मराठी माध्यमा व्यतिरिक्त शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी अतिरिक्त शिक्षक! मराठी भाषा फाउंडेशन योजना प्रस्ताव सादर करण्या ची व अनुदान मागणीची कार्यपद्धत

 शिक्षण संचालनालय योजना कार्यालयातून दिनांक सात मे 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार मराठी भाषा फांऊडेशन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपद्धती बाबत शिक्षण संचालक योजना यांनी १) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व, २) शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, सर्व, ३) शिक्षणाधिकारी (योजना), मुंबई यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


मराठी भाषेवर पुरेशे प्रभूत्व नसलेले राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवार इतर सर्वसाधारण उमेदवारांच्या तुलनेत विविध स्पर्धापरिक्षांमध्ये मागे पडतात त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापरिक्षांमध्ये यशाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी. शासन निर्णय दिनांक ०२/११/२००४ पासून राबविण्यात येत आहे. इंग्रजी माध्यम वगळता इतर अमराठी शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता ८ वी ९ वी व १० वी चे अल्पसंख्यांक विद्यार्थी हे अप्रत्यक्ष लाभार्थी असून या योजनेतंर्गत मराठी भाषा विषयक ज्ञान देणेसाठी मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्ती केली जाते. हे प्रत्यक्ष लाभार्थी असून त्यांना मानसेवी शिक्षक असे म्हटले जाते. १. शाळांना सुरुवात झाल्यानंतर मे महिन्या अखेरीस किवा जून महिन्याच्या सुरुवातीला शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद यांनी सर्व उर्दू माध्यमक/मराठी माध्यमेतर शाळांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित करुन संबंधित मुख्याध्यापकांना सदर योजनेबाबत मार्गदर्शन करणे २. या योजनेंतर्गत संबंधित शाळानी इ.८वी, ९वी व १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समुदयातील अमराठी विद्यार्थी संख्या, तुकडयांची संख्या, सद्यस्थितीत शाळेमध्ये असलेल्या मराठी शिक्षकांची संख्या इ. बाबी नमूद करुन आवश्यक मानसेवी शिक्षकांच्या करावयाची निवड व नियुक्ती यासाठी १ जून ते १ जूले याकालावधीत प्रक्रीया पूर्ण करुन सदरहू योजना राबविणेबाबत व मानसेवी शिक्षक यांची मान्यता घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (योजना), यांचेकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.


३. शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) यांचेकडे त्यांचा जिल्हयातील संबंधित शाळांकडून शिक्षणाधिकारी (योजना), यांच्या मान्यतेने आलेले प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेतील विद्यार्थी संख्या, मानसेवी शिक्षकांची शैक्षणिक अर्हता (बी.एड/एम.एड) विचारात घेऊन प्रस्तावास मंजुरी दिलो जाते.


४. शिक्षणाधिकारी (योजना), यांच्या मदतीने शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) यांनी शिक्षकांची नोंद घेऊन, त्यांचा कालावधी व त्या कालावधीचे त्यांचे मानधन याचे अंदाजपत्रक/माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास व शासनास सादर केले जाते.

५. या योजनेचा कालावधी १ जुलै ते ३१ मार्च असा ९ महिन्यांचा राहील.

६. मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजनेंतर्गत मराठी भाषा हा विषय शिकविण्यासाठी इ.८वी, ९वी व १० वी

या तिन्ही वर्गामध्ये मिळून एकूण १८० ते २०० विद्यार्थ्यांसाठी एक मानसेवी शिक्षक नेमण्यात येतात. २०० पेक्षा जास्त मात्र ३०० पेक्षा कमी असल्यास दोन मानसेवी शिक्षक नेमण्यात येतात आणि त्यापुढील प्रत्येक १५० विद्यार्थी संख्येसाठी एका मानसेवी शिक्षकांची नेमणूक करण्यात येते.


७. या योजनेंतर्गत नेमणूक झालेल्या शिक्षकांना रु.५०००/- दरमहा देण्यात याते. सदर मानधन संबंधित शिक्षकांच्या बैंक खात्यामध्ये जमा करण्यात येते. नऊ महिन्यांसाठी एकूण रुपये ४५०००/- उपरोक्त प्रमाणे योजनेची कार्यवाही वेळेत करुन योजनेची अंमलबजावणी करावी.


महेश पालकर

 शिक्षण संचालक

शिक्षण संचालनालय (योजना)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.