शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ साठी मुदतवाढ देणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांचे निर्देश

 दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ पासून शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ सुरु आहे, हे आपणास विदितच आहे. याबाबत या कार्यालयामार्फत वेळोवेळी ऑनलाई बैठकांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ देण्यात आली होती. संदर्भ क्रमांक ३ नुसार राज्यातील विविध शिक्षक व शिक्षक संघटनांमार्फत स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याची मुदतवाढ करणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे.


उपरोक्त बाबींचा विचार करता मुदतीत प्राप्त झालेल्या व्हिडीओची; गट, इयत्ता व विषयवार वर्गवारी पाहता; तसेच भविष्यात शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोणातून स्पर्धेची उपयुक्तता वाढविणे, स्पर्धात्मक वातावरण तयार करणे इत्यादी बाबी विचारात घेता; प्रस्तुत स्पर्धेबाबत सविस्तर सूचना देण्याचे व स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करून प्रस्तुत स्पर्धेबाबत खालील निर्णय घेण्यात येत आहेत, 

१) स्पर्धेमध्ये भाग घेण्याची (व्हिडीओसह नावनोंदणी) मुदत दिनांक १५/१०/२०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे. २) विद्यालयांची संख्या विचारात घेता इयत्ता ११ वी १२ वी गट व अध्यापक विद्यालय गट या दोन्ही गटाचे मूल्यांकन तालुका ऐवजी जिल्हा स्तरावरून सुरु होईल. त्यामुळे प्रस्तुत गटातील उमेदवार फक्त जिल्हा स्तरापासून पुढील प्रक्रियेस पात्र असतील.

३) इयत्ता ११ वी १२ वी गटामध्ये भाग घेण्यासाठी या शाखानिहाय राज्य शिक्षण मंडळाचे सर्व विषय समाविष्ट करण्यात येत आहेत.


४) तालुका समन्वयक स्पर्धेसाठी तालुका समन्वयक म्हणून प्रत्येक तालुक्यासाठी एका विस्तार अधिकाऱ्याची नेमणूक करावी. त्यांनी केंद्रातून जास्तीत जास्त शिक्षक या स्पर्धेत सहभागी होतील याबाबत केंद्रप्रमुखांचा आढावा घ्यावा. तालुक्यातून प्रत्येक गटातील प्रत्येक इयत्तेतील, दिलेल्या विषयासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ निर्मिती होऊन त्यामधून त्या-त्या इयत्तेच्या सर्व अध्ययन निष्पत्ती साध्य होतील व भविष्यात तालुक्याच्या शैक्षणिक उपयोगासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ तयार होतील याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. यासाठी केंद्रप्रमुख यांचे स्तरावर बैठका घेऊन योग्य ते नियोजन करण्यात यावे. याबाबत तालुका समन्वयकांनी आवश्यकतेनुसार त्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व डायट संपर्क अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे.


५) केंद्रप्रमुख केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्राची ऑनलाईन / ऑफलाईन बैठक घेऊन अधिकाधिक शिक्षक सदर स्पर्धेत भाग घेतील हे पहावे. तसेच तालुका समन्वयकाशी चर्चा करून तालुक्याच्या गरजेनुसार स्पर्धा गटात इयत्तेनुसार, विषयानुसार आशय वैविध्य आणून व्हिडिओ स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षकांना व्हिडिओ निर्मितीसाठी आशय / अध्ययन निष्पत्ती निवडण्यास प्रोत्साहित करावे. तालुका समन्वयकाच्या मार्गदर्शनाखाली; विषयात व आशयात वैविध्य येण्यासाठी केंद्रप्रमुख आपल्या केंद्राचे नियोजन करू शकतील. याबाबत केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रात बैठक घेऊन योग्य त्या सूचना व प्रेरणा द्यावी.


६) विषय वैविध्य राखून जास्तीत जास्त व्हिडिओ बनविले जात आहेत याबाबत तालुका समन्वयक तालुक्याचा व केंद्रप्रमुख केंद्राचा दैनंदिन आढावा घेतील.


७) स्पर्धात्मक वातावरण रहावे म्हणून प्रत्येक स्तरासाठी प्रत्येक तालुका/गटातील शाळा संख्येच्या किमान ३०% व्हिडिओ नोंदणी होणे गरजेचे आहे अन्यथा संबंधित गट स्पर्धेतून बाद ठरविला जाईल.


८) प्रस्तुत स्पर्धेत जास्तीत जास्त नोंदणी करणाऱ्या पहिल्या १० तालुक्यांना (गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, डाएट संपर्क अधिकारी, विस्तार अधिकारी ०१ व केंद्रप्रमुख) व पहिल्या ३ ( प्राचार्य डाएट शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, आय. टी. विभागाचे वरिष्ठ अधिव्याख्याता - ०१) जिल्ह्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.


९) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची एक संयुक्त बैठक (पत्र मिळाल्यापासून २ दिवसात) घेऊन याबाबत सविस्तर सूचना द्याव्यात.


१०) एखाद्या गटामध्ये व्हिडिओ मुल्यांकन करण्यासाठी विषयनिहाय विशेष तज्ज्ञता असलेले अतिरिक्त तज्ज्ञ परीक्षक आवश्यक असल्यास तालुका / जिल्हा / राज्य निवड व सनियंत्रण समिती आवश्यकतेनुसार या कामासाठी अतिरिक्त विषयनिहाय तज्ज्ञ परीक्षक नेमू शकते. सदर अतिरिक्त तज्ज्ञास याबाबतचे गौरवपत्र देण्यात येईल. 

११) उपरोक्त मुदतवाढीमुळे स्पर्धेच्या विविध स्तरावरील कालमर्यादेत खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.


तालुका स्तर

तपशील / प्रमुख


ऑनलाई नामांकन नोंदणी व व्हिडिओ अपलोड करणे. कालावधी

दि. १५ ऑक्टोबर २०२३

तालुकास्तर

प्रक्रिया(BRC /URC)


०३


जिल्हास्तर प्रक्रिया

उपसंचालक, प्रादेशिक विद्या


१ सप्टेंबर २०२३ ते २२ ऑक्टोबर २०२३

गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी

| २३ ऑक्टोबर २०२३ ते १०


प्राधिकरण / प्राचार्य, जिल्हा जिल्हा शिक्षण व नोव्हेंबर २०२३ प्रशिक्षण संस्था

०४

निवड राज्यस्तर प्रक्रिया

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद, महाराष्ट्र, पुणे


०५

राज्यस्तर समितीमार्फत पडताळणीअंती

उमेदवारांची शासनास शिफारस

| ११ नोव्हेंबर २०२३ ते २४ नोव्हेंबर २०२३


०६

राज्यस्तर पुरस्कार वितरण

माहे नोव्हेंबर २०२३ पर्यंत

१५ डिसेंबर २०२३ पर्यंत


१२) उपरोक्त सुधारणा व्यतिरिक्त स्पर्धेचे इतर सर्व नियम या कार्यालयाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक २ च्या पत्रानुसार लागू असतील.


करिता आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षकांना प्रस्तुत स्पर्धेसाठी नावनोंदणी करणेस आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे.


(अमोल येडगे)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.