NPS/DCPS धारक म्हणजेच 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना सेवा जोडणी कुटुंब निवृत्ती वेतन तसेच उपदान म्हणजेच ग्रॅज्युएटी बाबत वित्त विभागाचे दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय

 महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 30 मे 2024 रोजी निर्गमित केलेला दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती व नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत दि.०१.११.२००५ रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


वाचा :- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक- रानियो-२०२३/प्र.क्र.५७/ सेवा ४, दिनांक २४.०८.२०२३.


२) शासन शुध्दीपत्रक, वित्त विभाग, क्रमांक- रानियो-२०२३/प्र.क्र.५७/ सेवा ४, दिनांक २०.११.२०२३.


शासन शुध्दीपत्रक :

संदर्भाधीन क्र.१ येथील परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट १ व परिशिष्ट-२ मधील परिच्छेद (ब) (२) मधील उपपरिच्छेद २.१ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे-


"यासाठी कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यामध्ये मृत्यूसमयी जमा असलेल्या संचित रकमेचे वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांकः अंनियो २०१७/प्र.क्र.२६/सेवा-४, दिनांक २८.०७.२०१७ व वित्त विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांक: अंनियो २०१७/प्र.क्र.२६/सेवा-४, दिनांक १८.११.२०२१ मधील तरतूदीनुसार Error Rectification Module व्दारे रक्कम परत मागविण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा."


ऐवजी


"यासाठी कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यामध्ये मृत्युसमयी जमा असलेली संचित रक्कम परत मागविण्यासाठी निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांचे Exit and Withdrawal Under the National Pension System Regulations २०१५ मधील विनियम ६ (ई) व तदनंतर वेळोवेळी सुधारणा झालेल्या तरतुदीनुसार आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडून विहीत नमुन्यात माहिती प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह Online Family Pension Exit Withdrawal चा


प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात यावा." तसेच सदर परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट-१ व परिशिष्ट-२ मधील परिच्छेद (ब) (२) मधील उपपरिच्छेद मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. 

"आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) प्रणालीवर Error Rectification Module व्दारे मृत कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यामध्ये जमा असलेली एकूण संचित रक्कम परत मागवावी. मृत कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) यांचेकडून करून यावी."


ऐवजी


"आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय/ जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) प्रणालीवर Online Family Pension Exit Withdrawal ला मंजूरी द्यावी. मृत कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) यांचेकडून करुन घेण्यात यावी."


हा शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०५३०११४४०४८८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने. 


(महेंद्र सावंत)

शासनाचे अवर सचिव


वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

वाचा :-

दिनांकः ३०.०५.२०२४

१) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- अंनियो-१००५/१२६/सेवा-४, दि.३१.१०.२००५.

२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- अंनियो-२०१२/प्र.क्र.९६/सेवा ४. दि.२७.०८.२०१४.

३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- रानियो २०२२/प्र.क्र.३४/सेवा-४. दि.३१.०३.२०२३.

शासन परिपत्रक :

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३१.१०.२००५ व दिनांक २७.०८.२०१४ अन्वये दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. तसेच वित्त विभाग, शासन निर्णय दि.३१.०३.२०२३ अन्वये परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत दि.०१.११.२००५ रोजी व त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याच किंवा अन्य विभागातील / कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आली असेल तर सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदान यासाठी अर्हताकारी सेवेची परिगणना करण्याकरिता शासकीय कर्मचाऱ्याची पूर्वीची सेवा नवीन पदाच्या सेवेस जोडून देण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे.

२. दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याच किंवा अन्य विभागातील / कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आल्यास अशा प्रकरणी पुढील अटीची पूर्तता झाल्यास, सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान यासाठी अर्हताकारी सेवेची परिगणना करण्याकरिता संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास पूर्वीची सेवा सध्याच्या पदास जोडून देण्यास परवानगी देता येईल -

(अ) शासकीय कर्मचाऱ्याची अगोदरची नियुक्ती नियमित स्वरुपाची वैध मार्गाने झालेली असावी, म्हणजेच त्या शासकीय कर्मचाऱ्याची संबंधित पदासाठी विहित करण्यात आलेल्या सेवाप्रवेश नियमांच्या तरतूदींची (उदा. वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत / मंडळामार्फत नियुक्ती इत्यादींबाबतची पूर्तता करुन नियुक्ती झालेली असावी. (ब) शासकीय कर्मचाऱ्याने अगोदरच्या पदाचा परिवीक्षाधीन कालावधी समाधानकाररित्या पूर्ण केलेला असावा.

(क) शासकीय कर्मचाऱ्याने नवीन पदासाठी केलेला अर्ज संबंधित कार्यालयाच्या प्रशासकीय

प्राधिकाऱ्याची योग्यरित्या पूर्वपरवानगी घेऊन केलेला असावा. (ड) उपरोक्त दोन नियुक्त्यांमध्ये जर खंड असेल तर त्या खंडाचा कालावधी बदलीच्या नियमांनुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीहून अधिक नसावा.

उपरोक्त अटींपैकी वरील (ब) येथील अटीनुसार एखाद्या कर्मचाऱ्याने अगोदरच्या पदाचा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला नसेल तर, त्याचा नवीन किंवा दुसऱ्या पदावर स्थायीकरण झाल्यावर पहिल्या पदासाठी केलेल्या परिवीक्षाधीन सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

३. उपरोक्त सर्व बाबीची पूर्तता होत असेल अशा शासकीय कर्मचाऱ्यास सेवा जोडून देणेबाबत लाभ अनुज्ञेय ठरेल. अशा प्रकरणी संबंधित प्रशासकीय विभागाने समुचित खात्री करुन स्वयंस्पष्ट शिफारशीसह प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेस्तव सादर करणे आवश्यक राहील.

४. हे शासन परिपत्रक जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिकशाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेचकृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफरांसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.

संबंधित प्रशासकीय विभागांनी प्रस्तुत शासन परिपत्रकातील तरतूदीनुसार त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांसाठी सूचना निर्गमित करणे अभिप्रेत आहे. त्यानुषंगिक प्रारुप मसुदा मान्यतेसाठी अथवा तपासणीसाठी वित्त विभागाकडे स्वतंत्रपणे पाठविण्याची आवश्यकता नाही.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०५३०११४७२९८७०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(मनिषा यु. कामटे)
शासनाचे उप सचिववरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.