शालेय विद्यार्थ्यांना ने आन करणाऱ्या बस बाबत नियम, अधिनियम, शासनादेश, सूचना संपूर्ण मार्गदर्शिका.

 शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सूचना.


प्रस्तावना : शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सुनियोजित व कार्यक्षम बससेवा सुरू करण्यासाठी शासन निर्णय, गृह विभाग क्र. एमव्हीआर ०८०८ /सीआर-१५३ / परि-२, दि. २३/७/२००८ अन्वये परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलली असून त्या समितीने शिफारस केल्यानुसार शासनाने स्कूल बसकरिता महाराष्ट्र मोटार वाहन नियम, २०१० तयार केला असून त्यास मंत्रिमंडळाने दि. २४/६/२०१० रोजी मान्यता दिलेली आहे. या नियमावली अंतर्गत स्कूल बस नियम आणि विनियम, २०११ प्रमाणे शालेय शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.


शासन निर्णय: स्कूल बसकरिता महाराष्ट्र मोटार वाहन नियम, २०१० अंतर्गत राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता सुनियोजित, सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना, शासन खालीलप्रमाणे स्कूल बस नियम आणि विनियम, २०११ निश्चित करीत आहे.


क) शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे, या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती असेल आणि ही समिती वाहनाची कागदपत्रे, जसे- नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, पीयुसी, वाहनाची अनुज्ञाप्ती (Driving Licence), अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार सुविधा आणि या नियमांच्या परिशिष्ट २ मध्ये विनिर्दिष्ट केल्यानुसा सामायिक प्रमाणित करारपत्र (कंत्राट) इत्यादींची पडताळणी करील.


या समितीच्या अध्यक्षस्थानी त्या शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य असतील आणि एक पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक / पोलीस निरीक्षक, शिक्षण निरीक्षक किंवा शिक्षण अधिकारी यांचे प्रतिनिधी, बसच्या कंत्राटदाराचा प्रतिनिधी आणि स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांचा समितीत समावेश असेल, समितीची तीन महिन्यातून किमान एकदा आणि प्रत्येक सत्र सुरू होण्याच्यापूर्वी बैठक घेण्यात येईल...


ख) शाळेतील मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य जबाबदार असतील आणि शाळेतील मुलांची ने-आण करताना ती कशी केली जाते, याकडे दररोज लक्ष पुरविण्यासाठी आवश्यक पाऊले उचलतील.


ग) शाळेचे प्राधिकारी, शाळेचे सत्र सुरू होण्यापूर्वी वर्षातून दोन वेळा, एक दिवसीय प्रथमोपचार उजळणी पाठ्यक्रम घेण्यास उत्तरदायी असतील. घ) शाळेचे प्राधिकारी, शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला मुलांना सुरक्षितपणे जाता यावे म्हणून वाहतूक पोलिसांशी विचारविनिमय करून वाहतूकीचे नियमन करण्यासाठी पुरेशा संख्येत वाहतूक रक्षक नियुक्त करतील.
ड) शाळेच्या प्रशासकांनी वाहतूक पोलिसांशी विचारविनिमय करून आणि त्यांच्या व स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने शाळेजवळ आवश्यक ती चिन्हांकने आणि खुणा लावण्यात येतील. याची खबरदारी घ्यावी.

च) शाळेच्या "आत येण्याच्या आणि "बाहेर जाण्याच्या फाटकासमोर १०० मीटर परिसरात शाळेचे कंत्राटी वाहन असल्याचा परवाना नसलेली कोणतीही खाजगी वाहने, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी थांबवण्यास शाळेच्या कोणत्याही प्राधिकाऱ्याने अथवा वाहतूक प्राधिकाऱ्याने परवानगी देवू नये. छ) किमान एम.बी.बी.एस. किंवा त्यावरील शैक्षणिक आर्हता धारण करणाऱ्या डॉक्टरने चालकाचे आरोग्य प्रमाणित

करणारे आणि नेत्ररोग तज्ञाने त्याच्या दृष्टीबाबत दिलले नमुना एक-क मधील वैद्यकीय प्रमाणपत्र वाहन चालकाने दरवर्षी सादर करावे. संबंधित शाळा व्यवस्थापकाने आणि / अथवा वाहतूकदाराने, वाहनचालकाने असे प्रमाणपत्र देण्यास कसूर केल्यास त्या चालकाला वाहन चालविण्यास प्रतिबंध करावा आणि ही बाब वैधानिक प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

ज) प्रत्येक शालेय प्रशासनाने त्यांच्या शाळेमधील मुलांची / मुलींची योग्य रकमेची सर्व समावेश विमा पॉलिसी काढावी. शालेय प्रशासनाने विम्याच्या हप्त्यासाठी देय असणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कातून वसूल करावी.

झ) वाहनचालक, महिला सहायक आणि स्वच्छक यांच्या ओळखीसाठी विभेदक गणवेश विहित करावा. कर्तव्यार्थ कर्मचाऱ्याने लावण्यासाठी चालकाने ओळखपत्र द्यावे. त्र) प्रथमोपचार पेटी आणि आवश्यक ती औषधे व साधने वाहनामध्ये ठेवावीत आणि ते तसे ठेवले आहेत, याची

प्राचार्याने / अधिकृत व्यक्तीने दर महिन्याला तपासणी करावी.

ट) विद्यार्थ्यांचा रक्तगट आणि आणीबाणीच्या वेळी संबंधितांशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक याची माहिती

प्रत्येक स्कूलबसमध्ये असावी.

