वेतन अपडेट - "वन हेड व्हाउचर योजना" राबविणे बाबत शिक्षण संचालकांचे दिनांक 20 एप्रिल 2023 चा आदेश.

 शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी आर्थिक वर्ष 2023 24 मध्ये वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिकमार्फत विविध 14 लेखाशीर्ष मधून देय ठरणारे वेतन अनुदान एकाच प्रमाणकातून म्हणजेच व्हाउचर मधून अहरित करून सर्व संबंधित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक तारखेस नियमित वेतन जमा करणेबाबत वन हेड वन व्हाउचर योजना राबवणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


शालार्थ वेतन प्रणालीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खाजगी माध्यमिक शाळेंसाठी वेतन पथकाकडे वितरीत केलेल्या वेतन अनुदानातून दरमहाच्या नियमित वेतन अनुदानाशिवाय वेतन विषयक अन्य देयकांच्या रक्कमा शालार्थ प्रणालीमधील बेसिक अँरिएर्स, डि.ए. अँरिएर्स या अॅक्टिव टॅबमधून विविध जिल्ह्यांतील संबंधित अनुदान पात्र शाळेच्या मुख्याध्यापकाकडून (डी.डी. ओ.१) व संबंधित जिल्ह्याच्या वेतन पथक (माध्यमिक) अधीक्षकांकडून (डी.डी.ओ-२) आहरित झाल्याचे दिसून आले.


त्यामुळे अर्थसंकल्पाच्या नियमित वेतनाच्या अहरण प्रक्रियेस अडथळा निर्माण होऊन आर्थिक शिस्त बिघडण्यास सुरूवात झाली. सबब, अशा प्रकारची आर्थिक शिस्त न बिघडता सर्व जिल्ह्यांतील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्य पदांच्या मर्यादेत वेतन अनुदानाचा वर्षभर नियमित वेतन उपलब्धता होण्याचे दृष्टीने व पर्यायाने उपलब्ध अनुदानाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांतील अनुदानित शाळेचे नियमित वेतन एक तारखेस संबंधित कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा होण्याची बाब विचारात घेऊन केवळ सन २०२३-२४ चा मार्च २०२३ पासूनचा फेब्रुवारी २०२४ पर्यंतचा पगार ०१ तारखेस होण्याच्या दृष्टीने वरील संदर्भ क्र. १ येथील पत्रान्वये शालार्थ प्रणालीमधील नियमित वेतन व्यतिरिक्त अन्य देयके खर्च न होण्याच्या दृष्टीने शालार्थ प्रणालीमधील अनावश्यक टॅब इनअॅक्टीव करण्याबाबत शालार्थ प्रणालीच्या तांत्रिक कक्षास सूचना दिलेल्या आहेत.


या सूचनांमुळे जिल्हा स्तरावर केवळ नियमित वेतन देयक सर्व संबंधित १०० टक्के शाळांच्या मुख्याध्यापकांकडून दरमहा ०७ तारखेच्या आत अपलोड झाल्यास त्या देयकांचे अधीक्षक, वेतन पथक स्तरावर योग्य पध्दतीने एकत्रिकरण होऊन जिल्हा कोषागारात दरमहा २० तारखेपूर्वी विहीत प्रपत्रात एकत्रित वेतनदेयक सादर


झाल्यास ०१ तारखेस वेतन संबंधित कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करणे शक्य आहे. या विषयी आपण सर्वांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला असून आता या प्रक्रियेस अभियान स्वरूपात आव्हान म्हणून वन हेड वन व्हाऊचर ही योजना सातत्याने याही आर्थिक वर्षात


राबविण्याची आहे.


