राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धे अंतर्गत व्हिडिओ अपलोडिंग लिंक सुरू! नोंदणी करून व्हिडिओ कसा अपलोड करावा? शेवटचे काही दिवस..

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारे आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचा व्हिडिओ अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी करून कसा अपलोड करावा याबाबत सविस्तर माहिती.

MSCERT Quality Educational Video Creation/Making Competition Video Uploading Link. 


स्पर्धेला मुदतवाढ देण्यात आलेली असून सदर मुदतवाढ दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.


 आपण तयार केलेला दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://scertmaha.ac.in/vcomp2023/


वरील लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे पेज ओपन होईल.





वरील पेज ओपन झाल्यानंतर त्या पेजवरील नोंदणी या निळ्या रंगाच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे पेज ओपन होईल.



वरील पेजमध्ये आपला अचूक मोबाईल नंबर नोंदवा व पुढे जा या बटनवर क्लिक करा आपणास पुढील प्रमाणे पेज ओपन होईल.
पुढील पेज मध्ये आपल्याला आपल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी ओटीपी टाकायचा आहे.



आपल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी ओटीपी टाकल्यावर आपल्याला पुढील प्रमाणे पेज ओपन होईल.

आपण ही माहिती मोबाईलवर भरत असल्यास आता आपल्या ब्राउझरचे डेस्कटॉप मोड ऑन करा.

आपल्याला पुढील प्रमाणे पेज ओपन होईल.. 

पुढील पेज मध्ये आपली प्राथमिक माहिती जसे की आडनाव पहिले नाव म्हणजेच स्वतःचे नाव आणि वडिलांचे नाव अगोदर देवनागरीमध्ये व त्याखाली इंग्रजीमध्ये अचूक लिहा.

त्यानंतर योग्य ते जेंडर निवडा आपला अचूक असा ईमेल आयडी नोंदवा मोबाईल क्रमांक अगोदरच आलेला असेल.

आपल्या शाळेचा 11 अंकी यु-डायस कोड नोंदवल्यानंतर शाळेची माहिती आपोआप येईल.

त्यानंतर आपली राष्ट्रीयकृत बँकेचे किंवा आयएफएससी कोड असलेले बँकेचा अकाउंट नंबर आयएफसी कोड नोंदवल्यानंतर बँकेचे नाव आपोआप येईल.



वर्गाचा गट निवडण्यासाठी आपल्याला पुढील पर्याय उपलब्ध असतील त्यापैकी योग्य तो पर्याय निवडावा.


त्यानंतर आपण निवडलेल्या वर्गानुसार आपल्याला विषयाचे पर्याय उपलब्ध होतील उदाहरणार्थ आपण सहा ते आठ हा पर्याय निवडला तर पुढील प्रमाणे पर्याय उपलब्ध होतील.


वरील पर्याय तुम्ही निवडलेल्या वर्गानुसार वेगवेगळे असतील. त्यापैकी योग्य तो आपण तयार केलेल्या व्हिडिओ नुसार पर्याय निवडावा.
विषय निवडल्यानंतर आपल्याला व्हिडिओचा प्रकार निवडावा लागेल त्याचे पर्याय पुढील प्रमाणे असतील.


वरील पर्यायांपैकी आपण तयार केलेल्या व्हिडिओ नुसार आपल्याला पर्याय निवडावा लागेल.

त्यानंतर माध्यम निवडावे लागेल माध्यमांचे पुढील पर्याय उपलब्ध आहेत.



वरीलपैकी योग्य ते माध्यम निवडल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला तुम्ही तयार केलेला व्हिडिओ अगोदर तुमच्या अधिकृत ई-मेल आयडीच्या गुगल ड्राईव्ह वर योग्य ते नाव देऊन सेव करावा लागेल. सेव्ह केल्यानंतर त्याची सेटिंग्स पुढील प्रमाणे बदलावी.

आपल्या ड्राइवर जाऊन त्याच्या बाजूला असलेल्या तीन डॉट वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे सेटिंग ओपन होईल त्यामधील मॅनेज एस एस वर क्लिक करावे


ते अगोदर डिस्ट्रिक्टेड असेल पुढील प्रमाणे


त्यावर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे ओपन होईल त्यामधील एव्हरीवन विथ लिंक वर टच करावे


व्हिडिओचे असेच एवढी वन विथ लिंक असे ठेवावे व त्या बाजूला असलेल्या कडीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओची लिंक मिळेल ती आपण भरत असलेल्या माहितीमध्ये सर्वात शेवटी कॉपी करून पेस्ट करावी.


व आपल्या एस सी आर टी च्या व्हिडिओ अपलोडिंग साईटवर

लिंक पेस्ट करून व्हेरिफाय बटन वर क्लिक करावे.

जर आपण योग्य पद्धतीने लिंक पेस्ट केली असेल तर ती व्हेरिफाय होईल.

 आपले सबमिट बटन गडद निळ्या रंगाचे होईल व त्यावर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ अपलोडिंग ची प्रक्रिया पूर्ण होईल.

सबमिटेड सक्सेसफुली चा स्क्रीन शॉट काढून ठेवण्यास विसरू नका.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.