मराठा आरक्षण सर्वेक्षण 2024 प्रगनक मानधन अपडेट - प्रगणक यांचे मानधन अदा करणे बाबत आदेश

दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी जिल्हाधिकारी बीड यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार मराठा आरक्षण सर्वेक्षण साठी नियुक्त प्रगनकांचे मानधन अदा करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


प्रगणकास मागासवर्ग कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब रु.१० व मराठा/खुल्या कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब रु.१०० इतके मानधन निश्चीत करण्यात आले आहे असे नमूद करुन सोबतच्या तक्त्यामध्ये मराठा/खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण केलेल्या प्रगणकांना अदा करावयाच्या मानधनाचा बीड जिल्हयाचा तपशील दिलेला आहे.


तसेच संदर्भ क्र.०२ च्या पत्रान्वये प्रगणकांची संख्या व त्यांनी केलेले सर्वेक्षणाचे काम याची माहिती गोखले इन्स्टीटयुटकडून प्राप्त झाली असून त्यानुसार त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या कामाचे मानधन या कार्यालयाने मा. आयोगास सादर केलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया राजुरी वेस शाखा, बीड येथील खाते क्र. ६२००२५०८६५७ या बँक खात्यावर उपलब्ध करुन दिले आहे. गोखले इन्स्टिटयूटकडून प्राप्त जिल्हयाची प्रगणकांची तालुकानिहाय यादी सोबत देवून त्या यादीतील रक्कम + रु.५०० प्रवास भत्ता प्रत्येक प्रगणकाच्या बँक खात्यावर जमा करणे बाबत तसेच सदर मानधन व खर्चाची रक्कम संबंधीतांना अदा करुन २ महिन्यांच्या आत उपयोगीता प्रमाणपत्र आयोगास सादर करणे बाबत व काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास ९० दिवसांच्या आत आयोगाच्या बँक खात्यावर परत करणे बाबत कळविले आहे.


त्याअनुषंगाने संदर्भ क्र.०१ व क्र.०२ ची प्रत व तहसीलदार यांना द्यावयाच्या निधीच्या तालुकानिहाय तक्त्याची प्रतं सोबत देण्यात येत असून सोबतच्या तक्त्यात नमूद प्रमाणे रक्कम संबंधीत तहसीलदार यांचे खात्यावर जमा करण्यात यावी.


सोबतः- वरीलप्रमाणे

(शिवकुमार स्वामी) निवासी उपजिल्हाधिकारी, बीड



परिपत्रक जिल्हाधिकारी बीड यांचे असले तरी परिपत्रकात नमूद असलेल्या संदर्भित आदेशानुसार इतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी देखील असे आदेश निर्गमित होऊ शकतात. 

संदर्भित आदेशानसह वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.