Aadhaar Card Update: फ्रीमध्ये करा तुमच्या आधार कार्डमध्ये बदल! मोफत आधारकार्ड अपडेट करण्याच्या मुदतमध्ये पुन्हा वाढ!! ‘ही’ कागदपत्रे ठेवा जवळ.

💥 महत्त्वाची बातमी  - मोफत आधारकार्ड अपडेट करण्याच्या मुदतमध्ये पुन्हा वाढ!!

 

💁🏻‍♂️ नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. ग्रामीण भागात इंटरनेट, वीजेचा त्रास पाहता ही मुदत वाढ केली आहे. 


कोणत्या तारखेपर्यंत करता येणार मोफत आधारकार्ड अपडेट


🗓️ आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची यापूर्वीची तारीख 14 मार्च 2024 होती. त्याला 14 जून 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. ही डेडलाईन जाताच सरकारने पुन्हा एकदा मुदत वाढीचा निर्णय घेतला आहे. 


🧑‍💻 त्यानुसार आधारकार्ड धारकांना आता 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मोफत आधारकार्ड अपडेट करता येणार आहे. अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिली आहे. तसेच ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. 


 मोफत करा आधार कार्डमध्ये बदल!

Aadhaar Card Update: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२४ पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ भारतीय रहिवाशांना त्यांच्या ओळखीचा पुरावा (POI) आणि पत्त्याचा पुरावा (POA) अपडेट करण्यासाठी जवळपास १० दिवस शिल्लक राहिले आहेत.



आधार नोंदणी आणि २०१६ च्या अपडेट नियमानुसार व्यक्तींनी त्यांचे POI आणि POA डॉक्युमेंट्री त्यांच्या आधार नोंदणी तारखेपासून दर दहा वर्षांनी अपडेट केले पाहिजेत. ही आवश्यकता ५ आणि १५ वर्षांच्या मुलाच्या ब्लू आधार कार्डवर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी देखील लागू होते. विशेष म्हणजे तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख/वय, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता, नात्याचा पुरावा आदी लोकसंख्याशास्त्रीय माहिती अपडेट करू शकता.


तुमचं आधार कार्ड ऑनलाइन कसं अपडेट कराल?


१. UIDAI वेबसाइटवर जा – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in च्या वेबसाइटला भेट द्या. तुमची भाषा निवडा.


२. माय आधार टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉपडाउन मेनूमधून ‘तुमचा आधार अपडेट करा’ हा पर्याय निवडा

३. पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर ‘अपडेट आधार डिटेल्स ऑनलाइन’ हे पेज दिसेल. त्यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा.


४. नंतर तुमचा UID क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका. पासवर्ड प्राप्त करण्यासाठी ‘ओटीपी पाठवा’वर क्लिक करा.

5. ५. OTP आल्यानंतर तो तेथे टाका आणि लॉग इन वर क्लिक करा.


६. तुम्हाला अपडेट करायचे असलेले (नाव, पत्ता, जन्मतारीख इ.) पर्याय निवडा आणि नवीन माहिती अचूक भरा.


७. सबमिट करा आणि डॉक्युमेंट अपलोड करा – एकदा तुम्ही आवश्यक बदल केल्यानंतर, सबमिट करावर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.


८. सबमिट अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. तुमच्या विनंतीच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला एसएमएसद्वारे अपडेट विनंती क्रमांक (URN) प्राप्त होईल.


लॅाग इन केल्यानंतर आधारकार्डाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर असेल.


आधार अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –


तसेच myAadhaar पोर्टलवर तुमच्या आधार अपडेट करण्यासाठी पुढील कागदपत्रे जवळ ठेवा.


ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, सरकारने जारी केलेले ओळखपत्र, मार्कशीट, लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड.


पत्त्याचा पुरावा : बँक स्टेटमेंट (३ महिन्यांपेक्षा जुने नाही), वीज किंवा गॅस कनेक्शनची बिले (३ महिन्यांपेक्षा जुनी नाही), पासपोर्ट, लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, सरकारने जारी केलेले आयडी कार्ड इत्यादी कागदपत्रे जवळ ठेवा.


तुम्ही बायोमेट्रिक माहिती ऑनलाइन मोफत अपडेट करू शकत नाही.तुमचा फोटो, IRIS स्कॅन किंवा फिंगरप्रिंट यांसारखी बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट दिली पाहिजे.


जवळचे नावनोंदणी केंद्र शोधण्यासाठी UIDAI वेबसाइट bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ वापरा.

तुमची बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट्स, IRIS स्कॅन आणि फोटो) द्या.

केंद्रावर दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा.

पडताळणीसाठी कोणतेही आवश्यक डॉक्युमेंट सबमिट करा.

तुमच्या बायोमेट्रिक अपडेटच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला URN सह पोचपावती मिळेल.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.