शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 17 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
१. सह सचिव, स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र, दि.०६/०६/२०२५.
२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र जा.क्र. शिआका/२०२५-२६/आस्था-क-माध्य, दि.१०/०६/२०२५.
३. शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२२१/एस.डी.४, दिनांक १२/०६/२०२५
मा. पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली दि.२१.०६.२०२५ रोजी "आंतरराष्ट्रीय योग दिन" देशभरातील अनेक ठिकाणी सकाळी ६:३० ते ७:४५ या वेळेत (योग संगम सामूहिक योग प्रात्यक्षिक) आयोजित करण्यात येणार आहे. सदर दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग योग संगम प्रात्यक्षिकात सुनिश्चित करण्यासाठी शाळांनी प्रयत्न करण्याबाबत संदर्भीय पत्र क्र.१ व ३ अन्वये कळवण्यात आले आहे.
उपरोक्त केंद्र शासनाच्या संदर्भीय पत्र क्र.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये करणेबाबत सूचना देण्यात याव्यात व याबाबतची नोंदणी केंद्र शासनाच्या विहीत पोर्टल बर करणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. तसेच मा. पंतप्रधान यांचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम विशाखापट्टणम येथे होणार असून विदर्भातील शाळा दि.२३ जुन २०२५ पासून सुरु होणार असल्या तरी सर्व शाळांनी सदर कार्यक्रमात सहभागी होणेबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निर्देश देण्यात यावेत.
सहभागी शाळांनी अधिकृत IDY पोर्टलवर आयोजक म्हणून नोंदणी करावी. जास्तीत जास्त सहभाग खालील नमूद केलेल्या गुगल स्प्रेडशीटमध्ये आणि आयुष लिंकवर दर्शविला जाईल.
1. https://docs.google.com/spreadsheets/d/1OHipLg0S8TY5-wUXquuYwgHeFf9gXkwWeLlosx7c48/edit?gid=0#gid=0
2. https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam
वरीलप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास कळविण्यात यावा.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय-दि. २१ जून २०२५ ला योगदिन साजरा करणे बाबत.
आपणा सर्वांना सूचीत करण्यात येते की,संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महा. राज्य यांनी सूचीत केल्यानुसार दि. २१/जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करावयाचा आहे. सदर कार्यक्रम सकाळी ६.३० ते ७.४५ या वेळेत संपुर्ण देशभर विविध ठिकाणी साजरा करण्याचे प्रस्तावित आहे.त्यासाठी योगाच्या सरावासाठी निश्चित केलेल्या पद्धती ह्या आयुष मंत्रालयाच्याउद्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. यावर्षिच्या योगदिनासाठीचा विषय
*एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग असा आहे* योगदिन साजरा करण्यासाठीचे सर्व साहित्य व दहा प्रमुख उपक्रम https://drive.google.com/drive/u/0/folders/1iRmU2qPHn0mjxGQyUYPJIX3Bt1oBIiMe या लिंकवर उपलब्ध आहेत सदर उपक्रम सर्व शाळा, संस्थांमध्ये आयोजीत करण्यात यावा सर्व शाळा, संस्था त्यासाठी संदर्भिय पत्रामध्ये नमुद केलेल्या IDY या पोर्टलवर
https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam
या लिंकवर आयोजक म्हणून नोंदणी करु शकतात.
यासाठी सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या पीएमश्री शाळासह सर्व शाळा, संस्था यांना दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ७. ४५ या वेळेत शाळा सुरु ठेऊन विद्यार्थी, शिक्षक,पालक व समाजातील इतर लोक यांचा जास्तीत जास्त सहभाग. सदर उपक्रमात असावा. यासाठी कार्यान्वीत केलेल्या उपक्रमाबाबतची माहिती प्रत्येक मुख्याध्यापकाने आपल्याला दिलेल्या ईमेलवर भरावी. मुख्याध्यापकासाठी दिलेल्याकेंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांनी कार्यान्वीत केलेल्या उपक्रमाबाबतची माहिती (निवडक फोटो सह) केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्राची माहिती एकत्र करुन गटशिक्षणाधिकारी यांचेकडे पाठवावी.
महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 20 जून 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार My Bharat पोर्टलवर शाळा / महाविद्यालयांची नोंदणी व आंतरराष्ट्रीय योग दिवस दिनांक-२१.०६.२०२४ रोजीच्या उपक्रमात सहभागी होणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र. आस्था/१०६ प्राथ/मा.भा.पो./२०२४/३९०१, दिनांक २०/०६/२०२४
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, दरवर्षी २१ जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा केला जातो. संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिवस (दिनांक-२१/०६/२०२४) च्या निमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून घेतलेल्या उपक्रमांची नोंदणी व माहिती My Bharat पोर्टलवर भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
My Bharat Portal Link
तरी. प्रस्तुत प्रकरणी शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही करावी. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
सहपत्र - वरीलप्रमाणे
शरद ( गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रतः- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
My Bharat Portal Link
My Bharat Portal Link
माय भारत पोर्टलवर डायरेक्ट रजिस्ट्रेशन साठी लिंक
https://digilocker.meripehchaan.gov.in/
योगा मार्गदर्शिका पीडीएफ डाउनलोड
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments