क्रियापदे स्थिती दर्शक असतात किँवा स्थिती दर्शवतात त्यांना Stative Verb असे म्हणतात. उदा. Want, feel, believe, need etc.


III)Intransitive Verbs  - अपरिवर्तनीय क्रियापदे

करण्यायोग्य कृती दर्शविणाऱ्या परंतू त्यांचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर होत नाही कर्ता स्वतः ती कृती करतो अशा क्रियापदांना  अपरिवर्तनीय क्रियापदे म्हणतात. उदा. Walk, laugh, Play, run etc.


IV) Transitive Verb - परिवर्तनीय क्रियापदे

करण्यायोग्य कृती जीचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर होतो अशा क्रियापदांना Transitive Verb असे म्हणतात. उदा. Love, respect, believe etc.


V)Auxiliary Verbs - सहाय्यकारी क्रियापदे

वाक्यात काळ दर्शवण्यासाठी मुख्य क्रियापदाला सहाय्य करणाऱ्या क्रियापदांना Auxiliary Verbs असे म्हणतात. उदा. Would, Should, Do, Can, Did, Could, May etc.

VI) Modal Verbs 

क्षमता, शक्यता, परवानगी, सक्ती दर्शविणाऱ्या क्रियापदांना Model Auxiliary Verbs असे म्हणतात.

 Auxiliary  verbs that are used to express abilities, possibilities, permissions, and obligations.

For example - Can, Must, May, Should, Would.


VI) Mental Verb 

संकल्पना, विचार, समज, विचार अशा अमूर्त कृती दर्शक क्रियापदांना Mental Verb असे म्हणतात.

For example - know, recognise, believe etc.


VII)Phrasal Verbs 

एकापेक्षा अधिक शब्दांनी मिळून केव्हा क्रियापद होते त्यांना Phrasal Verbs असे म्हणतात.

For example - Run out, Go all out, Make out, Hand out, Bring out, Face up, Think through etc.


VIII) Irregular Verbs -  अनियमित क्रियापदे

जे क्रियापदे त्याचे भूतकाळी रूप होतांना आणि past participle होतांना अनियमितपणे बदलतात अशा क्रियापदांना अनियमित क्रियापदे म्हणतात.

For example - Eat, Think, Bring, Hold, Bear, Buy, Lay, Catch, Drive, Paid, Feel..


पुढील Part of speech ची याप्रकारची सविस्तर माहिती वाचाण्या आणि समजुन घेण्यासाठी Google search करा आणि नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला.


धन्यवाद!


Post a Comment

6 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.