माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दि.१७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करणेबाबत.
माननीय पंतप्रधान महोदय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दि.१७ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे ओचित्य साधून राज्यातील सर्व शाळांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. (प्रत संलग्न) सदर स्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील स्पर्धकांना सन्मानपत्र / प्रमाणपत्र देण्याबावतचे नियोजन करण्यात यावे. याअनुषंगाने आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
निबंध व चित्रकला स्पर्धेनंतर याबाबतचा एकत्रित अहवाल संचालनालय, मा. आयुक्त कार्यालयास व शासनास सादर करावा.
सहपत्र - संदर्भिय शासन पत्र
Digitally signed by
Sharad Shankargiri Gosavi Date: 12-09-2025 18:51: शरद गोसावी )
शिक्षण संचालक,
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांच्या आयोजनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भः मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देश दि.०९/०९/२०२५.
उपरोक्त विषयानुसार, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता निबंध / वक्तृत्व / नाट्य / भूमिका अभिनय / प्रश्नमंजुषा / संगीत /काव्यवाचन / कथाकथन / घोषवाक्य / चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. सदर स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, आत्मनिर्भरता, पर्यावरण जागरूकता व स्वदेशी विचारसरणी यांची जपणूक करणे हा आहे. सदर स्पर्धेसाठी वयोगट व स्तरनिहाय पुढीलप्रमाणे विषय असावेत.
निबंध / वक्तृत्व / नाट्य / भूमिका अभिनय / प्रश्नमंजुषा /संगीत / काव्यवाचन / कथाकथन / घोषवाक्य/ चित्रकला
पूर्व तयारी स्तर -इयत्ता ३ री ते ५ वी
१. आत्मनिर्भर भारत माझी भूमिका
२. पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी
३. स्वदेशी वस्तूंचा वापर काळाची गरज
४. ऑपरेशन सिंदूर-राष्ट्रीय सुरक्षा
पूर्व माध्यमिक स्तर-इयत्ता ६ वी ते ८ वी
१. माझा भारत देश महान
२. स्वच्छ भारत - सुंदर भारत
३. पर्यावरण वाचवा जीवन वाचवा
४. स्वदेशी वस्तूंचे महत्त्व
५. माझे स्वच्छ व सुंदर गाव/शाळा
६. भारतीय संस्कृती आणि सण
७. क्रीडा व खेळ यांचे महत्त्व
५. राष्ट्रप्रथम - विद्यार्थी म्हणून माझे कर्तव्य
६. आत्मनिर्भर भारत
७. स्वातंत्रोत्तर भारताची प्रगती
८. स्वातंत्र्यलढा आणि आधुनिक भारताची निर्मिती
१०. जागतिक स्तरावर भारताची भूमिका
९. भारतीय लोकशाही व संविधानाची भूमिका
११. भारतीय ज्ञानप्रणाली
माध्यमिक स्तर -इयत्ता ९ वी ते १२ वी
१. आत्मनिर्भर भारत स्वप्न ते वास्तव
२. पर्यावरण संवर्धन आजची आवश्यकता
३. जागतिकीकरण
४. ऑपरेशन सिंदूर राष्ट्रीय सुरक्षा
५. राष्ट्र प्रथम - भारतीय युवकांची भूमिका
६. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान
७. दहशतवादः भारताची भूमिका
८. डिजिटल इंडिया
९. भारताचा आधुनिक विकास आणि तंत्रज्ञान
१०. शिक्षणात Al व रोबोटिक्सचा वापर
११. भारतीय ज्ञानप्रणाली
स्पर्धेसाठी सर्वसाधारण निकषः
१. निबंध स्पर्धा
शब्दमर्यादा : प्राथमिक (२००-२५० शब्द), माध्यमिक (३००-४०० शब्द), उच्च माध्यमिक (५०० शब्दांपर्यंत).
स्वच्छ हस्ताक्षर व नीटनेटके लेखन आवश्यक.
गुणांकन : विषयाची मांडणी (३०), भाषा व व्याकरण (२५), विचारांची सुसंगती (२५).
सर्जनशीलता (२०).
२. वक्तृत्व स्पर्धा
वेळ मर्यादा : ३-५ मिनिटे.
