प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या आवारात मोबाईल वापराबाबत शासन आदेशानुसार सूचना.

 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 28 मे 2015 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या आवारात मोबाईल फोन अर्थात भ्रमणध्वनी वापरण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


राज्यातील जिल्हा परिषद / नगरपालिका / नगर परिषदा / महानगरपालिका, अनुदानित / विनाअनुदानित खाजगी संस्थाच्या प्राथमिक शाळा / उच्च प्राथमिक शाळा / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी शाळेच्या आवारात / वर्गामध्ये मोबाईल (भ्रमणध्वनी) फोन वापराबाबतचे निर्बंध शासन निर्णय, दिनांक १८.२.२००९ अन्वये घालण्यात आलेले आहेत. सध्या सर्वत्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात सुधारणा होत आहे. याचा भाग म्हणून मोबाईल फोनचा सुध्दा वापर हा जलदगतीने सर्रासपणे माहिती मिळण्याकरिता / जनसंपर्काकरिता अधिक प्रमाणात होत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण क्षेत्रात दिसून येतो. विषयानुरूप सखोल व विस्तृत स्वरुपाची माहिती ही माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षकांना प्राप्त झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या हिताकरिता फायदेशीर ठरणार आहे. यास्तव शाळेच्या आवारात वर्गात अध्यापनाकरिता शिक्षकांना भ्रमणध्वनीचा वापर करु देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रक :-


राज्यातील जिल्हा परिषद / नगरपालिका / नगर परिषदा / महानगरपालिका, खाजगी संस्थांच्या अनुदानित / विनाअनुदानित प्राथमिक शाळा / उच्च प्राथमिक शाळा / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, मुख्याध्यापक / शिक्षक यांना मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनी) वापर करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे :-


9) मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनीचा) वापर शाळेच्या आवारात / वर्गात शैक्षणिक साधन म्हणून करता येईल. शिक्षकांना शैक्षणिक साधन म्हणून मोबाईल (भ्रमणध्वनी) वापर करताना त्याबाबत मुख्याध्यापकांची पूर्व परवानगी घेण्यात यावी. 

२) मोबाईल फोनचा (भ्रमणध्वनीचा) वापर शाळेच्या आवारात / वर्गात बाहेरील व्यक्तिशी संभाषणासाठी करता येणार नाही.


३) उपरोक्त २ येथील नमूद अटीचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास शासन निर्णय,


दि. १८.२.२००९ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी.


(४) शिक्षकेतर कर्मचारी / विद्यार्थी यांना शाळेच्या आवारात मोबाईल (भ्रमणध्वनी) फोन वापरण्याबाबत शासन निर्णय, दि. १८.२.२००९ अन्वये घालण्यात आलेले निर्बंध कायम


राहतील. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१५०६२४१२३०५२८८२१ असा आहे, हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


Ramchandra Ganpat Gunjal

( रा. ग. गुंजाळ )

उप सचिव, महाराष्ट्र शासन




वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित दैनंदिन शैक्षणिक अपडेट्स व बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.