बदली अपडेट 2024 - जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत विनंती बदल्या सन २०२३-२४ बाबत प्रक्रिया सुरू!

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी दिनांक 22 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत विनंती बदल्या सन २०२३-२४ बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे. 


संदर्भः- १) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रः जिपब- ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४. दिनांक- ७ एप्रिल २०२१.

२) महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडील शासन निर्णय क्र.संकीर्ण- २०२३/प्र.क्र.१७४/टिएनटी-१, दि.२१/०६/२०२३

३) या कार्यालयाकडील पत्र क्र.जा.क्र/प्राशिवि/आस्था-२/वशि-३३६९/२०२४, दि.०८/०३/२०२४, वशि-३७४७/२०२४, दि.१४/०३/२०२४, वशि- ६११४/२०२४, दि.२४/०४/२०२४.

४) मा. उपसचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.संकीर्ण-२०२४/प्रक्र.४५/आ-१४, दि.११/०३/२०२४.

५) मा. कक्ष अधिकारी, महा. शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र-४५/ आ-१४, दि.१७ मे २०२४.

उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील नमूद शासन निर्णयानुसार शिक्षक संवर्गाच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याबाबत शासनाने सुधारित धोरण निश्चित केले आहे.

सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्र २,४ व ५ अन्वये, जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांचा विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी असे सूचित करणेत आलेले आहे.

त्यानुसार, यापुर्वीच आपलेकडून वरील संदर्भ क्र ३ चे या कार्यालयाकडील पत्रांनुसार वरीलप्रमाणे पात्र शिक्षकांची माहिती मागणी करणेत आलेली आहे. तसेच विशेष संवर्ग भाग १ व २ चे अर्जाचे पात्रते बाबत पडताळणी करून शेरा नमूद करणेबाबत आपणास सूचित करणेत आलेले आहे.

तथापि, सदर बाबत आपणास सूचित करणेत येते की, जिल्हांतर्गत बदली सन २०२३-२४ कामी तात्पुरती वास्तव्य सेवा जेष्ठता सूची व संभाव्य वेळापत्रक या पत्रान्वये प्रसिद्ध करणेत येत आहे. तरी सदर प्रक्रियेबाबत चे धोरण शासन निर्णयांमधील नमूद तरतूदींनुसार खालील प्रमाणे निश्चित करणेत येत आहे.

१) बदलीसांठी पदावधीचा व परिगणना कालावधी दि.३१ मे २०२४ अखेर ग्राहय धरणेत येईल.

२) विशेष संवर्ग भाग १ - या सर्व संवर्गासाठी शिक्षकाची कार्यरत शाळेमधील सेवा किमान ३ वर्ष अनिवार्य आहे. तथापि, सदर संवर्गातून प्रथमतः बदलीचा लाभ घेत असताना सेवेची अट राहणार नाही. तसेच सदर संवर्गातून लाभ घेणाऱ्या शिक्षकांची पुनःश्च वैद्यकीय तपासणी संबंधित वैद्यकीय प्राधिकरणाकडून करणेत येईल. तपासणीअंती, प्रमाणपत्राबाबत काही आक्षेपार्ह बाबी आढळेस संबंधित शिक्षक शिस्तभंगाचे कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

३) विशेष संवर्ग भाग २ या सर्व संवर्गासाठी शिक्षकाची कार्यरत शाळेमधील सेवा किमान ३ वर्ष अनिवार्य आहे.

४) बदली अधिकार प्राप्त या सर्व संवर्गासाठी शिक्षकाची कार्यरत शाळेमधील सेवा किमान ३ वर्ष अनिवार्य आहे. 

या कार्यालयाकडील पत्र क्र.जा.क्र / प्राशिवि / आस्था-२/ वशि-१६१७२ /२०२२, दि.१३/१०/२०२२ अन्वये घोषित करणेत आलेले एकूण ०६ अवघड क्षेत्र शाळेमधीलच कार्यरत शिक्षक सदर संवर्गामध्ये पात्र ठरतील. तत्पुर्वीच्या कोणत्याही सेवेचा विचार ग्राहय धरला जाणार नाही.

५) बदलीस पात्र - जिल्हांतर्गत बदली सन २०२३-२४ प्रक्रियेंतर्गत प्रशासकीय बदल्या होणार नसलेने, सदर सवंर्गातून विनंती बदलीचा लाभ घेणेसाठी सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष तसेच विद्यमान शाळेत ५ वर्ष सेवा अनिवार्य आहे.

६) इतर - वरील संवर्गाव्यतिरीक्त ज्यांनी विनंती बदली अर्ज केलेला आहे, असे शिक्षक इतर या सवंर्गामध्ये येतील. संबंधित शिक्षकांचा विद्यमान शाळेतील सेवा कालावधीनुसार त्यांचा यादीतील प्राधान्यक्रम ठरविणेत येईल.

७) उपरोक्त नमूद सर्व सेवा कालावधींनुसार, निलंबन पुनस्र्थापित शिक्षकांबाबत अर्ज सादर करणेचे पात्रतेसाठी पुनर्स्थापनेपासून किमान ३ वर्षाचा कालावधी पूर्ण होणे बंधनकारक राहील. तसेच अशा शिक्षकांना निलंबित झालेला तालुका व मुळ वास्तव्याचा तालुक्यामध्ये बदली मागणी करता येणार नाही.


८) इतर महत्वाचे निर्देश :-

• सदर प्रक्रियेंतर्गत आपसी बदली व खो बदली अनुज्ञेय नाही. त्यामुळे प्रत्यक्ष समुपदेशनाचे वेळी उपलब्ध निव्वळ रिक्त पदांवरच बदली मागणी करता येईल.

• तसेच समुपदेशनाचे वेळी स्विकारलेल्या शाळेमध्ये पुन्हा कोणताही बदल मान्य होणार नाही. तसेच विनंती बदलीस एकदा नकार नोंदविलेस तो अंतिम राहील. व सदर समुपदेशनास अनुपस्थित राहिलेस संबंधितांचा नकार ग्राहय धरला जाईल. तसेच सदर बाबत कोणताही पत्रव्यवहार अथवा तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

• तसेच जिल्हांतर्गत बदली सन २०२३-२४ प्रक्रियेतंर्गत कोणताही राजकीय दबाव वापरल्यास उपरोक्त शासन निर्णय दि.०७ एप्रिल, २०२१ मधील मुद्धा क्र ५.३ नुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, १९६७ मधील नियम ६ (५) चा भंग केला म्हणून ती कृती शिस्तभंगाचे कारवाईस पात्र राहील.

उपरोक्त सर्व बाबी आपले अधिनस्त सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणून देवून त्याची पोहच दफ्तरी दाखल करून ठेवणेची कटाक्षाने नोंद घ्यावी.

सदर पत्रासोबत प्रसिद्ध करणेत आलेली संवर्गनिहाय व माध्यमनिहाय तात्पुरती वास्तव सेवा जेष्ठता यादी आपले अधिनस्त सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणून त्याची पोहच देखील दफ्तरी दाखल करून ठेवणेची आहे. तसेच सदर यादीवरील प्राप्त होणाऱ्या हरकती दि. २६/०५/२०२४ अखेर या कार्यालयास सादर करणेच्या आहेत. तदनंतर कोणत्याही हरकतीचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

तसेच तात्पुरती वास्तव सेवा जेष्ठता सूचीमध्ये वरील धोरणाप्रमाणे सर्व बाबींचे तंतोतंत पालन झाले असलेबाबत तसेच निलंबित, सेवानिवृत्त, अनाधिकृत गैरहजर, मयत कर्मचारी यादीमध्ये नमूद नाहीत याची खात्री आपलेस्तरावरून बिनचूकपणे करणेत यावी. सदर बाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

सोबत :- वास्तव सेवा जेष्ठता यादी व संभाव्य वेळापत्रक.


(तृप्ती धोडमिसे) भा.प्र.से

 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली




 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.