पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती 2022 आज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजीचे अपडेट महत्वपूर्ण सूचना.

शिक्षक भरती 2022 महाराष्ट्र शासन आज दिनांक नऊ फेब्रुवारी 2024 रोजी पवित्र प्रणालीवर नवीन सूचना देण्यात आले आहे त्या पुढील प्रमाणे.



दिनांक ०९/०२/२०२४ वेळः दुपारी २.०० वा.

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


आजची कार्यवाही -


• उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. सदरची सुविधा दिनांक ०९/०२/२०२४ ते १२/०२/२०२४ या कालावधीमध्ये सूरू राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


• वयाधिक या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांतील इ. ९ ते १० वी व इ ११ वी ते १२ वी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे, यास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विहित मुदतीत लॉक करण्याची कार्यवाही करावी.


• काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी Alert येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डीलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी.


• प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही, यास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे.


• अभियोग्यताधारकांकडून ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या "न्युज बुलेटिन "द्वारे उत्तरे देण्यात येत आहेत. अभियोग्यताधारकांचे वेळ, श्रम वाचविण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्यादृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यावी. त्यामुळे कार्यालयात गर्दी करु नये तसेच कोणाही अधिकारी/कर्मचारी अथवा अनाधिकृत व्यक्ती यांना व्यक्तींशः संपर्क करु नये.


Link 👇

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Notifications.aspx?NotificationCategoryID=18


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. प्राधान्य क्रम उपलब्ध होत नाहीत आहे ,. र नो 121002328 नाव श्रद्धा साहेबराव वाहिले

    ReplyDelete
    Replies
    1. अधिकृत मेलवर ई-मेल करावा

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.