संकलित मूल्यमापन १ साठी कमी पडणाऱ्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स केलेल्या देयके कार्यालयास तात्काळ सादर करणेबाबत......

 राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र चे संचालक यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक साठी कमी पडलेल्या प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स केलेल्या देहकांच्या नसतीची प्रमाणित केलेली झेरॉक्स कार्यालयास सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


STARS प्रकाल्पामधील SIG limproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे. उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यात दि. ३० व ३५ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळामध्ये प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा-इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन १ आयोजन करण्यात आलेले होते. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये राज्यस्तरावरून पुरवठा याबाबत आढावा घेण्यात आलेला होता. यामध्ये साहित्य प्राप्त झालेल्या जिल्ह्यामध्ये साहित्य काहीप्रमाणात कमी पडत असल्याचे सांगण्यात आलेले होते. विद्यार्थी चाचणीपासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील कमी पडणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन त्यांचे स्तरावर झेरॉक्स काढून शाळांना पुरवठा करणेबाबत कळविले होते. तसेच कमी पडणाऱ्या प्रश्नपत्रिकांची संख्या परिषदेला दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३ अखेर काळविणेबाबत सूचित केलेले होते. परिषदेला प्राप्त मागणीनुसार जिल्ह्याला खर्च अदा करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार अहमदनगर, पुणे, बीड, भंडारा, धुळे, गोंदिया, पालघर, वाशीम या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांनी परिषदेकडे मागणी केलेली आहे, तरी मागणी केलेल्या जिल्ह्यांनी सदर चाचणी साहित्याचा शाळांना पुरवठा केलेल्या देयकाच्या नस्तीची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रत या कार्यालयास दि. ९ नोव्हेंबर २०२३ अखेर सादर करावी. जेणेकरून आपले देयक आपणास वेळेत देण्याची आवश्यक कार्यवाही तात्काळ करता येईल.

नस्तीमध्ये सादर करावयाची माहिती.

१. प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढल्या की राज्यावरून पुन्हा छपाई करून घेतल्या?

२. परिषदेकडे विहीत कालावधीत प्रश्नपत्रिकांची मागणी केलेल्या मेलची साक्षांकित प्रत. ३. बिलाच्या/देयकाच्या साक्षांकित केलेल्या प्रती (पेड & कॅन्सल शिक्का - स्वाक्षरीसह)

४. देयकाचा एकत्रित घोषवारा व एकूण देयक

५. नियमानुसार कोटेशन (दरपत्रक) ची आवश्यकता असल्यास त्याचे पुरावे.

६. ज्या खात्यावर निधी वर्ग करावयाचा आहे त्या खात्याचा बँक तपशील (PFMS खाते सोडून) 

७. प्रश्नपत्रिका सांखिकी माहिती तक्ता सोबत जोलेला आहे त्याप्रमाणे नस्तीमध्ये जोडणे.

तरी याबाबत आवश्यक नस्ती परिषदेला प्रत्यक्ष आपण स्वतः अथवा आपल्या प्रतिनिधीमार्फत दि. ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ पर्यंत सादर करावी. माहिती अचूक व वेळेत प्राप्त होईल याबाबत दक्षता घ्यावी.


(अमोल येडगे भा.प्र.से.) संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद, महाराष्ट्र, पुणे


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.