भाषण पाठांतर नसून स्वतःच्या शब्दांत मांडावे.
स्पष्ट उच्चार, योग्य हातवारे, आत्मविश्वास महत्त्वाचे.
३. नाट्यस्पर्धा
गुणांकन : विषयज्ञान (३०), सादरीकरण (३०), भाषा व उच्चार (२०), एकूण प्रभाव (२०).३.
कालावधी : ८-१२ मिनिटे.
नाटकातील सर्व पात्रे विद्यार्थीच असावीत.
गुणांकन : अभिनय (३०), दिग्दर्शन (२५), संवाद व उच्चार (२०), संदेश व सर्जनशीलता (२५).
४. भूमिका अभिनय स्पर्धा
कालावधी : ३-५ मिनिटे.
शालेय गणवेषात सादरीकरण घ्यावे.
गुणांकन : पात्रानुरूपता (३०), आवाज व हावभाव (३०), सर्जनशीलता (२०), एकूण प्रभाव (२०).
५. प्रश्नमंजुषा स्पर्धा
गट स्पर्धा: प्रत्येकी ३ विद्यार्थी.
प्रश्नांचा विषय - सामान्य ज्ञान, शालेय विषय, चालू घडामोडी, साहित्य, क्रीडा, विज्ञान इ.
गुणांकन : बरोबर उत्तरे, वेळेचे पालन, गटसहकार्य.
६. संगीत स्पर्धा
प्रकार : गायन (एकल/गट), वाद्यसंगीत.
वेळ मर्यादा: एकल-३ मिनिटे, गट-५ मिनिटे.
गुणांकन : सूर (३०), ताल (३०), आवाजाची गोडी (२०), एकूण सादरीकरण (२०).
७. काव्यवाचन स्पर्धा
वेळ मर्यादा : ३ मिनिटे.
कविता स्वरचित असाव्यात.
गुणांकन: निवड (२०), आवाज/उच्चार (३०), भावमुद्रा (३०), एकूण प्रभाव (२०).
८. कथाकथन स्पर्धा
वेळ मर्यादा: ५ मिनिटे.
कथेतून बोधपर संदेश द्यावा.
गुणांकन : कथानिवड (२५), सादरीकरण व हावभाव (३०), भाषा/उच्चार (२५), एकूण प्रभाव (२०).
९. घोषवाक्य स्पर्धा
दिलेल्या विषयावर आकर्षक, थोडक्यात व नेमके घोषवाक्य तयार करणे.
शब्दमर्यादा : जास्तीत जास्त १२-१५ शब्द.
गुणांकन: आशय (३०), मौलिकता (३०), शब्दरचना (२०), प्रभाव (२०).
१०. चित्रकला स्पर्धा
वेळ: १ तास.
रंगसाहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे,
स्केचपेन/पेन्सिल रंग/वॉटर कलर यांचा वापर करता येईल.
गुणांकन : विषयानुरूपत्ता (२५), रंगसंगती (२५), रेखाटनाची नीटनेटकेपणा (२५).
सर्जनशीलता (२५).
उपरोक्त नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल स्थानिक स्तरावर करता येतील परंतु स्पर्धेच्या विषयात बदल करू नये.
वरीलप्रमाणे शाळास्तरावर सदर स्पर्धा आयोजित करून स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेते व प्रोत्साहनपर बक्षिसे शाळा व्यवस्थापन समिती / शाळा विकास व्यवस्थापन समिती यांचे उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करून मान्यवर व्यक्तींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात यावा. सदर स्पर्धेचे आयोजन करताना कोणत्याही धर्म, जात, पंथ, राष्ट्रपुरुष, थोर संत यांचा अनादर होणार नाही याची दक्षता घेणे, तसेच शासनाचे धोरण व संवैधानिक मूल्यांचे जतन व संवर्धन होईल याची काळजी घ्यावी. सदर कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचेकडून शिक्षण संचालक, प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे यांना दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावा.
Digitally signed by
Kamaladevi Shridhar Awate Date: 12-09-2025 17:38:23
(डॉ. कमलादेवी आवटे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र. पुणे
प्रत माहितीस्तव :-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहिती व योग्य कार्यवाहीस्तव :-
१. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. शिक्षण संचालक, माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती साठी Subscribe करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 Comments