ठ) कंत्राटावर घेतलेल्या प्रत्येक स्कूल बसमध्ये एबीसी प्रकारची ५ किलो क्षमतेची आणि प्रत्येकावर आयएसआय चिन्ह असलेली दोन अग्निशमके ठेवली आहेत, याची शालेय प्राधिकाऱ्याने खात्री करून घ्यावी. यापैकी एक. वाहनचालकाच्या केबिनमध्ये आणि दुसरे बसच्या (संकटकाळी बाहेर पडावयाच्या) आपातकालीन दरवाजाजवळ ठेवलेले असावे. तसेच प्रथमोपचार व अग्निशमन यंत्रणा चालविण्याचे प्रशिक्षण वाहक वाहन सहायक आणि वाहनचालक यांना देणे बंधनकारक राहील.

ढ) स्कूल बसचालकाने सामायिक प्रमाणित करारपत्रामध्ये ( कंत्राट ) शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या आणि शाळेच्या प्राधिकाऱ्यांनी व चालकाने परस्पर संगतीने मान्य केलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे. या अटी व शर्ती दोघांनाही बंधनकारक असतील.

ण) शाळेसाठी कंत्राटी तत्वावर वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनामध्ये वाहन चालविण्याचे लायसेन्स, परवाना, पात्रता

प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, पीयुसी प्रमाणपत्र हे नेहमी सोबत ठेवावे.

न) बसमालकाने शाळेच्या वेळांचे काटेकोर पालन करावे.

ज्ञ) शाळेने विनिर्दिष्ट केलेले मार्ग व बस थांबे यांचे काटेकोरपणे पालन वाहन चालकाने / बस सहायकाने करावे.

त) बसमार्ग क्रमांक बसच्या दर्शनी भागावर ठळकपणे दिसतील असे लावावेत.

थ) कामावर असताना कोणत्याही कर्मचाऱ्याने धुम्रपान अथवा मद्यपान करू नये,

द) मुलांना बसमध्ये चढताना व उतरताना महिला सहायक / स्वच्छक यांनी मदत करावी. त्यांनी मुलाला घ्यायला येणाऱ्या सहायकाचे ओळखपत्र देखील तपासावे. ज्युनिअर के.जी. आणि सिनिअर के.जी. तसेच प्राथमिक / माध्यमिक शाळेतील मुलांना ठरलेल्या ठिकाणी पालकांनी किंवा अधिकृत व्यक्तींनी उतरवून घ्यावे. जर त्यांना कोणी उतरवून घ्यायला येणार असल्याची त्यांच्या ओळखपत्रावर खूण असेल आणि कोणी घ्यायला आले नाही तर त्या मुलाला शाळेत परत आणावे.

ध) शाळेतील मुलांची ने-आण करताना कोणत्याही कर्मचाऱ्याने बसमध्ये संगीत / गाणे लावू नयेत.

प) शाळेने तशी तरतूद केलेली असेल त्याखेरीज, बसच्या कर्मचाऱ्यांनी मुलांना कोणतेही खाद्यपदार्थ अथवा पेय देवू नयेत.

फ) वाहतूक करणाऱ्याने बंद / वाहतूक कोंडी / अपघात / बिघाड / रस्ताबंद इत्यादींच्या वेळी बसमध्ये कोणताही बदल झाल्यास तसे ताबडतोब शाळेला कळवावे. कंत्राटाकडे अशा निकडीच्या वेळी पुरेशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे, याची शाळेने खात्री करून घ्यावी.

ब) वाहतूक करणाऱ्याने किंवा त्याच्या पर्यवेक्षकाने कोणत्याही अनियमित घटना ताबडतोब शाळेला कळवाव्यात.

भ) बस चालू असताना बसचे दरवाजे नेहमी कडी लावून बंद ठेवावेत. य) बसचा आतील भाग नियमितपणे स्वच्छ करावा. प्रत्येक बसमध्ये एअर फ्रेशनर ठेवावे.

र) स्वच्छक आणि महिला सहायकाने बसमधील विद्यार्थी सुरक्षित आणि सुखरूप आहेत तसेच बसमधील स्वच्छता याकडे कायम लक्ष ठेवावे.

ल) नियमांचे उल्लंघन केल्यास, वैधानिक प्राधिकरणाने दिलेल्या शिक्षेखेरीज सी. एस. ए. नुसार दंडही आकारण्यात येईल.

२. सामायिक प्रमाणित करारपत्र (सी.एस.ए.) रु. १००/- एवढे मुद्रांक शुल्क असलेल्या गैर न्यायिक बंधपत्रावर करण्यात येईल. पालक व विद्यार्थी यांना हे करारपत्र शाळेचे बस सेवा पुरविणारे व्यवस्थापन पूर्वपरवानगीने पडताळणीसाठी उपलब्ध करेल.

वरील नियमात वेळोवेळी आवश्यक ते बदल करता येतील. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक अर्जाचे नमुने खालील नमूद सोबतच्या परिशिष्टाप्रमाणे आहेत.

१) शालेय बस सेवा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे बस सेवा सुरू करण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांचे परिपत्रक

बस फीबाबत

बस सेवेसाठी विद्यार्थी / पालक यांचा अर्ज

विद्यार्थ्यांची माहिती विवरणपत्र

शाळांच्या बसबाबतचे नियम

सामायिक प्रमाणित करारनामा

सामायिक करारनाम्यासोबतचे जोडपत्र जे वेळोवेळी अद्ययावत करावयाचे आहे.

परिशिष्ट २

परिशिष्ट २.१

३. याबाबतची अधिसूचना यथावकाश निर्गमित करण्यात येईल.

४. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०११०९०३१७३००६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(ना.उ. रौराळे) उपसचिव, महाराष्ट्र शासनशालेय बस वाहतूक बाबत सर्व अधिनियम शासन आदेश व मार्गदर्शिका डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.