शिक्षक अतिरिक्त ठरवत असताना शिक्षण संचालकांच्या परिपत्रकानुसार काही मार्गदर्शक तत्वे.

 खाजगी शाळांमध्ये विविध कारणांमुळे शिक्षक/ शिक्षकेत्तर अतिरिक्त ठरतात. या संदर्भात महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्रमांक २६ अन्वये शासनाने तसेच शिक्षण संचालनालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत त्यानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरवता येईल. 

शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी अरील कारणे असू शकतील. 

१ वर्ग  किंवा तुकड्यांची संख्या कमी झाल्यामुळे आस्थापनेतील कपात. 

२. विद्यार्थ्याच्या संख्येत घट झाल्याने आस्थापनेतील कपात. 

३. विवक्षित प्रवर्गातील शिक्षकांच्या संख्येवर परिणाम होईल अशा प्रकारे झालेला अभ्यासक्रमातील बदल. 

४. अभ्यास पाठयक्रम किंवा एखादी शाळा बंद होणे.

५. तत्सम स्वरुपाचे अन्य कारण कर्मचारी अतिरिक्त ठरविताना पाळावयाची तत्वे. 



 

१. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम १२ अनुसूची फ नुसार संस्थेतील सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचान्यांची जेष्ठता यादी तयार करून त्यातील कनिष्ठतम कायम कर्मचारी अतिरिक्त ठरवावा असे करताना इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतची विद्यार्थी संख्या कमी झाल्यास प्रशिक्षित पदवीधर कनिष्ठतम कायम शिक्षक अतिरिक्त ठरतील व इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतची विद्यार्थी संख्या कमी होत असल्यास प्रशिक्षित अपदवीधर कनिष्ठतम कायम शिक्षक अतिरिक्त ठरतील. 

२. कर्मचारी वर्गात कोणताही कपात करावयाची असेल तेव्हा अगोदरच सेवेत असलेल्या मागासवर्गीय व्यक्ती जेष्ठतेनुसार कपातीस पात्र असला तरी शाळेतील त्यांची संख्या विहित केलेल्या राखीव जागांच्या टक्केवारीनुसार अधिक नसेल तर त्यांना अतिरिक्त ठरविता येणार नाही, त्यांच्याऐवजी कर्मचारी वर्गापैकी तेवढयाच मागासवर्गेतर इतर व्यक्तीना सेवाजेष्ठतेनुसार अतिरिक्त ठरवावे.


३. व्यवस्थापन एकापेक्षा अधिक शाळा चालवीत असल्यास त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित सेवाजेष्ठता सूची ठेवावी. एकत्रित सेवाजेष्ठता यादीतील कनिष्ठतम कायम कर्मचान्यास अतिरिक्त  ठरवावे. 

४. अस्थायी परिविक्षा कालावधी चालू असलेले कर्मचारी व शिक्षण सेवक यांना अतिरिक्त ठरवू नये. त्यांच्या सेवा संपुष्टात आणाव्यात. 


अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत संस्थेने करावयाची कार्यवाही..

१. शासन निर्णय दिनांक २८.८.२०१५, ८.१.२०१६, २७.०५.२०१६ अन्वये शिक्षक निश्चिती नुसार मंजूर झालेल्या पदांचा विचार करुन मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व उपशिक्षक वरील मार्गदर्शक करा तत्त्वानुसार अतिरिक्त ठरवावेत. संस्थेतील अन्य शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन


२. शासन निर्णय दिनांक २८.८.२०१५ नुसार शाळांमध्ये पद अनुज्ञेय ठरत नसल्यास त्यांना शासन निर्णय दिनांक २७ मे २०१६ अन्वये, त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे. त्याच व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावेत. सदर मुख्याध्यापकांना सेवानिवृत्ती नंतर संबंधित शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्ये अभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत कराये सदरची तरतूद ही फक्त अनुदानित शाळांसाठी लागू राहील. 


३. उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचे समायोजन करण्यासाठी रिक्त पदे शिल्लक नसल्यास अनुशेषाचा विचार करुन कनिष्ठतम कर्मचान्यास पदावनत करावे व त्यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे संख्येतील रिक्त पदांवर संस्थातर्गत समायोजन करावे.

७. प्रशिक्षित अपदवीधर शिक्षकांचे प्रशिक्षित अपदवीधर पदावर समायोजन कराये प्रशिक्षित 

८. पदवीधर शिक्षकांचे प्रशिक्षित पदवीधर पदावर समायोजन करावे. प्रशिक्षित पदवीधर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनासाठी पदे उपलब्ध नसल्यास व प्रशिक्षित अपदवीधर शिक्षकाचे पद उपलब्ध असल्यास समायोजन करावे. अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्तीचे प्रवर्गानुसार प्राधान्याने त्याच प्र आरक्षित पदावर समायोजन करावे परंतु अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गांची आरक्षित पदे त्याचे समायोजन पदवीचा विषय व अध्यापनाचा विषय यांचा विचार पान रिक्त नसल्यास, उपलब्ध रिक्त पदांत त्यांचे तात्पुरते समायोजन करावे. शिक्षकाचे माध्यम निहाय अल्पसंख्याक संस्थातील रिक्त अल्पसंख्याक संस्थांतील अतिरिक्त पदांवर समायोजन करावे. 

९. अतिरिक्त कर्मचारी रजा काळासाठी निर्माण झालेल्या किंवा काही काळासाठी निर्माण झालेल्या पदावर सामावून घेऊ नये. 

१०. अतिरिक्त कर्मचान्यास सामावून घेताना त्याचीसेवा ही कायम सेवा म्हणून धरली जावी. 

११. अतिरिक्त कर्मचान्याने त्याला समायोजनासाठी दिलेल्या शाळेत जाण्यास नकार दिल्यास त्याचा समायोजनाचा हक्क राहणार नाही आणि त्याच्या मूळ व्यवस्थापनाला, त्याला तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सेवेतून कमी करण्याची परवानगी देता येईल. 

१२. अतिरिक्त उपलब्ध झाल्यास त्या अतिरिक्त कर्मचान्यास मूळ शाळेत रुजू होण्याची पहिली संधी दिली जावी. त्यासाठी कर्मचाऱ्याने स्वतःचा पत्ता व जागेची उपलब्धता एप्रिल महिन्याच्या अगोदर संस्थाचालकास रजिस्टर पोष्टाने कळविण्याच्या सूचना त्या अतिरिक्त कर्मचान्याला द्याव्यात. कर्मचारी इतरत्र सामावला गेला असला तरी सुध्दा मूळ शाळेत नवीन शिक्षक पद अशा कर्मचान्यास पुन्हा त्याच्या मूळ जागेवर आपली सेवा पुढे चालू ठेवण्याकरिता विकल्पाधिकार असेल.


१३. अतिरिक्त कर्मचारी इतरत्र सामावला जाईपर्यंत त्याचे वेतन मूळ आस्थापनेतून काढले जाईल. 

१४. एखाद्या संस्थेने अतिरिक्त कर्मचान्यास सामावून घेण्याचे आदेश असतानाही रुजू करुन घेतले नाही तर शाळेत मंजूर असलेल्या पदांपैकी रुजू करून न घेतलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येइतकी पदे अनुज्ञेय होणार नाहीत. अर्थात पदे रद्द करण्यात येतील याची संस्था चालकांना जाणीव करुन द्यावी. तदनंतरही समायोजनेच्या आदेशाची न केल्यास सदर पदे व्यपगत करावीत.


शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे

 संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.