महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातून दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार पीएम श्री योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील शाळा निवडीच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत राज्य प्रकल्प संचालक यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
PM SHRI योजनेंतर्गत समता, प्रवेश, गुणवत्ता व सर्व समावेशक समग्र व्यवस्था असणारी उदाहरण दाखल शाळा, इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल अशाप्रकारे देशभरातील १४,५०० शाळा विकसित करावयाच्या आहेत त्यानुषंगाने केंद्रशासनाने देशभरातील १०,०८० शाळांची निवड केली असून आपल्या राज्यातील पहिल्या टप्प्यात ५१६ शाळा व दुसऱ्या टप्प्यात ३११ शाळा अशा एकूण ८२७ शाळांची निवड करण्यात आलेली आहे हे आपणांस ज्ञात आहे.
१. केंद्रशासनाने संदर्भिय पत्र क्र. १ अन्वये PM SHRI (PM Schools for Rising India) शाळा निवडीकरिताचा तिसरा टप्पा दि.१५/०४/२०२४ पासून सुरू करण्यात येत असल्याबाबत कळविले आहे.
२. तिसऱ्या टप्प्यातील PM SHRI योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पारदर्शकपणे शाळा निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन कार्यपध्दतीतील सूचनांचा अवलंब करून Bench Mark Schools म्हणून निश्चित असलेल्या शाळांनी स्वयं नोंदणी करावयाची आहे. ऑनलाईन PMSHRI पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित मार्गदर्शक सूचनेनुसार शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कार्यवाही कालमर्यादेत करणे बंधनकारक आहे.
३. त्यानुषंगाने उपरोक्तबाबत आपल्या स्तरावरून विहित वेळेत खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करावी. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ज्या तालुक्यातील शाळांची निवड झाली नाहीत अशा तालुक्यांतील शाळा निवड प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त सहभागी होतील. ज्यामुळे शाळा निवडीपासून एकही तालुका वंचित राहणार नाही याची खात्रीपूर्वक दक्षता घ्यावी. आपल्या तालुक्यातील Bench Mark शाळांपैकी कित्ती शाळांनी स्वयंनोंदणी केली वा
केली नाही याबाबत नियमित अनुधावन करावे व त्या तालुक्यातील Bench Mark मधील सर्व शाळांना स्वयं नोंदणी करण्याकरिता प्रोत्साहन व मदत करावी. PM SHRI योजनेतंर्गत शाळा नोंदणी व जिल्हास्तरावरून पडताळणीबाबतची कालमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments