आज दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा करणे बाबत शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक दोन फेब्रुवारी 2023 रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा करणे बाबत शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात. खरे पाहता आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. आजी आजोबा पहिले मित्रच असतात. नात्याची तेव्हा तिथूनंच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्वपूर्ण असून हे नाते पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी आहे.


२. शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्यांच्या जडण घडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करणे यासाठी "आजी आजोबा" दिवस शाळेत साजरा करणे संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे आहे. मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी "आजी आजोबा" दिवस साजरा होणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी "आजी आजोबा दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षी १० सप्टेंबर, २०२३ रोजी "आजी आजोबा" दिवस असून त्याअनुषंगाने त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन परिपत्रक-


""आजी आजोबा" दिवस हा उपक्रम राबवून राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून "आजी आजोबा" दिवस साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी "आजी आजोबा" दिवस साजरा केला जातो. त्यानुसार हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी शाळांमध्ये "आजी आजोबा" दिवस म्हणून साजरा करण्यात यावा व या दिवशी शासकीय सुट्टी आल्यास त्याच्या पुढच्या कार्यालयीन दिवशी ह्या दिवसाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. तथापि या प्रस्तावित दिवशी सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेकडून न करता आल्यास शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस "आजी आजोबा" दिवस म्हणून साजरा करावा व यानिमित्ताने राज्यस्तर जिल्हास्तर व शाळास्तरावर खालील विविध कार्यक्रम साजरे करण्यात यावेत.


सदर दिवशी आजी आजोबांकरिता खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत,


१. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून द्यावा.


२. आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत.


३. विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ सुद्धा ठेवण्यास हरकत नाही.


४. संगीत खुर्चीसारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील. .


५. आजी आजोबां सोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा 

६. पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबा यांना बोलवावे. (सदर बाब ऐच्छीक असावी.)


७. महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.


४८. शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर कराव्यात.


९. आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे. १०. झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.


सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा सांकेतांक २०२३०२०२१८५०४१४२२१ असा आहे. हे शासन परिपत्रक डीजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(इ.मु.काझी)


सह सचिव, महाराष्ट्र शासन


 वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.