या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा स्तरावर कोणतीही तांत्रिक अडचण किंवा प्रशासकीय अडचण निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी घ्यावयाची आहे, कारण बन हेड वन व्हाऊचर योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सक्षम वैयक्तिक मान्यताप्राप्त मुख्याध्यापक संबंधित शाळेस मंजूर असण्याची प्रशासकीय जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयाची आहे. त्यांनी प्रामुख्याने वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) यांच्या माध्यमातून वेतन घेणाच्या सर्व शाळांना सक्षम वैयक्तिक मान्यताप्राप्त मुख्याध्यापक असल्याची खातरजमा प्राधान्याने करून या सर्व मुख्याध्यापकांचे लक्ष महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्रमांक २२ (१) बाबत नमूद अनुसूचित ज मधील (३) आर्थिक बाबींच्या संबंधातील कर्तव्यांतर्गत (ग) मधील तरतूदीनुसार संबंधित मुख्याध्यापकाकडून शाळेचे मासिक वेतनदेयक शिक्षणाधिकान्यांनी विनिर्दिष्ट केलेल्या दिनांकापूर्वी ती संपूर्णपणे तपासून व त्यावर स्वाक्षरी करून वेतनपथक कार्यालयास सादर करण्याविषयीच्या कर्तव्याबाबत संबंधित मुख्याध्यापकांना


सूचना द्याव्यात. या सूचनांचे पालन जिल्ह्यातील सर्व संबंधित अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विहित कालमर्यादित होण्यासाठी अशा सर्व मुख्याध्यापकांचे उद्बोधन सातत्याने शिक्षणाधिकारी कार्यालयाने करावे. तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व अनुदान पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची सह्यांचे अधिकार प्रकरणे वेळेत पूर्ण करावीत. ज्याच्या मुळे सर्व संबंधित अनुदानित शाळांना वैयक्तिक मान्यताप्राप्त मुख्याध्यापक उपलब्ध असेल पर्यायाने अशा सर्व मुख्याध्यापकाकडून दरमहा त्यांच्या शाळेची वेतनदेयके दरमहा एका विहित कालावधीत शालार्थ प्रणालीवर अपलोड होऊन वेतन पथक स्तरावरून विहित कालावधीत कोषागारात २१ तारखेस वेतन होण्याच्या दृष्टीने खर्ची पडण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.


अशा प्रकारे ०१ तारखेस सर्व अनुदानित शाळेतील कर्मचान्याचे वेतन त्यांच्या खाती जमा होण्याच्या दृष्टीने आर्थिक वर्ष २०२३ २४ मध्ये आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्नशील राहून वन हेड वन व्हाउचर या योजनेचा अवलंब करावयाचा आहे.


या प्रक्रियेत ज्या जिल्ह्यातून वेतन पथक (माध्यमिक) च्या संनियत्रणाखाली असलेल्या १४ वेतनाच्या लेखाशिर्षाबाबत जास्तीत जास्त महिन्यांमध्ये ०१ तारखेस सर्व संबंधित १०० टक्के कर्मचान्याच्या वेतनाची प्रक्रिया ०१ तारखेस पूर्ण होत असल्यास या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व वेतनपथक माध्यमिक यांच्या वार्षिक कामकाजामध्ये विशेष उल्लेख करून त्याविषयी त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये उत्कृष्ट कामाची नोंद घेण्यात येईल, तसेच या उद्दिष्टपूर्ततेसाठी संबंधित असलेल्या मुख्याध्यापकाच्या सेवा पुस्तकामध्ये सुध्दा उत्कृष्ट कामाची नोंद घेण्याची कार्यवाही विहित मार्गाने केला जाईल.


सबब, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये वेतनपथक (माध्यमिक) व्दारा संनियंत्रित केलेल्या सर्वच्या सर्व १४ लेखाशिर्षाअंतर्गत दरमहा वन हेड वन व्हाउचर योजना राबविण्यात यावी. यासाठी आपल्या कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांचे, अधीक्षक वेतनपथक (माध्यमिक) व आपला समन्वय सातत्याने ठेवून आपण करित असलेल्या कामकाजाचा मासिक आढावा दरमहिन्याच्या ०५ तारखेस या कार्यालयास सादर करण्यात यावा. आणि वन हेड वन व्हाउचर योजना यशस्वीपणे राबविण्यात यावी.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.